Take a fresh look at your lifestyle.

नॅचरल आईस्क्रीमची गोष्ट : फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटींची उलाढाल

0

नॅचरल आईस्क्रीम ही सर्वाधिक आवडीची आईस्क्रीम म्हणून पाहिल्या जाते. या आईस्क्रीम च्या मागे दडलीय एक थक्क करणारी प्रेरणादायी कहाणी..

कर्नाटक मधील मंगलोर जिल्ह्यातील पतूर तालुक्यातील मुलकी या गावातील रघुनंदन श्रीनिवास कामथ एका गरीब फळ विक्रेत्यांचा मुलगा.

महिन्याला 100 रुपये कमावून त्यात 7 मुलांची कशी तरी गुजराण ते करत होते. रघुनंदन ने अत्यंत हलाखीत दिवस काढले. 15 व्या वर्षी सर्व कामथ कुटुंब कर्नाटक वरून मुंबईला स्थलांतरीत झाले. मुंबईला जुहू कोळीवाड्यातील एका 12 *12 च्या खोली मध्ये सर्व कुटुंब राहायचे रघुनंदन हा घरातील सर्वात लहान सदस्य असल्याने त्याला कॉट खाली झोपावे लागायचे.

वयाच्या 15 वर्षी मुंबईत सुरुवातीला रघुनंदन यांनी चप्पल विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर त्यांचा मोठा भाऊ जो त्यांच्याहून 20 वर्षांनी मोठा त्याचा उसळ पाव चा व्यवसाय होता त्यातून त्याने व्यवसाय वाढवून गोकुळ रिफ्रेशमेन्ट मार्फत साऊथ इंडियन फूड आणि घरगुती आईस्क्रीम चा व्यवसाय सुरू केला.

कल्पना घरच्यांना सांगितली पण कोणीच ती मनावर घेतली नाही.

रघुनंदन कामथ भावाच्या व्यवसायात भावाला मदत करायचे त्यातून त्यांनी पाहिले की लोकांना आईस्क्रीम जास्त आवडते व ती आवडली तर दुसऱ्यांसोबत शेअर करतात. यातून त्यांना कल्पना सुचली की ग्राहकांना जर फळांचे तुकडे असणारी नैसर्गिक फळापासून बनवलेली आईस्क्रीम कृत्रिम फ्लेवर च्या आईस्क्रीम पेक्षा जास्त आवडेल.

त्यांनी ही आपली कल्पना आपल्या घरच्यांना सांगितली पण कोणीच ती मनावर घेतली नाही. पण रघुनंदन कामथ एका योग्य वेळेची वाट पाहून होते.

1984 साली आईस्क्रिमच्या व्यवसायात उतरले.

काही दिवसांनी त्यांच्या पारिवारिक संपत्तीची वाटणी करण्याची वेळ आली तेव्हा इतर भावाप्रमाणे त्यांनी मासिक स्वरूपात रक्कम स्वीकारण्या ऐवजी एकदम एक लाख रुपयांची रक्कम घेतली.

नवीन लग्न झालेल्या रघुनंदन कामथ यांना जाणवले की मुंबई सारख्या शहरात एक लाख रुपयाच्या बीज भांडवलावर व्यवसाय करणे शक्य नाही.याप्रसंगी त्यांची पत्नी अन्नपूर्णा यांनी त्यांना हिम्मत दिली प्रोत्साहन दिले. त्यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून 3 लाख रुपये जमा करून 1984 साली आईस्क्रिमच्या व्यवसायात उतरले.

सुरुवातीला 15 किलो आईस्क्रीम बनवली

जुहू विले पार्ल डेवलपमेंट स्कीम (जेवीपीडीएस) या नावाने 350 स्केअर फूट जागेत पहिले शॉप सुरू केले. रघुनंदन व त्यांची पत्नी यांच्या सह चार कर्मचारी मिळून हे शॉप सुरू केले. पहिल्यांदा 10 फ्लेवर मध्ये आईस्क्रीम बनवली. सुरुवातीला 15 किलो आईस्क्रीम बनवली ज्यात एका आठवड्यात 1 हजार कप विकल्या गेले.

आईस्क्रीम पर्यटकांच्या पण पसंतीला उतरली

सायकल वरून जाऊन ग्राहक जोडण्यासाठी पायपीट करत असत त्यात ते प्रसिद्ध व्यक्तीच्याकडे जाऊन त्यांना आईसक्रिम वितरित करायचे यातून बॉलिवूड मधील प्रसिद्ध व्यक्तीना जोडले. 2 वर्षात त्यांनी 14 लाखाचा व्यवसाय केला.

तिथून त्यांनी मागे वळून पहिलेच नाही त्यांची आईस्क्रीम पर्यटकांच्या पण पसंतीला उतरली. आईस्क्रीम साठी लागणारे दूध ते मुंबईतील दर्जेदार दूध समजल्या जाणाऱ्या नोबल डेरी चे दूध घेतात तर साखर ही दर्जेदार फार्मा ग्रेड ची घेतात. वडील फळ विक्रेते असल्याने फळांचे पारखी आहेत. आईस्क्रीम साठी अत्यंत दर्जेदार गोष्टी घेण्याबाबत त्यांचा पूर्वीपासून कटाक्ष आहे.

रोज 20 टन आईस्क्रीम बनवली जाते

आज नॅचरल आईस्क्रीमचे देशभरात 125 आऊटलेट आहेत. तर 60 फळापासून 100 हुन अधिक फ्लेवर ची आईस्क्रीम उत्पादित करतात.आज कंपनीचे 3000 हजार कोटींचे एकून मूल्ये आहे. चारकोप कांदिवली वेस्ट ला त्यांची स्वतःची आईस्क्रीम फॅक्टरी आहे रोज 20 टन आईस्क्रीम बनवली जाते व पॅक करून देशभरात वितरित केली जाते.

तर ही आहे कथा एका गरीब फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटींची उलाढाल असलेल्या नॅचरल आईस्क्रीमचे मालक रघुनंदन कामत यांचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास .

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.