Take a fresh look at your lifestyle.

सुशांत शेवटचं काय व्यक्त झाला होता ?

0

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने काल मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. आपल्या नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केली, अस सांगण्यात येतेय. सुशांतच्या आत्महत्येने एकाकीपण, मानसिक संतुलन याबद्दल नव्याने चर्चा सुरु झाली.

सुशांतच्या सोशल मीडियातील पोस्ट पाहता तो सोशल मिडीयावर देखील खूप सक्रीय नव्हता. पण सोशल मीडियातील त्याच्या जुन्या पोस्ट पुन्हा चर्चेत आहेत.

“Men have emotions too so don’t be shy to cry. It’s okay to let it out and not hold it inside. It’s not a weakness but a sign of strength. Be man enough to feel. Feeling is human”

एका जिलेट जाहिरातीच्या विडियोक्लिप सोबतचं हे ट्वीट सुशांत सिंह राजपूतने १९ नोव्हेंबर २०१९ ला केलंय. साधारण सहा महिन्यांपूर्वीचं ट्वीट. त्यानंतर अशा प्रकारचं मनातल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भावना व्यक्त करणारं ट्वीट त्याने केलेलं नाही. २७ डिसेंबरनंतर कोणतंही ट्वीट त्याने केलेलं नाही.

३ जूनला तो इन्स्टाग्रामवर आईबद्दल भावना शेअर करताना दिसतो. त्याचा नैराश्येवस्थेचा काळ साधारणतः गेल्या सहा महिन्यांतलाच सांगितला जातो. पण सुशांतच्या वर्तनातला बदल सोशल नेटवर्किंगवर त्याच्या फाॅलोअर्सना दोन वर्षांपूर्वीच जाणवला होता, जेव्हा त्याने त्याचे इन्स्टाग्रामवरचे सगळे फोटो डिलिट केले होते. तो नंतर विज्ञानवगैरेशी निगडीत पोस्टींग करायला लागला होता.

https://www.instagram.com/p/CA-S3cIDWOx/?utm_source=ig_web_copy_link

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.