लोणारचं पाणी गुलाबी का झालं असेल ?
बुलढाणा येथील प्रसिद्ध लोणार सरोवराचा रंग बदलत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील वन अधिकारी गोंधळून गेले आहेत. पाण्याचा रंग गूढरित्या लाल झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तलावाच्या पाण्याचा रंग बदलला आहे. वन विभागाला विश्लेषणासाठी नमुने गोळा करून त्याचे कारण शोधण्यास सांगण्यात आले आहे.” लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले आहे पण यामागचे नेमके कारण काय ते आपण जाणून घेऊ यात
उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सरोवर आहे.
हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ऐरवी, इथलं पाणी हिरव्या रंगाचं असतं. अचानक पाण्याचा रंग गुलाबी झाल्याने सर्वजण आश्चर्यचकित झालेत. तर अनेकांच्या मनात याबाबत कुतुहुलही निर्माण झालं आहे.
जगातील आश्चर्य
लोणार सरोवर हे महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चर्य समजले जाते. ते (national geoheritage monuments of india ) आहे. उल्कापाताच्या आघातामुळे त्या सरोवराची निर्मिती झाली. सरोवराचा विविध अंगांनी अभ्यास झाला आहे. पर्यटन करणाऱ्यांसाठी ते महत्त्वाचे आकर्षण समजले जाते. जगात उल्कापातामुळे निर्माण झालेली दोनच सरोवरे आहेत असे म्हणतात. त्यांपैकी दुसरे सोव्हिएत रशियात आहे
पुराणातही आहे उल्लेख
सरोवराचा उल्लेख स्कंद पुराणात, पद्म पुराणात, मराठीतील लीळाचरित्रात; त्याचप्रमाणे, फार्सीतील ‘ऐने अकबरी’मध्ये आढळतो. जे. ई. अलेक्झांडर या ब्रिटिश अधिकाऱ्याने त्या सरोवराची नोंद १८२३ मध्ये घेतलेली आहे. त्या उल्केचा छोटा तुकडा लोणार सरोवरापासून सातशे मीटरवर पडला आहे. तेथेही एक छोटे सरोवर तयार झाले आहे. त्या जवळ हनुमान मंदिर आहे. मंदिरातील हनुमानाची मूर्ती ज्या दगडाची बनली आहे, तिच्यात चुंबकत्व आहे. त्या सरोवराला छोटे लोणार या नावाने ओळखले जाते.
कशी आहे नेमकी रासायनिक प्रक्रिया
लोणार सरोवराचे वय पाच लाख सत्तर हजार वर्षें वय असल्याचे म्हटले आहे. त्या सरोवराच्या निर्मितीत वीस लाख टनाचा उल्कापात होऊन मोठा खड्डा तयार झाला व त्यानंतर कैक सहस्रके रासायनिक प्रक्रिया होत राहिली. त्यातून वेगळाच खडक व माती तयार झाली.
त्या खड्ड्यात अल्कलाईन पाण्याचे तळे विकसित झाले. हळदीचा त्या पाण्यात थेंब टाकला तरी त्याचा रंग लाल होतो. तळ्याचे पाणी जरी रासायनिक असले तरी त्याच्या दोन फूट बाजूला खड्डा खणल्यास गोडे पाणी लागते. त्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील भूगर्भशास्त्रज्ञ तेथे येत असतात. उल्का आदळल्यामुळे आजूबाजूचा परिसर छोट्या टेकड्यांच्या स्वरूपात वर आलेला आहे.
तज्ञांच्या मते पाणी गुलाबी का झाले ?
शेवाळाच्या उच्च क्षारआणि कृतीमुळे जगभरात अशा प्रकारची अनेक उदाहरणे आहेत, पण वैज्ञानिक अभ्यासांच्या आधारे त्याची पुष्टी होणे आवश्यक आहे, असे रेड्डी म्हणाले. तलावे यांच्या बाबतीत, संशोधक आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी या बदलाला बीटा-कॅरोटीन असलेल्या अत्यंत उच्च क्षारयुक्त वातावरणात वाढणाऱ्या शेवाळ किंवा जीवाणूंच्या (हॅलोबॅक्टेरिया) वाढण्याला कारणीभूत असल्याचे म्हटले होते. काकोडकर म्हणाले, “या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षार आणि क्षार एकाच वेळी क्षारयुक्त आहे आणि पाण्याच्या पातळीचे निकष एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जात असताना, ते मोठ्या जैवविविधतेचे घर आहे.”
गावकऱ्यांच्या मते
लोणार शहरातील सांडपाणी आणि पावसाचं पाणी सरोवरात गेल्याने सरोवर गढूळ झालं असावे अशी शक्यता गावकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र शहरातील सांडपाणी आणि पावसाच्या पाण्यामुळे सरोवरातील पाण्याचा रंग बदलला नसल्याचे तहसीलदार सैदल नदाफ यांचं म्हणणे आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम