Take a fresh look at your lifestyle.

इतर ऑनलाईन App पेक्षा E RUPI मध्ये काय वेगळ आहे ?

0

आतापर्यंत ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अगदी ओला ॲपवरूनही तुम्हाला कधी कधी डिस्काऊंट कूपन किंवा व्हावचर आलेलं असेल. त्यावर क्लिक केलंत की, तुम्हाला आत लिहिलेली सूट लागू होते किंवा इतर काही फायदे मिळतात. पण, आजपासून असाच एखादा मेसेज तुम्हाला केंद्र सरकारकडूनही येऊ शकतो.

म्हणजे सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला ते पैसे मिळवण्यासाठी बँकेत जावं लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयाचे खेटेही घालावे लागणार नाहीत.पैसे तुम्हाला एका मोबाईलच्या संदेशावर मिळतील. आणि त्यासाठी ई-रुपी हे डिजिटल ऑनलाईन चलन वापरण्यात येईल.

ई-रुपी म्हणजे काय?

ई-रुपी(e-RUPI) हे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट माध्यम असेल जे लाभार्थीच्या मोबाईल फोनमध्ये एसएमएस-स्ट्रिंग किंवा क्यूआर कोडच्या स्वरूपात येईल. सुरुवातीला, हे प्रीपेड गिफ्ट-व्हाउचरसारखे असेल.

कोणत्याही स्वीकारलेल्या केंद्रांवर कोणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगशिवाय रिडीम केले जाऊ शकते. ई-रुपी(e-RUPI) लाभार्थींना कोणत्याही फिजिकल इंटरफेसशिवाय डिजिटल सेवांच्या प्रायोजकांशी जोडेल.

हे व्हाउचर कसे जारी केले जातील?

ही प्रणाली एनपीसीआयने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर विकसित केली आहे आणि हे व्हाउचर जारी करण्याचे काम करतील अशा बँकांचा यात समावेश आहे. कोणत्याही कॉर्पोरेट किंवा सरकारी एजन्सीला हे मिळवण्यासाठी भागीदार बँकांशी संपर्क साधावा लागेल जे खाजगी आणि सरकारी दोन्ही असू शकतात.

यासह, ही माहिती देखील द्यावी लागेल की ती कोणासाठी आणि कोणत्या उद्देशाने घेतली जात आहे. लाभार्थी त्यांच्या मोबाईल क्रमांकाद्वारे ओळखला जाईल कोणत्याही व्यक्तीच्या नावाचे व्हाउचर बँकेकडून सेवा प्रदात्याला फक्त त्या व्यक्तीला दिले जाईल.

E RUPI व्हाउचर्स कसे वापरावेत

व्हाउचर्स E गिफ्ट कार्ड सारखे आहे. कार्ड्स चा कोड एसएमएस किंवा QR कोड द्वारे पाठवला जातो. हे व्हाउचर्स व्यक्ती आणि उद्देश विशिष्ट असतील.उदा. जर तुमच्या कडे E RUPI व्हाउचर्स कोविडची लस घेण्यासाठी असेल तर तुम्ही ते व्हाउचर्स फक्त लसीसाठीच वापरू शकता.
ई-रुपी कुठे वापरता येईल?

सरकारच्या मते, ई-रुपी कल्याणकारी सेवांच्या लीक-प्रूफ वितरणाची पडताळणी करेल. आई आणि बालकल्याण योजना, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि खत अनुदानाअंतर्गत सुविधा आणि औषधे उपलब्ध करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

यासह, सरकारने असेही म्हटले आहे की, खाजगी क्षेत्र आपल्या कर्मचाऱ्यांना कल्याण आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमांतर्गत डिजिटल व्हाउचर देखील देऊ शकते.

e-RUPI ला नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाने आपल्या UPI प्लेटफॉर्मवर वित्त सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणसाठी तयार केले आहे.e-RUPI हा वेलफेयर सर्विस डेटा लीक होण्यापासून वाचवण्यासाठी त्या दिशेने टाकलेलं एक क्रांतीकारी पाऊल आहे.

याचा वापर आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सबसिडी सारख्या योजनांमध्ये होऊ शकतो. या शिवाय मातृ एवं बाल कल्याण योजना, टीबी उन्मूलन कार्यक्रम, औषधं आणि पोषण मदत यासारख्या योजनांमध्ये सेवा देण्यासाठी ही होऊ शकतो.

इतर ऑनलाईन अप्स पेक्षा E RUPI मध्ये काय वेगळ आहे

E RUPI अप्स नाही आहे. हे व्हाउचर्स फक्त विशिष्ट सेवेसाठी उपयोगी येणार. E RUPI व्हाउचर्स चा उद्देश विशिष्ट आणि ज्याच्या कडे बँक खाते नाही, स्मार्टफोन किंवा डिजिटल पेमेंट ऍप चा उपयोग नाही करत त्यांच्यासाठी ई रुपी व्हाउचर्स फायदेशीर आहे. याच मुळे E RUPI पेमेंट प्रणाली वेगळी आहे. हे व्हाउचर्स आरोग्य संबंधित पेमेंट्ससाठी वापरले जातील. कॉर्पोरेट हे व्हाउचर्स त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वापरू शकतात.

केंद्राने आधी म्हटले होते कि ते लसीसाठी ई व्हाउचर्सचा पर्याय आणेल, एखादा व्यक्ती खाजगी रुग्णालयात लसीकरणासाठी ई व्हाउचर्स ची खरेदी करू शकेल आणि दुसऱ्या व्यक्ती भेट देऊ शकेल.

जो व्यक्ती व्हाउचर्स खरेदी करत आहे आणि ज्या व्यक्तीला देत आहे तो त्या व्हाउचर्स कुठे उपयोगात येत आहे याची माहिती घेऊ शकतो. गोपनीयता हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण लाभार्त्यांना त्यांचे वैयक्तिक तपशील शेअर करावे लागणार नाहीत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.