हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्यामागे काय इतिहास आहे
कधीकधी इतिहास आणि काल्पनिक कथा यात फरक करणं खूप चांगलं ठरतं. उदाहरणार्थ, सलीम आणि अनारकली दंतकथेची कथा. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही एक काल्पनिक कल्पना आहे, पण काही तज्ज्ञांनी ही कथा ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.
अशा घटनांचे रुपांतर पुस्तकांमध्ये किंवा पिक्चरमध्ये करण्याने काही विशेष फरक पडत नाही. पण अशा घटनांच्या आधारे एखाद्या शहराचे नामांतर करण्याचा विचार केल्यास याचा पुनर्विचार करायला पाहिजे. अशीच एक ताजी घटना सध्या चर्चेत आहे. ती म्हणजे हैदराबादचे नाव पुन्हा एकदा भागमतीच्या कथेच्या आधारावर भाग्यनगर करायचे.
काय आहे प्रकरण
सध्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेचा निवडणुक प्रचार चालू आहे. भाजपकडून स्टार प्रचारक म्हणून रॅलीत पोहोचल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा आपली जुनी भूमिका मांडली.
योगींनी पुन्हा एकदा हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे करण्याचे समर्थन केले. भाग्यनगर हे नाव संबंधित प्रेमकथेशी संबंधित आहे. ज्यात मुख्य पात्र नृत्यांगना भागमती होती. ही गोष्ट आणि त्याचे ऐतिहासिक संदर्भ जाणून घेऊया.
भागमती कोण होती ?
सुमारे ५०० वर्षांपूर्वी हैदराबाद प्रांतातील चिचलम गावात किंवा या गावाची मालकी असलेली भागमती हिंदू नृत्यांगना होती. कुली कुतुब शाह (१५८०-१६११) दक्षिण भारतातील पाच सल्तनतींपैकी एक असलेल्या गोवळकोंडा राजवंशात शासक बनला आणि त्यानंतर हैदराबाद शहराची स्थापना केली. या नवीन शहराच्या स्थापनेनंतर या शहराला ‘भागनगर’ हे नाव देणे म्हणजे कूली कुतुब आणि भागमती च्या प्रेमकथेचा परिणाम मानला जाते.
असं सांगितले जाते कि,
शाह भागमतीच्या नृत्य कौशल्याने आणि सौंदर्याने प्रचंड आकर्षित झाले आणि पहिल्यांदा पाहिल्यानंतरच ते भागमतीच्या प्रेमात पडले. परंतु शाह यांचे वडील इब्राहिम कुतुब शाह यांना हे प्रेम मान्य नव्हते.
पण दोघांचे प्रेम पाहता त्यांचे हृदय वितळले आणि १५८९ साली त्यांनी शहजादे कुली कुतुब यांच्याशी भागमतीचा विवाह पार पडला. गोवळकोंडा सल्तनतीत सामील झाल्यानंतर कुली कुतुब यांनी भागमतीच्या नावाने भागनगर अश्या नावाने हे गाव वसवण्यात आले होते त्याला नंतर हैदराबाद असे नाव देण्यात आले.
त्याला हैदराबादचे नाव देण्यात आले कारण कुतुब शहाने आपल्या प्रेमिकेला आणि पत्नीला हैदर महाल ही पदवी दिली होती. मागच्या काही वर्षापासून हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याविषयी बरीच चर्चा चालू आहे. योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या घोषणेने यावर पुन्हा नव्याने चर्चा चालू झाली आहे.
बाकी नाव बदलेल कि नाही हे मात्र आताच सांगणे अवघड आहे. पण योगी आदित्यनाथ यांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता भविष्यात असं काही होणार नाही. असं म्हणनही जरा अवघड आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम