सिंहगडावर टिळकांना जमीन कशी मिळाली ? काय आहे प्रकरण
● टिळकांना जमीन कशी मिळाली ?
पुण्यात असतांना टिळक असे निवासस्थान शोधत होते जेथे त्यांना आपल्या राजकीय वातावरणातून आराम मिळू शकेल व तेथे ते त्यांचे अभ्यासकार्य करू शकतील, अश्याच शोधातून एक इच्छुक विक्रेता त्यांना स्वतःहून भेटण्यास आला व त्याच्या कडून टिळकांनी बंगला विकत घेतला.
टिळक बंगल्याच्या सर्वात दुर्मिळ व जुना फोटो.
● कोणी विकली ?
रामलाल नंदराम नाईक या व्यक्तीने १८८० साली सदरील बंगला लोकमान्य टिळकांना विकला. त्यात सुधारणा करून टिळकांनी १८८३ रोजी येथे गणेशोत्सव साजरा केला.१९१५ साली लोकमान्य टिळक व महात्मा गांधीची सर्वात पहिल्यांदा याच वाड्यावर भेट झाली होती. टिळक या ठिकाणी उन्हाळ्यात राहण्यासाठी येत असत, कारण येथील वातावरण अत्यंत आल्हाददायक व थंडगार असल्यामुळे त्यांना हे स्थान आवडत असे.
टिळक बंगल्यावरील टिळक स्मारक (सिंहगड किल्ला)
● विकण्याचा अधिकार कोणी दिला ?
पूर्वीच्या काळी भारतात कोणीही कोठेही जागा विकत घेऊ शकत होते, अगदी काश्मिरात सुद्धा. शिवाय तत्कालीन काळात इतकी स्टॅम्प पेपर्स व कागदोपत्री वैगरे करण्याचीही जास्त आवश्यकता नव्हती. भारतात इंग्रजांचे शासन जरी असले तरी भारतात राजेशाही व सरंजामशाही होतीच. म्हणूनच ऐतिहासिक वास्तू असो वा नसो ते विकायचे आहे की नाही याचा संपूर्ण अधिकार विकाणाऱ्याकडे असे व ते घेण्याचा अधिकार सुद्धा घेणाऱ्याकडे असे.
शिवाय किल्ले हे प्रजेने सुरक्षित राहण्यासाठीच बांधले जातं, तेथे असे कोणतेही बंधन नव्हते की तेथे फक्त राजे लोकांनीच राहावे. ज्याच्याकडे किल्ल्यात सोयीस्कर राहण्याइतपत पैसा आहे, तो येथे राहू शकत असे, याच कारणामुळे टिळकांनी तत्कालीन काळात सिंहगडावर राहणे यात कोणतेही गैर व अवैध नव्हते.
१९४७ भारत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने अर्थातच भारत पुरातन विभाग सर्व ऐतिहासिक वास्तू आपल्या अधिकाराखाली घेतले व त्यांचे रंक्षण, सरंक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे आता कोणत्याही किल्यावर कोणीही बंगलाच काय तर मुंगीभर जागा देखील विकत घेऊ शकत नाही, परंतु अशी वास्तू अजूनही वयक्तिक संपत्ती असल्यास तर संबंधित विक्रेत्याकडून आपण अशी वास्तू विकत घेऊ शकतात.
सध्या हा किल्ला व हा बंगला पुरातन विभागाच्या संरक्षणाखाली आहे शिवाय गड किल्ले संवर्धन समिती येथे देखरेख करत असते.
टिळक बंगल्यावरील संगमरवरी वर कोरलेले शिलालेख… अन या उत्तराचा आधारस्तंभ.
आपण टिळक बंगल्यावर एक रात्र निवास करू शकतात. त्यासाठी काही शुल्क आकारले जाईल. एका खोलीत चार जणांची निवासाची व्यवस्था असते. सिंहगडावर गेल्यावर आपण तेथे विचारणा करू शकतात. खूप छान अनुभव असतो.
- चैतन्य आर्य
- पुणे
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम