Take a fresh look at your lifestyle.

तर कदाचित सुनील गावसकर क्रिकेटपटू बनू शकले नसते

0

१९७१ साली वेस्ट इंडीज टीमला वेस्ट इंडीज मध्येच हरवण्यात भारताच्या टीमला पहिल्यांदा यश आले होते. त्याच वेळी भारत वेस्ट इंडीज सोबतची पहिली सिरीज जिंकला होता. ती सिरीज जिंकण्यात एका भारतीय बॅटसमन चा मोठा सहभाग होता.

तो बॅटसमन म्हणजे सुनील गावसकर. आज १० जुलै, सुनील गावसकर यांचा वाढदिवस.

१९७१ सालच्या त्या सिरीजमध्येच सुनील गावसकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सिरीज मध्ये ४ मॅच मध्ये ७७४ रन काढल्या होत्या. त्यात एक द्विशतक, ४ शतक आणि ३ अर्धशतक असा रेकॉर्ड केला होता.

सुनील गावसकर यांचा त्या सिरीजमधला पहिल्या सिरीज मध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड आजपण त्यांच्याच नावावर आहे.

सुनील गावसकर यांचे क्रिकेटचे अनेक किस्से तुम्ही आजवर अनेक ठिकाणी वाचले असतील, पण त्यांच्या लहानपणी एक असा प्रसंग घडला होता. जो अनेक लोकांना माहितही नसेल. त्या प्रसंगामुळे कदाचित ते क्रिकेटर बनुही शकले नसते.

त्यांच्या आयुष्यातील हाच किस्सा स्वतः सुनील गावसकर यांनीच आपल्या आत्मचरित्र “Sunny Days” मध्ये लिहला आहे. यात गावसकर लिहितात ; ‘मैं कभी क्रिकेटर नहीं बना होता और न ही यह किताब लिखी गई होती… अगर मेरी जिंदगी में तेज नजरों वाले नारायण मासुरकर नहीं होते.’

गावसकर यांनी लिहले आहे, त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे काका त्यांना हॉस्पिटल मध्ये पाहायला आले होते. तेव्हा त्यांनी सुनील यांच्या कानावरची जन्मखून पहिली होती.

परंतु दुसऱ्या दिवशी तेव्हा ते पुन्हा हॉस्पिटल मध्ये आले तेव्हा त्यांनी लहानग्या सुनील यांना हातात घेतले तेव्हा त्यांना त्यांच्या कानावरची ती जन्मखून दिसली नाही. त्यानंतर त्यांनी पूर्ण हॉस्पिटल चेक केले. तेव्हा त्यांना सुनील एका मच्छिमाराच्या बायकोपाशी झोपलेले दिसले.

आपल्या पुस्तकात गावसकर यांनी लिहले आहे, हॉस्पिटल नर्सच्या चुकीमुळे त्यांना त्या ठिकाणी झोपवले गेले. कदाचित बाळांना अंघोळ घालताना चूक झाली असावी.

त्या दिवशी जर त्यांच्या काकांनी लक्ष दिले नसते तर कदाचित सुनील मच्छीमार बनले असते.

सुनील गावसकर यांनी 16 वर्षाच्या (1971-1987) आपल्या टेस्ट करियरमध्ये 34 शतकांसह 10,122 रन (125 टेस्ट) केल्या आहेत. त्यांच्या बॅटिंगची सरासरी 51.12 राहिली. गावसकर यांच्या 34 शतकांचे रेकॉर्ड 2005 साली सचिनने तोडले.

कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम करणाऱ्या गावसकर वन डे क्रिकेटमध्ये 108 वनडे मॅच मध्ये 35.13 च्या सरासरीने 3092 रन करू शकले. तर 108 मॅचमध्ये फक्त एकच शतक ते करू शकले तेही 107 व्या वन डे मॅचमध्ये.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.