Take a fresh look at your lifestyle.

बाईक हेल्मेट घालून जागतिक क्रिकेटमधलं पहिलं शतक झळकवणारा खेळाडू

0

क्रिकेटच्या मैदानात फास्टर बॉलरची दहशत कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. आजघडीला त्यावर अनेक पर्याय शोधले गेले आहेत. या पर्यायापैकी एक महत्वाचा भाग म्हणजे हेल्मेट. पण क्रिकेटविश्वात पहिल्यांदा हेल्मेट कधी वापरलं, कोणी वापरलं हे तुम्हाला माहित आहे का ?

तर क्रिकेटमध्ये पहिल्यांदा हेल्मेट वापरण्याचा मान इंग्लंडचा फलंदाज डेनिस एमिस याच्याकडे जातो. ४३ वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये हेल्मेट वापरण्याचे श्रेय एमिसला जाते. याच डेनिस एमिसने सुरुवातीचे अनेक क्रिकेट रेकॉर्ड केले आहेत .

पदार्पणातच केले वनडे आंतरराष्ट्रीय चे पहिले शतक

इंग्लंडचा सलामीवीर डेनिस एमिसने आपल्या पहिल्याच मॅचमध्ये १०३ धावा धावा केल्या होत्या. वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज होता. त्याने २४ ऑगस्ट १९७२ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टरमध्ये हे यश मिळवले. जगातील दुसरी वनडे मॅच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली. यामध्ये इंग्लंडच्या डेनिस एमिसने १३४ चेंडूंत १०३ धावा केल्या होत्या.

वर्ल्डकपमध्ये पहिल्या शतकाचा मानही एमिसकडेच

वर्ल्डकपच्या पहिल्या शतकाचा मानही डेनिस एमिस यांच्याकडेच आहे. पहिल्या वर्ल्डकपदरम्यान त्याने लॉर्ड्सवर (७ जून १९७५) भारताविरुद्ध १३७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय बॉलर मदनलालने त्याला बाद केले होते. वर्ल्डकपचा हा पहिलाच सामना होता.

विशेष म्हणजे, एमिसचे शतक पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही तासातच न्यूझीलंडचा कर्णधार ग्लेन टर्नरने एजबॅस्टन येथे पूर्व आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले. त्याने नाबाद १७१ धावा केल्या, पण तो वर्ल्डकपचा दुसरा सामना होता.

फास्टर बॉलरला घाबरून हेल्मेट आणावे लागले

१९७७ च्या वर्ल्ड सीरिज क्रिकेटमध्ये फास्टर बॉलरची दहशत निर्माण झाली होती. वर्ल्ड सीरिजच्या पहिल्याच सीझनमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समन डेव्हिड हूक्स कॅरेबाई हे एंडी रॉबर्ट्सच्या एका बाऊन्सर मुळे जखमी झाले होते. बॉल त्यांच्या तोंडावर बसला होता आणि त्या मुळे त्यांचे तोंड फुटले होते. त्यानंतर डेनिस एमिस त्या सिरीजमध्ये डोकं वाचवण्यासाठी हेल्मेट घालून मैदानावर उतरले होते.

फास्टर बॉलरमुळे बॅटसमन मध्ये घबराट

खरं तर त्या वर्ल्ड सीरिजमध्ये डॅनियल लिली आणि जेफ थॉमसन ताशी ९० मैल वेगाने चेंडू टाकत होते. डेनिस एमिसला एक कल्पना सुचली. त्याने ऑस्ट्रेलियन आणि वेस्टइंडियन फास्ट बॉलर्स समोर खेळण्यासाठी एका कंपनीकडून मोटारसायकलचे हेल्मेट आणले. पण अशा प्रकारचे हेल्मेट घालून फलंदाजी करणे सोपे नव्हते.

कसं होत तेव्हाच मोटारसायकल हेल्मेट

डेनिस अमीसने १३ वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं की, त्या हेल्मेटमुळे फलंदाजी करताना कान पूर्णपणे झाकले होते. क्रीजवर सहफलंदाजाचे शब्द ऐकणे कठीण होते. फायबर ग्लासपासून बनवलेलं हे हेल्मेट खूप जड होतं आणि त्याने खूप घाम डोक्यावर येत होता.

1978 मध्ये पहिल्यांदा कसोटी सामन्यात हेल्मेट आले

कसोटी सामन्यात प्रथमच १९७८ मध्ये हेल्मेटचा वापर करण्यात आला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ब्रिजटाऊन कसोटीत ग्रॅहम यलोपने डेनिस एमिस कडे पाहून हेल्मेट वापरले. आणि वेस्ट इंडिजच्या वेगवान आक्रमणाला सामोरे गेले. पण प्रेक्षकांना ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने हेल्मेट घातलेले अजिबात आवडलं नाही.

अपवाद म्हणता येईल पण बॅट्समन गॅरी सोबर्स यांनी आपल्या आयुष्यात कधीच हेल्मेट घातले नाही. कोणत्याही सुरक्षेशिवाय त्यांनी त्यांनी फास्टर बॉलरचा सामना केला.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.