Take a fresh look at your lifestyle.

विलासराव देशमुख विक्रम गोखले बाईकवरून पुण्यात डबलसीट फिरायचे

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी काम केले आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांना उजाळा

0

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८२ वर्षांचे होते.

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी काम केले आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांना उजाळा

तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा

विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या.

1913 मध्ये दुर्गाबाईंनी चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या संगीत उ:शाप या नाटकात कमलाबाईंनी भूमिका केली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी 71 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. 

विलासराव देशमुख यांच्यासोबत बाईकवरून पुण्यात फिरायचे

विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. पण त्याच्या खूप आधीचा हा किस्सा आहे. लातूरहून विलासराव पुण्याला शिकायला आहे. पुण्याच्या गरवारे कॉलेजला शिकायला आले. त्याचवेळी विक्रम गोखले देखील गरवारे मध्येच शिकत होते.

विलासराव आणि विक्रम गोखले यांच्यात समान धागा म्हणजे नाटक.

यातून गट्टी जमली आणि मग विलासरावांच्या फेमस जावा बाईकवरून त्यांनी सोबत अनेक चक्कर देखील मारल्या होत्या. त्यांनतर काही वेळा विक्रम गोखले विलासरावांच्या बाभूळगावच्या घरीही गेले होते. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांनी एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला होता. 

मराठी मालिकांवर टीका केली होती

विक्रम गोखले यांनी चित्रपटासोबत अनेक मालिकांमध्येही काम केलं होत. पण मालिकांच्या कंटेंटच्या पातळीवर त्यांनी टीका केली होती. एका व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी प्रेक्षकांना त्यांनी सल्ला दिला होता, ‘प्रेक्षकांनो, भिकार मालिका बघणं बंद करा. स्वतःचा चॉईस तपासून बघा.’ असं ते म्हणाले होते.

पैशांसाठी अगदी अर्थहीन, सुमार मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जातात. कशाचीही भर घालून मालिका उगाच वाढवल्या जातात. अशा भिकार मालिका बघू नका.  ‘तुमचा चॉईस तपासा, त्यावर बंधने घाला. उगाच वाढवलेल्या मालिका बघून काय मिळतं? तुमचा अमूल्य वेळ या गोष्टींमध्ये वाया घालवू नका.’ असा सल्ला त्यांनी दिला होता.

राष्ट्रीय पुरस्कार खूप आधी मिळायला हवा होता

अभिनय क्षेत्रात तब्बल पाच दशकांहून अधिक काळ काम केल्यांनतर  २०१३ मध्ये अनुमती या चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळाल्यांनतर अमिताभ बच्चन यांनी विक्रम गोखले यांना पत्र लिहले होते.

त्या पत्रामध्ये अमिताभ बच्चन म्हणाले होते कि “विक्रम ये तो बहोत पहेले मिलना चाहिये था” . विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार इरफान खान यांच्याबरोबर विभागून मिळाला होता.

विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.