१२०० रुपये गुंतवायचे आणि हजारो कमवायचे ! अश्या स्क्रीम येतात तरी कुठून ?
तुम्ही गावाकडून पुण्यात शिकायला आलेले असता आणि जेव्हा तुम्हाला वेळ भेटतो तेव्हा तुम्ही निवांत एखाद्या जागी रस्त्याच्या कडेला बसलेले असता. आणि आयुष्याबाबद्दल विचार करत आहात.
अश्यातच एक सुंदर मुलगी तुमच्याजवळ येऊन म्हणाली की “तुम्हाला महिन्याभरात गाडी भेटेल आणि एवढे पैसे तुम्ही एका महिन्यात कमवू शकतात”
असं ऐकल्यावर ते गावाकडून आलेल पोरग त्या पोरीला आणि तिच्या इंग्रजी ला पाहून आधीच अर्ध गार व्हायचं आणि हे गाडीचं ऐकून तर ते पोरगा पूर्ण गार व्हायचं. कोण कुठली ही. पण हि स्वतःहून येऊन आपल्याशी बोलली. आणि ते देखील आपुलकीने या भानगडीत पोरगा आपल्याला बापाने कर्ज काढून शिकायला पाठवलेला आहे. हे विसरून त्या स्कीम च्या नदी लागून गल्लोगल्ली फिरायचा.
अश्या अनेक लोकांची ज्या स्कीम न वाट लावाली आज त्या स्कीम बद्दल जाणून घेऊ.
काय होती स्कीम ?
अश्या अनेक स्कीम आहेत पण आपण उदाहरण म्हणून इबिझ ची स्कीम बघू . स्कीम तशी वाईट नव्हती कारण ७ हजारात तुम्हाला एक सिडी मिळायची. ऑनलाईन कोर्स यामध्ये असायचे. कोर्स कशे तर तर बेसीक लॅग्वेज कोर्स असायचे. C, CPP सारखे कोर्स किंवा वेगवेगळ्या भाष्यांच्या कोर्स च्या सिड्या या मध्ये मिळत असत . मार्केटमध्ये जावून असे कोर्स करायचे असतील तर दहा वीस हजार खर्च व्हायचे असे कोर्स ७ हजारात मिळायचे.
तर ७ हजार देवून सभासद झाल्यानंतर लागलीच दोघांना तयार करायच. आपल्या खाली त्यांना सभासद करायचं. ते दोघं अजून दोघा दोघांना सभासद करणार. म्हणजे टोटल झाले सभासद झाले सहा. तुम्ही फक्त दोनच सभासद केले पण आत्ता झाले सहा. अशाप्रकारे संख्या वाढत जाणार. प्रत्येक सभासदामागे तुम्हाला काही रक्कम कमीशन म्हणून मिळणार.
अनेक तरुण यामध्ये गुंतले जायचे
एका महिन्यात बाईक आणि आणि दुसऱ्या महिन्यात चारचाकी आणि तिसऱ्या महिन्यात चक्क घर नेमही सांगताना कंपनी कडून असाच सांगितल्या जायचं त्यामुळे रक्त सळसळ असणारे तरुण आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि ते पण झटपट त्यामुळे अनेक तरुण या जाळ्यात ओढल्या जायचे.
मग पोरंग ७ हजार भरून सभासद व्ह्ययाच. आत्ता प्रत्येकजण आपल्या खालचे दोघेजण शोधू लागला. गल्लीतली पोरं, नातेवाईक मित्र हमखास शिकार होवू लागले . त्यांच्याकडून सात हजार घेवून सभासद केलं जावू लागलं. आत्ता या ठिकाणी समोरच्याला सभासद करण्याची जबाबदारी याच पोरांची असल्याने त्यांनी एक फॅड आणलं. पॅन्ट , शर्ट आणि टाय घालून ही पोरं हिंदीतून किंवा इंग्रजीतून बोलू लागली त्यामुळे गावाकडची आलेली भोळीभाबडी पोर यात ओढली जाऊ लागली.
पोरं गल्लीभर फिरू लागली.
पोरांच्या बापानं पतसंस्थेचं कर्ज काढून पोराला इंजिनिरींगला शिकवायला पाठवलेल असल्याचं. पोरगं आपल्याला सर म्हणल्यानंतर तो हवेत जात असे. मग तो देखील पैसे लावायचां. मिळालेला ऑनलाईन कोर्सची सिडी टॅक्टरमध्ये लावून प्ले करायचा अयशस्वी प्रयत्न करायचा. ठिकठिकाणी टाय घातलेली पोरं दिसू लागली.
वरच्या थरावर पोहचलेल्यांनी बाईक घेतली देखील आणि आत्ता “दिल्ली दूर नहीं” या स्वप्नात पोरं गल्लीभर फिरू लागली.
पण या सगळ्यामध्ये वरच्या फळीतील लोकांनी बाईक काढली आणि चारचाकी देखील काढली पण हे आपल गावाकडचं पोरगा मात्र गल्लोगल्ली फिरत राहिल त्याच्या नशिबी फक्त सर आणि मॅडम म्हणन आणि ज्या लोकांना त्यांन यामध्ये ओढलं अश्या लोकांच्या शिव्या खाण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय त्याच्या कडे उरला नव्हता.
स्किमच इनलिगल असल्याचं सांगितलं
कंपनी फसल्याची कारणे अनेक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कंपनीचे प्रॉडक्ट म्हणजे भूलथाप होती. या सात हजारांमध्ये काहीना काही ग्राहकांना मिळालं असतं तरी डेड झालेल्या चेनमधील लोकांनी दंगा केला नसता. दूसरी गोष्ट म्हणजे या कंपनीने पळवाट शोधत सरकारचा टॅक्स चुकवला. त्यामुळे सरकारने आपली कंबर कसली आणि थेट कंपनीची स्किमच इनलिगल असल्याचं सांगितलं.
त्यामुळे आजवर कंपनीने केलेल्या टर्नओव्हरचा अंदाज लावून ५ हजार कोटींचा घपला केल्याबद्गल कंपनीच्या मालकांना अर्थात पवन मल्हान आणि त्यांचे पुत्र ह्रितिक मल्हान यांना ऑगस्ट २०१९ साली अटक करण्यात आली.
लॉकडाऊन मध्ये पुन्हा आली नवीन इबिझ सारखी स्कीम
त्यामुळे इबिझ इथं संपलं. त्याला पुढे काही भविष्य दिसत नसल्याने पोरांनी हे थांबवलं. पण आता लोकडाऊन मध्ये सगळे घरी असताना असाच एक प्रयोग पुन्हा एकदा काही कंपन्यांनी ऑनलाईन सुरु केला. लोकांना देखील लॉकडाऊन मध्ये घरी बसून काही काम नव्हते त्यामुळे त्यांनीदेखील यामध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली. १२०० रुपये गुंतवायचे आणि २० रुपये तुम्हाला रोज मिळणार अशी काय ती स्कीम.
आता पुन्हा गावाकडे हे पोर लॉकडाऊन मध्ये डिजिटली डोकं लावून व्हाट्सअँप फेसबुक च्या माध्यमातून यासाठी बकरे शोधू लागली आणि डिजिटल असल्यामुळे या स्कीम च लोन गावापर्यत पोहचल आहे. आणि आपले काही बहाद्दर देखील या कंपन्यांची तुफान स्टेटस टाकून मार्केटिंग करत असतात यांना तर तेच हवय मल्टि लेव्हल मार्केटिंग(MLM).
MLM म्हणजे काय ?
MLM म्हणजे मल्टि लेव्हल मार्केटिंग. यात कस असतं तर एकाखाली एक ग्राहक तयार करायचे असतात. म्हणजे काय तर तुम्ही टिव्हीवर एखाद्या बिस्किटची जाहिरात पाहता. त्याचं मार्केटिंग कस अस तर, ती कंपनी प्रॉडक्ट काढते. प्रॉडक्ट काढलं की ते होलसेलवाल्यांकडे जातं. ते यावर ठरावीक रुपये कमिशन घेतात. नंतर ते रिटेल वाल्याकडे जातं. तो ठरावीक कमिशन घेतो. तिथून तुमच्या हातात एका विशिष्ठ किंमतीला हे प्रॉडक्ट येत. यात सर्वांच कमिशन आणि जाहिरात हा खर्च आला.
MLM सिस्टिम हाच खर्च वजा करून थेट तुमच्या हातात प्रॉडक्ट देतं. मग यासाठी जाहिरात कशी करायची तर कंपनीचा ग्राहक तोच जाहिरातदार. म्हणजे तू बिस्किट घ्यायचं आणि पुढेच्या दोन माणसांना सांगायचं बिस्किट छान आहे विकत घे. त्याने बिस्किट घेतलं की त्याचं कमिशन तुला.
एकाखाली एक ग्राहक तयार करणारी MLM सिस्टिम. यानुसारच Amway चे प्रोडक्ट विकत असतात. याच सिस्टिमवर आधारित ईबीजने मार्केटमध्ये उतरली होती. पण जगातली हि एवढी चांगली चांगली गोष्ट भारतात मात्र वेगळ्याच गोष्टींसाठी वापरली गेली.
अश्याच गोष्टी अनेक कंपन्या आजदेखील भारतात ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन पण या पद्धतीने काम करत आहेत. पण एवढा मात्र नक्की यामध्ये आपण कुठे तरी या कंपनी च्या जाळ्यात ओढल्या जात आहोत का ? यामुळे मात्र आपलेच अनेक वर्षांचे असलेले चांगले संबंध अश्या फ्रॉड कंपन्यांमुळे धोक्यात तर येत नाही आहेत ना हे बघितलं पाहिजे.
आणि हो जर अशे फुकट पैसा भेटला असता तर जगात आज प्रत्येक जण अंबानी राहिला असता एवढं मात्र नक्की. त्यामुळे मेहनत करा मेहनतीला पर्याय नाही शांत बसून काही होत नसते.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम