अमेरिकेतली लाखोंची नोकरी सोडली; आज शेळीपालनातुन कमवतोय लाखो रुपये
भारतात शिक्षण घेतल्यानंतर देशाबाहेर जाऊन कायमचे स्थायिक होणारी अनेक उदाहरणे तुम्ही-आम्ही पहिली असतील. पण एक व्यक्ती मात्र याच्या अगदीच उलट वागला आणि आपळ्या कामाचा ठसा उमठवला. या माणसाने अमेरिकेतील एका शास्त्रज्ञाची नोकरी सोडली. आणि भारतात येऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी असलेले डॉ. अभिषेक भरड यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित नोकरी सोडून गावात परत येऊन शेळ्याचे संगोपन सुरू केले आणि आज लाखो रुपयांचा व्यवसाय उभा केला.
अभिषेकने २००८ मध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून बीएस्सी केल्यानंतर अमेरिकेतील लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटीतून पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर त्यांना अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. पण दोन वर्षांनंतर त्यांनी नोकरी सोडली. अमेरिकेहून आपल्या गावी परतल्यावर तो शेळीपालन सुरु केले.

१२० शेळ्यांसह सुरु केला व्यवसाय
अभिषेकने १२० शेळ्यांसह हा कृषी व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू संख्या दुप्पट केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज त्यांच्याकडे ३५० हून अधिक शेळ्या आहेत. त्यांनी शेळ्यांच्या चाऱ्यासाठी सहा एकर जमिनीवर मका आणि बाजरीसारखी पिके पेरली आहेत. जेणेकरून शेळ्यांना चांगला चारा मिळेल. शेळी विक्रीतून ते एका शेळीमागे सुमारे १०,००० रुपये कमावतात आणि अशा प्रकारे दरमहा १० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात.
त्याचबरोबर अभिषेक गावातील लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक शेतकरी गट स्थापन करून वैज्ञानिक शेतीचा आग्रह धरत आहे.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी असलेले डॉ. अभिषेक भरड यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित नोकरी सोडून गावात परत येऊन शेळ्याचे संगोपन सुरू केले आणि आज लाखो रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे.
त्यातच आता कोरोनाच्या संकटामुळे अनेक शहरातील रोजगार जर गेला असेल तर घाबरून न जाता आपण देखील शेतीचा पर्याय धरून आणि त्याच्याशी संलग्न अभिषेक सारखा व्यवसाय करून आपण देखील हे नक्कीच करू शकतात.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम