Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्र निर्माण करण्यासाठी व्यक्तीनिर्माण

0
  • मुकुल कानिटकर

मनुष्य चांगला बनल्याने, राष्ट्र तयार होईल. हे गरजेचं नाही. भीष्मांसारखे आदर्श पूर्ण महाभारतात नव्हते. व्यक्तीच्या व्यक्तीगत चारित्र्याचा आदर्श म्हणजे भीष्म होते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनात्मक आणि अध्यात्मिक या पाच स्तरांवर व्यक्ती विकासाचा आदर्श द्यायचा असेल तर तो पितामह भीष्मांमध्ये बघू शकता. मनाची दृढता, प्रतिज्ञा, शारिरीक शक्ती सगळ काही होतं पण राष्ट्र निर्माण करण्यासाठी ची भूमिका उलटी घेतली, ते चुकिच्या बाजूने उभे राहिले प्रतिदिन दहा हजार पांडवांना मारण्याचा प्रण घेतला. जोपर्यंत शिखंडीने त्यांना मारले नाही तोपर्यंत ते  पांडवाना मारत राहिले. प्रयत्नपूर्वक आणि संकल्पपूर्वक अधर्माची बाजू घेतली. व्यक्तिनिर्माणाने आपोआप राष्ट्र निर्माण होणार नाही. राष्ट्र निर्माणासाठी व्यक्ति निर्माण करणे जरुरीचं आहे तरच राष्ट्रनिर्माण होईल.

त्यामुळे आपल्याला सगळा दृष्टिकोनच बदलावा लागेल. शिक्षकांना, पालकांना आणि संस्था चालकांना त्यांची दृष्टी बदलावी लागेल. तुम्ही फक्त जाहिरातबाजी नाही करु शकत कि आमच्या संस्थेमधून एवढे नोकर जन्मले, शंभर इन्फोसिस मध्ये गेले. दोनशे आयबीएम मध्ये गेले. या सगळ्या जाहिरातीनी काम चालणार नाही. वस्तुस्थितीमध्ये  खरोखर किती इंजिनियर झाले, त्यांनी लोकांना काय नवीन शास्त्र दिलं, राष्ट्रहितासाठी काय केले, किती समस्यांचे समाधान मिळाले, किती शेतकऱ्यांच्या समस्यांना उपाय माझ्या विद्यालयातल्या विद्यार्थ्यानी दिलाय, माझ्या वर्गातल्या मुलांना एक वेगळी  नजर दिली का ? मी स्पर्धा वाढवतोय कि संस्था वाढवतोय, वर्गात गणितात हुशार असलेला मुलगा जेव्हा गणित येत नसलेल्या मुलाला शिकवतो तेव्हा त्याने त्याला शिकवलं ह्यासाठी आपण त्याला शाबासकी देतो कि वर्गात पहिला आला म्हणून शाबासकी देतो? अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून राष्ट्रनिर्माण व्हायला सुरुवात होते.

परिवार भाव सामुहिक जीवनाचा आदर्श आहे. आपण शाळा परिवार, महाविद्यालय परिवार बोलतो. परिवार ह्या शब्दाला खूप मोठे मोल आहे. एके दिवशी मी योगाची शिकवण दिली होती. तर त्यावेळेस शेवटच्या दिवशी मॅनेजरने मला धन्यवाद देताना म्हणाला शाखा परिवाराकडून मी आपले आभार मानतो. मला पहिले वाटले हा सुद्धा शाखावाला आहे. पण नंतर मला समजल कि कि तो स्टेट बँकेच्या एका शाखेतर्फे म्हणजेच परिवारतर्फे तो मला धन्यवाद देत होता. तो बॅकेलासुद्धा त्याचा परिवारच समजत होता. राष्ट्रजीवन, समाजजीवन आणि ‘सामूहिक जीवन ज्याला आज आपण टिमवर्क असे म्हणतो ह्या सगळ्यांचा आदर्श हा परिवार भाव आहे. विचारसरणीच अशी झाली आहे की भारतीय समाजाची विचारसरणी अशी झाली आहे की जे जुने आहे त्यात गडबड आहे. जुन्या गोष्टी नको, वास्तविकपणे बघायला गेलं तर नित्यनूतन चिरापुरात्वनीय आहे. कारण ह्या राष्ट्राने सनातनला जिवंत ठेवलंय. मी जेव्हा धोतर नेसून जातो त्या वेळेस लोक माझ्याकडे खूप आश्चर्याने  नजरेने बघतात. धोतरवाला आला असे सुद्धा बोलतात. ह्या सगळ्या  तरुणांना मी सांगू इच्छितो कि मी जुना वेश परिधान करून नाही आलोय  तर मी तुमच्या सगळ्यापेक्षा फॅशन मध्ये पुढे आहे. पुढच्या पाच वर्षात  जे फॅशन मध्ये येणार आहे.  ते मी आज परिधान केले आणि धोतरापेक्षा  हवेशीर दुसर काय असणार? ज्या दिवशी अमेरिकेला हि गोष्ट समजेल त्या दिवसापासून अमेरिकेमध्ये धोतराची फॅशन येईल आणि एकदा  अमेरिकेमध्ये हि फॅशन आली कि गुलाम लोक सूध्दा तिचे अवलोकन करणार. आत्ता अमेरिकेमध्ये कंठलंगोट परिधान करतात. त्यांना लंगोट कुठे बांधतात हे माहित नव्हतं तर ह्यांनी तो गळ्याला बांधला. अमेरिका कंठलंगोट वापरतो तर आम्ही आम्ही सुद्धा वापरतो, अमेरिका धोतर नेसायला लागल तर तर आम्ही सूद्धा नेसू हे असंच करायचं का? अमेरिकेला धोतर नेसवायचं असेल तर ते पहिले आपल्याला  नेसावं लागेल. तुमच्या समोर दोनच पर्याय  आहेत . अनुयायी बनणार की अग्रेसर राहणे.

आपल्याला ठरवावं लागेल अनुयायी बनणे की आपण लीडर बनणे आणि ह्या सगळ्याचा जन्म विश्वाचं मार्गदर्शन करण्यासाठी झालाय. मी जिकडे जिकडे जातो तिथे तिथे लोकांना मी ब्रेकिंग न्यूज देतो आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की “भारतमाता विश्वगुरु झाली आहे? खुप जणांना माहित नसेल कारण माध्यमांनी ब्रेकिंग न्यूज दाखवलीच नाही. तारीखसुद्धा सांगतो मी, तांत्रिकदृष्ट्या स्वातंत्र्याची तारीख आहे १५ ऑगस्ट १९४७. पण कदाचित पुढच्या शंभर वर्षामध्ये ही तारीख सुद्धा आपण विसरू आणि शंभर वर्षांनी इंग्रजी कॅलेडर गोगेरीयनयन प्रमाणे भारताच्या वास्तविक स्वातंत्र्याची आणि पुन्हा विश्वगुरु पथावर सामिल होण्याची तरिख २१ जून २०१५ हि असेल. ९६३ देशांमध्ये तिथले तिथले नागरिक, त्याच्या त्यांच्या भूमीवर ट्रॅफलगेरमध्ये, बेल्जियममध्ये, न्युलीझंडमध्ये, ऑस्ट्रियामध्ये, मॉरीशसमध्ये, कतारमध्ये, कुवेतमध्ये, सौदी अरेबियामध्ये बुरखा  घातलेल्या महिलांनी जेव्हा ओमचा जप केला, सूर्य नमस्कार घालताना जेव्हा त्याचं नाक त्यांच्या भूमीवर घासलं ते त्यांनी  भारतमातेसाठी केललं वंदन होतं. त्यादिवशी म्हणजेच २१ जून २०१५ ला विश्वगुरु झाला. भारतमाता विश्वगुरु कधी झाला जेव्हा पूर्ण विश्वाने त्याला गुरु मानले. आपल्या बोलण्याने थोडी होणार आहे आपण तर बोलणारच ती आपली  माता आहे आणि आई कुणाला प्रिय नसते. भारताच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना सुद्धा भारताविषयी  आत्मीयता असते. थोडासा जोश दाखवला की ते सुद्धा “भारतमाता कि जय” असं ओरडतात.

भारतमाते भारतातील व्यक्ती त्याग करायला तयार आहेत, गरज आहे ती फक्त एका कामाची २१ जून २०१५ ला भारतमाता विश्वगुरु  बनण्यास जी सुरुवात झाली आहे त्याला पूर्णत्वास न्यायाचा आहे आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी भारतीय शिक्षण व्यवस्था, गुरुकुल सारखी शिक्षण व्यवस्था जेव्हा पूर्ण विश्वाची शिक्षण व्यवस्था बनेल तेव्हा भारताला विश्वगुरु बनण्याचे काम पूर्ण होईल. कधी होणार ही तारीख सुद्धा सांगतो मी काही भविष्य सांगणारा जोतिषी नाहीये पण सरस्वतीच्या आशीवार्दाने सांगतो. येत्या १५ वर्षांमध्ये  हे होऊन जाईल ह्याच कामसुद्धा आम्ही सुरु केलंय. तुम्हाला देशातच नाही बघायला मिळत तर विश्वात कुठून बघायला मिळणार. दहा वर्षांपूर्वी देशात योगा बघायला मिळत होता का? पण आता तो दिसतोय आणि तोही देशात नाही तर पूर्ण विश्वात योगा सुरु आहे. आम्ही जेव्हा ग्वाल्हेरमध्ये योगाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. तेव्हा तिथल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आम्हाला विचारले की योगा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड का केला? तेव्हा मी त्यांना सांगितले  की एक दिवस पूर्ण जग योगा करेल. तेव्हा ते सगळे पत्रकार खूप हसायला लागले कारण २००५ मध्ये योगा आत्ता एवढा पुढे आलेला नव्हता. त्यांच्यातला दैनिक भास्करच्या पत्रकाराने तर हसत हसत मला विचारले की तुम्ही जे म्हणताय एक दिवस  पूर्ण जग योगा करेल तर तो एक दिवस नक्की कधी येणार आणि तेव्हा माझ्या तोंडातून निघून गेले की दहा वर्षांमध्ये होईल .फेकण्यात तर प्रचारक हुशार असतातच तसच मी फेकल  दहा वर्षात होईल आणि सरस्वती देवीच्या कृपेने ते झाले. २००५ मध्ये मी हे बोललों होतो आणि २०१५ मध्ये ते खास सुद्धा झाले.

२०१५ मध्ये एकदा गुरुकुलचं संमेलन भरले होते. तेव्हा पूर्ण देशातल्या ४००० गुरुकुलांपैकी ८५० गुरुकुलांचे ३५०० प्रतिनिधी तिथे हजर होते. त्या कार्याक्रमावेळेस  गुरुकुलाच्या कुणीतरी मला विचारले विश्वाची मुख्य धारीका गुरुकुल बनेल का आणि कधी  पुन्हा माझ्या तोंडातून निघून गेले की १५ वर्षांमध्ये होईल आणि सरस्वती देवी वर पूर्ण विश्वास आहे आणि ते आत्ताच थोड थोड दिसतंय कारण आमच्यामागे  खूप लोक लागली आहेत गुरुकुल सुरु करण्यासाठी, आजकाल गुरुकुल सुरु करणं फॅशन  झाली आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये लोक गुरुकुलला प्रवेश घ्यायला लागतील  स्वतः शिकता आले नाही. गुरुकुलमध्ये त्यांच्या मुलांना-नातवंडांना प्रवेश घेऊन देतील म्हणून आत्ताच घेऊन ठेवा प्रवेश काही वर्षांने अवघड होऊन जाईल . जसं धोतर फॅशन मध्ये येणार आहे तसाच गुरुकुल सुद्धा फॅशन बनणार आहे आणि ह्या सगळ्याला वेळ नाही लागणारं. भारतात कोणतच  काम करायला वेळ लागत नाही.

लहानपणी शाळेत सायकल स्टॅन्ड च्या सायकल आपण पाडलेल्या आहेत. ५००  सायकल पाडायला ५०० धक्के नाही द्यावे लागत  तर त्याला एक धक्का पुरेसा असतो तर त्यामुळे अशक्य असे काही नाही. जे होणार आहे तेच मी सांगतोय. आता ह्या साठी काय करायचय तर शिक्षणाचा उद्देश बदलायचा आहे. “मुक्त शिक्षण मुक्त झाली तरच ती तरच ती अर्थकरी आणि मुक्तकरी होईल, अर्थकरी केल्याने ती मुक्तकरी नाही होणारे .

मुक्तकरी झाली तरच ती युक्तकरी होईल आणि अर्थकरी होईल. हे जे मुक्तकरी शिक्षणाचे आपण स्वप्न बघतोय ते साकार कसे होणार तर जेव्हा आपण शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवू आपण त्याना पुर्णपुने मुक्त करू तेव्हा .शिक्षकांना कसे शिकवा हे शिकवले नाही पाहिजे. सरकार तेच करते शिक्षकानाच शिकवते,

संस्थाचालक सुद्धा शिक्षकांनाच शिकवतात असे केले तर शिक्षक काय शिकवणार? वर्गाच सगळ काम ,तिथे काय शिकवायचं ,कसे शिकवायचं हे सगळे शिक्षकांच्या हातात दिल्यावर खूप चांगले बदल घडतील.भारतीय शिक्षण मंडळात शिक्षकांना ही सूट दिली पाहिजे .

महापालिकांच्या शाळांमधल्या शिक्षकांनाही  सूट थोडीफार दिली तर तिथले शिक्षक जागृत झाले ,त्यांना आपण शिक्षक आहोत ह्या गोष्टीचं भान आले आणि आत्ता या शाळांमध्ये चमत्कार व्हायला लागलेत. नागपूरमध्ये एका शाळेत ३०च्या वर मुले नव्हती आत्ता तिथे १००० च्या वर मुले आहेत आणि हे वातावरण तिथल्या एका पवार नावाच्या सरांनी बदललं त्या शाळेतील मुलं १ ते १०० मधल्या कुठलाही अंक दिला की लगेच पाढा म्हणून दाखवतात, योगा करतात,खेळ खेळतात  सर्व बाजूंनी विकास झालेली ती मुले आहेत.एक शिक्षक बदलला पूर्ण शाळा बद्लून गेली,चमत्कार झाला.ह्यासाठी हा संकल्प घेण गरजेचे आहे . कुठून सुरुवात करायची तर स्वतः पासून करायची. अर्थ (पैसा) ह्या पासून शिक्षणाला मुक्त करायचं आहे .आत्ता आम्ही ‘भारतीय  शिक्षण मंडळाच्या” अधिवेशनात संकल्प सोडला. प्रस्तावना नाही. इंग्रजी मध्ये resolution म्हणजे प्रस्तावना तर आम्ही ते न करता संकल्प घेतला तो म्हणजे शिक्षणाला शासन मुक्त समाज बनवायचं. कसं होणार हे सगळे तर १८२३ पर्यंत भारतात लाखो शिक्षण संस्था होत्या ते कार्य चालत होते. सत्ता तर नव्हती त्यांच्याकडे व्यापार तर नव्हता तरी सुद्धा ते समाजाच्या मालकीच्या कशा होत्या तर प्रत्येक शिक्षित व्यक्ती  त्याच्या कमाईतला १० % त्याचा गुरुकुलला पाठवत असे. आत्ता IIT ची अल्युमनी भारतात कुठे कुठे काम करते त्यांनी जर त्यांच्या पगारातील १० % रक्कम IIT ला पाठवायला सुरुवात केली तर IIT ला कशाचीच कमी भासणार नाही आणि कुणाचीच गरज भासणार नाही. संकल्प नेहमी स्वतः पासून घ्यायचा असतो. मी माझ्या कमाईतली १०% रक्कम शिक्षण व्यवस्थेला दयायला सुरुवात केली किंवा १२ महिन्यांपैकी १ महिन्याची कमाई दिली आणि असे प्रत्येकाने केले तर भारतीय नागरिक शासनापेक्षा जास्त पैसे देतील शिक्षण व्यवस्थेत समाज उभा राहील. मग तिला व्यापाराची गरज नाही पडणार. शिक्षण व्यवस्था निः शुल्क होऊन जाईल आणि हे करणे खूप मोठे काम आहे पण अशक्य नाही. जे काही सिद्धांत आहेत ते सर्वांनी आचरणात आणले तर नक्की होईल. भारतीय शिक्षण मंडळाने निःशुल्क मुक्त झाली तर पुढच्या १५ वर्षात विश्वामध्ये हे सुद्धा होईल .फिनलंडमध्ये तर आत्ताच सुरु आहे. ते आता विषय शिकवत नाहीत. पंधरा वर्षापुर्वीच त्यांनी ते बंद केले. आठ तासांच्या शाळेत फक्त ९० मिनिटे शिक्षक आणि विद्यार्थी असे समोरासमोर बसून शिकत असतात. बाकी कृतीवर आधारित सर्जनशील शिक्षण सुरु असते. तिथे चित्रकला वर्ग आहे, संगीताचा वर्ग आहे पूर्ण अभ्यासासाठी मात्र वर्ग नाहीत. जेव्हा पाच वर्षांपुर्वी मी ही माहिती पाहिली तेव्हा मला असे झाल की फ़िनलैंड मध्ये गुरुकुल आले भारतात कधी येणार ? फ़िनलैंडवाले बिचारे धक्के खात खात या संकल्पनेवर येउन पोहोचले  आणि भारताकडे तर यावर पाच ग्रंथ आहेत. फक्त ते वापरायचे आहेत आणि गुरुकुल परंपरा लागू करायची आहे. लोक तयार आहेत पण ते होत नाहीये. शिक्षकांना थोड सांगितले की ते समजुन जातात. त्याचसाठी हे कार्य करण्यासाठी कटीबद्ध होण गरजेचे आहे.

राष्ट्रनिर्माणासाठी मनुष्य निर्मानाची शिक्षा कशी असेल तर ती स्वतः ला बदलून होइल, स्वतः ला स्वतंत्र करुन आपल्या संस्थेला स्वतंत्र करुन, समाजाला स्वतंत्र करून पूर्ण विश्वाचा ठेका घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण विश्वाला आपणच ठीक करायच आहे आणि ते कसे होईल तर जेव्हा आपण स्वतः ला सुधारू तेव्हा भारतीयत्व हवे असेल तर विधी शिक्षण घेण गरजेच आहे. मी जेव्हा इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये जातो. तेव्हा त्याना सांगतो की ABCD गुरुकुलच्या पद्धतीने शिकवा तर ते माझ्याकडे आश्चर्याने बघतात, गुरुकुल च्या A FOR APPLE चं  असले पाहिजे असं काही नाही. त्या मुलाला स्वातंत्र्य त्याला A FOR जे वाटते ते घेऊ द्यायचं. आपण त्यांच्या डोक्यात नाही भरवायच. मी त्यांना ABCD मधूनच बोलायला सांगतो पण नाही जमत ते मनातल्या मनात बोलून बघतात कारण ABCD त्यांना शिकवले नाहीये तर रट्टा मारलाय.

त्यांना मुळाक्षरे माहित नाही. इंग्रजीमध्ये दोन शब्दांची स्पेलिंग उच्चारन सारखं असत पण अर्थ वेगळा असतो. त्यांच्याकडे आपल्यासारखे शंकराच्या डमरूमधून निघालेले ५२ ध्वनी नाहीयेत ना म्हणून २६ मध्ये काम चालवतात. आपण तर समृद्ध आहोत ना.

आपण त्यांना पद्धती देवूया. त्यांच्याकडे शब्दच नाहीयेत. RIGHT म्हणजे बरोबर दुसरा अर्थ म्हणजे उजवी दिशा आणि तिसरा म्हणजे Human Right. Write थोडसं स्पेलिंग बदललं पण उच्चारण तेच आहे. मुखातून निघणाऱ्या ध्वनीतून तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ कसा बदलू शकतो. म्हणूनच आपली भाषा समृद्ध आहे. हिंदी मध्ये छुते है तो चरण और मारते है तो लाथ. प्रत्येक उच्चारण वेगळे आहे. बालशास्त्र बदलायला पाहिजे. भारतीय विधीप्रमाणे इंग्रजी शिकवायला पाहीजे. जगातल्या सगळ्या भाषांचा संस्कृतीकरण करायचे आहे. म्हणून मग आपण इंग्रजी सुद्धा सुधारावयाची आहे. ती सुद्धा संस्कृतपणे शिकवायची, भारतमातेला विश्वगुरु बनवायचं आहे. हेच आपले कायम ध्येय असेल.

–         मुकुल कानिटकर

लेखक शिक्षणतज्ञ आणि भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री आहेत

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.