Take a fresh look at your lifestyle.

सायकलच्या दुकानापासून सुरुवात करून त्यांनी १० हजार कोटींचा उद्योग उभा केला

आज महाराष्ट्रात कदाचित कोणी असा माणूस सापडणार नाही ज्याला किर्लोस्कर उद्योग समूह माहिती नाही.

0

आपण आज नाही तर आपण गेल्या अनेक पिढ्यांपासून ऐकत आलो आहे की मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही. पण एका माणसाने मराठी माणसांवरती लागलेला हा आरोप पुसून टाकला.

सध्या पेरणीचा हंगाम आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आज शेतात काम काम करताना नांगराची गरज हि लागतेच तोच नांगर ज्या मराठी माणसाने बनवला आज आपण त्यांच्या बद्दल माहिती पाहणार आहोत.

त्या मराठी माणसाचं नाव म्हणजे उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर.

वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म 20 जून 1869 रोजी कर्नाटकात गुर्लहोसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धारवाड व कलादगी येथे झाले. लहानपणापासूनच त्यांना यांत्रिक वस्तूंचे प्रचंड आकर्षण होते, तसेच ते चित्रकलेतही पारंगत होते.

1885 साली वडिलांच्या इच्छेविरुद्ध आणि मोठ्या भावाच्या मदतीने लक्ष्मणराव आणि मुंबईचा जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतली.त्यांना काही कारणामुळे माघार घ्यावी लागली पण त्यांनी तिथेच मुंबई मध्ये मेकॅनिकल ड्रॉईंग शिकायला सुरुवात केली.

V.J.T.I च्या यंत्रशाळेमध्ये जाऊन शिकायचे यंत्रसामुग्रीचं काम

पुढे त्याच शिक्षणाच्या जोरावर विक्टोरिया टेक्नीकल इन्स्टिटयूटमध्ये कला शिक्षक आणि बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून त्यांनी केवळ 45 रुपये महिन्यावर काम करण्यास सुरुवात केली. प्रोफेसरसारखी मानाची नोकरी मिळवल्यानंतरही लक्ष्मणरावांची यांत्रिकीविषयी असणारी मूळची आवड अजिबात बदललेली नव्हती. V.J.T.I च्या यंत्रशाळेमधल्या तत्कालीन आधुनिक यंत्रसामुग्रीचं काम कसं चालतं, त्याची दुरुस्ती वगैरे लक्ष्मणरावांनी अल्पावधीमधेचं शिकून घेतली.

मुंबई सोडून ते बेळगावात आले

पुढे 1888 मध्ये मुंबई सोडून ते बेळगावात आले आणि त्यांनी बेळगावात जाताच सायकल दुरुस्तीचे दुकान थाटले. या दुकानाच्या माध्यमातुन त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकले. ह्या काळामधे त्यांनी मुंबईहून सायकली विकत घेऊन त्या बेळगावमधे वडील बंधू रामण्णा ह्यांच्या मदतीने विकायचा व्यवसाय चालू केला. नुसती सायकल ते विकत नसत तर ज्यांना सायकल चालवायला जमत नसे त्यांच्याकडुन अल्प मोबदल्याच्या बदल्यात त्यांना सायकल चालवायलाही शिकवत असत.

मिळेल तो व्यवसाय केला

पुढची काही वर्ष त्यांनी मिळेल तो व्यवसाय केला आणि तो यशस्वीरीत्या केला . त्यांनी युरोपातून पवनचक्क्या विकत घेऊन त्या भारतामधे विकल्या, औंधच्या राजघराण्याच्या कुलदैवताच्या मुर्तीला इलेक्ट्रोप्लेटिंग करुन मुलामा चढवून दिला, लोखंडाच्या आणि लाकडाच्या खिडकीदरवाज्यांच्या चौकटी बनवून त्या गृहनिर्माण व्यावसायिकांना विकल्या अश्या प्रकारे अनेक प्रकारचे व्यवसाय लक्ष्मणराव करत गेले.

“किर्लोस्कर ब्रदर्स” या नावानं कारखाना सुरु केला

पुढे त्यांनी १९०१ च्या सुमारास त्यांनी छोट्या प्रमाणावर कडबा-कुटार कापायच्या यंत्रांची निर्मिती सुरु केली. त्याची योग्य प्रमाणात विक्री झाल्याने त्यांच्यासमोर नवीन लक्ष्यं उभं राहीलं ते म्हणजे ओतकाम करुन बनवलेल्या लोखंडी नांगराच उत्पादन करण्याच. पुढे 1910 मधे लक्ष्मणरावांनी “किर्लोस्कर ब्रदर्स” या नावानं कारखाना सुरु केला . या कारखान्यात शेतीव्यवसायासाठी लागणाऱ्या नांगर, मोटार, रहाट, चरक यांसारख्या वस्तूंचे उत्पादन सुरू केले.

आज महाराष्ट्रात कदाचित कोणी असा माणूस सापडणार नाही ज्याला किर्लोस्कर उद्योग समूह माहिती नाही. आज किर्लोस्कर उद्योग समूह हा प्रचंड मोठा उद्योग समूह झालेला आहे. त्यामाध्यमातून आज अनेक लोकांना ना किर्लोस्कर उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे .

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.