Take a fresh look at your lifestyle.

सलाम ! एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी हा शिक्षक चक्क ५० किलोमीटर प्रवास करायचा

0

सरकारी शाळांमध्ये हे अगदी सामान्य आहेत की शिक्षक वेळेवर पोहोचत नाहीत किंवा मुलांना नीट शिकवले जात नाही, आता काय तर लॉकडाऊनच आहे त्यामुळे शाळेत विद्यार्थी हि नाही आणि शिक्षक देखील नाही . त्यात आता हे ऑनलाईन शिक्षणाचा थाट.

असो पण आज आम्ही तुम्हाला मुलांना शिकवण्यासाठी अनेक किलोमीटर दूरवरून आलेल्या एका शिक्षकाची गोष्ट तुम्ही सांगणार आहोत . ही कथा महाराष्ट्रातील एका सरकारी शिक्षकाची आहे. आणि ते चक्क एका मुलाला शिकवण्यासाठी ५० किलोमीटर अंतरावरून यायचे (लॉकडाऊन च्या आधी)

शिक्षक रजनीकांत मेंधे गेल्या आठ वर्षांपासून या शाळेत शिकवत आहेत आणि शाळेत येण्याची पद्धतही अतिशय धोकादायक आहे. मुलापर्यंत पोहोचायलाही त्यांना बराच वेळ लागतो. त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा शाळेच्या छतावरून साप माझ्यावर पडला ते होत नाही तर काही दिवसांनी ते मोटारसायकलने शाळेत जात असताना सापावर पडले. ते म्हणतात की ते तिस-यांदा जिवंत राहातील कि नाही असं त्यांना वाटत नाही. मुख्य म्हणजे ते आपल्या बाइकने इतका लांबचा प्रवास पूर्ण करतात.

कोण होता विद्यार्थी ?

गेल्या दोन वर्षांपासून हा ८ वर्षांचा युवराज नावाचा मुलगा शाळेत शिकत आहे. युवराजचा एक मित्रही गेल्या वर्षी कोल्हापुरात राहायला गेला आणि आता शाळेला एकमेव विद्यार्थी आहे .

शाळा कुठे आहे

ही शाळा पुण्यापासून १०० किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राच्या भोर तालुक्यात आहे. ही शाळा १९८५ साली बांधण्यात आली आणि काही वर्षांपासून छताशिवाय फक्त चार भिंती शिल्लक आहेत. पूर्वी शाळेत ११ विद्यार्थी होते, पण अनेक मुलांनी शाळा सोडली. अनेक मुले मजुरीसाठी गुजरातला गेली आहेत.

गावाची परिस्थिती काय आहे?

या शिक्षकाने शाळेच्या सुविधा दुरुस्त करण्यासाठी भरपूर काम केले आहे. शाळेत ई-लर्निंगचाही प्रयत्न करण्यात आला आहे. शाळेत सौरऊर्जेवर चालणारे पॅनल्स आहेत, जे शाळेत विजेसाठी वापरले जातात.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.