जेव्हा पाकिस्तानी सैनिक जेव्हा कॅप्टन विक्रम बत्रांना ‘माधुरी हमें दे दे’ म्हणून उकसवतात
कॅप्टन विक्रम बत्रांचा भाऊ विशाल बत्रा यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.
कारगिल युद्धाचे नायक शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘शेरशाह’ हा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. धाडसी आणि देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या विक्रम बत्रांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे.
विक्रम बत्रा यांच्या आयुष्यात असा किस्सा घडला होता की ज्यामुळे पाकिस्तानला मोठी धडकी भरली होती.
कॅप्टन विक्रम बत्रांचा भाऊ विशाल बत्रा यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. जेव्हा विक्रम आणि पाकिस्तानी सैनिकात हे संभाषण घडलं होतं. भारताच्या सिमांवर हल्ला करणाऱ्या एका पाकिस्तानी सैनिकाने माधुरी दीक्षितला मागितलं होतं. त्यावर विक्रम यांनी दिलेल्या उत्तराने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली होती.
विशाल यांनी सांगितलं की, ‘विक्रम जेव्हा शत्रूंच्या बाजूने वळत होता, तेव्हा त्याच्या रेडियो ला पाकिस्तानी सैनिकांनी इंटरसेप्ट केलं होतं आणि त्याला धमकी देऊ लागले होते.
पाकिस्तानी सैनिक म्हणाले होते, ‘अरे शेरशाह, वर नको येऊ नाहीतर तुझी वाईट वेळ आलीच समज.’ यावर विक्रमला फारच राग आला की, ‘हा पाकिस्तानी असून मला धमकी देतोय.’
अल्लाह की कसम हम सब यहां से चले जाएंगे…
कारगिल युद्धामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांना पॉईट 5140 वर विजय मिळवल्यानंतर लेफ्टनंट पदावरुन कॅप्टन पदावर बढती देण्यात आली होती. ज्यानंतर पॉईंट 4875 पुन्हा भारताच्या ताब्यात आणण्यासाठीची जबाबदारी त्यांनी टीम डेल्टासोबत आपल्या खांद्यावर घेतली.
त्याचवेळी पाकिस्तानच्या बाजुनं एकाने गोळीबार सुरु असतानाच ‘अबे माधुरी दीक्षित हमें दे दे, अल्लाह की कसम हम सब यहां से चले जाएंगे… ‘, असं म्हटलं होतं.
त्यानंतर विक्रमने त्यांना उत्तर दिलं होतं की, ‘पुढच्या 1 तासात पाहू या टेकडीवर कोण टिकतं.’ तेव्हा एक पाकिस्तानी सैनिक म्हणाला की, ‘आम्ही तुम्हाला आणि हरवू आणि तुमच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना (माधूरी दीक्षितला) घेऊन जाऊ.’
शांतपणे ग्रेनेड बॉम्ब टाकला
आपल्याला चिथवलं जात असल्याचं पाहून विक्रम बत्रा यांनी पाकिस्तानच्या या उद्दामपणाला उत्तर देत म्हटलेलं, ‘माधुरी दीक्षित तो दूसरे टाइप की शूटिंग में बिजी हैं, फिलहाल इससे काम चला लो’. त्यानंतर विक्रम यांनी त्या टेकडीवर तिरंगा फडकवण्याआधी तिथे अगदी शांतपणे ग्रेनेड बॉम्ब टाकला आणि म्हणाला की, ‘तुम्हा सर्वांना माधुरी दीक्षितकडून लहानशी भेट.’ यानंतर संपूर्ण त्यांच्या बखरी बरखास्त करून तिथे तिरंगा फडकवण्यात आला.
अश्याप्रकारे भारताच्या सिमांवर हल्ला करणाऱ्या एका पाकिस्तानी सैनिकाने माधुरी दीक्षितला मागितलं होतं. त्यावर विक्रम यांनी दिलेल्या उत्तराने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली होती.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम