Take a fresh look at your lifestyle.

…जेव्हा रतन टाटा यांनी आपल्या अपमानाचा बदला आपल्या कामातून घेतला

0

भारतातील अनेक औद्योगिक घरांना उद्योगसोबत राजकारणात रस आहे असे दिसते. पण टाटा समूह आणि विशेषतः रतन टाटा यांनी या गोष्टी नेहमीच टाळल्या आहेत. आपल्या आयुष्यात रतन टाटांनी कामालाच सर्वस्व मानले आहे . आणि त्यांनी कामालाच प्राधान्य दिले आहे. 

 रतन टाटा हे एक प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे सेवामुक्त अध्यक्ष आहेत. 1991 ते 2012 दरम्यान ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. २८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण तरीही ते टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा टी, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस सारख्या सर्व प्रमुख टाटा समूहाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने नव्या उच्चांकाला स्पर्श केला आहे  .

जन्म आणि शिक्षण 

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी भारताच्या सुरत शहरात झाला. रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र आहे. नवजाबाई टाटा यांनी दत्तक घेतलेले नवल टाटा यांचे पुत्र आहेत. रतन दहा वर्षांचे होते  आणि त्याचा धाकटा भाऊ जिमी सात वर्षांचा होता तेव्हा त्याचे आईवडील (नवल आणि सोनू) १९४० च्या दशकाच्या मध्यात एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर दोन्ही भावांचे संगोपन त्यांची आजी नवजाबाई टाटा यांनी केले.  रतन टाटा यांना नोएल टाटा नावाचा सावत्र भाऊही आहे.

रतन टाटा यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील कॅम्पियन शाळेमधून आणि माध्यमिक  शिक्षण  कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेमधून झाले. त्यानंतर त्यांनी १९६२ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगने बीएस आर्किटेक्चर पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९७५ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्रॅम पूर्ण केला.

कारकीर्द

भारतात परतण्यापूर्वी रतन टाटा यांनी  कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील जोन्स आणि अम्मन्समध्ये काम केले. त्यांनी 1961 मध्ये टाटा समूहापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ते टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर काम करत होते. त्यानंतर ते टाटा समूह आणि कंपन्यांमध्ये सामील झाले. १९७१ साली त्यांची नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे (नेल्डो)  चे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८१ मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनवण्यात आले. १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांनी समूहाचे अध्यक्षपद सोडून रतन टाटा यांना उत्तराधिकारी बनवले.

रतन यांच्या नेतृत्वाखालील टाटा समूहाने नव्या उंचीला स्पर्श केला. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने वेगाने वाढली . . १९९८ मध्ये टाटा मोटर्सने पहिली पूर्णपणे भारतीय प्रवासी कार – टाटा इंडिका सुरू केली. त्यानंतर टाटा यांनी माघे वळून बघितलेच नाही , टाटा मोटर्सने ‘जॅग्वार लँड रोव्हर’ आणि टाटा स्टील विकत घेतले, ज्यामुळे भारतीय उद्योगातटाटा समूहाची विश्वासार्हता प्रचंड वाढली. टाटा नॅनो ही जगातील सर्वात स्वस्त प्रवासी कार आहे हीदेखील रतन टाटा यांची कल्पना होती .

२८ डिसेंबर २०१२ रोजी रतन टाटा हे टाटा समूहाच्या सर्व कार्यकारी जबाबदाऱ्यांमधून निवृत्त झाले. त्यांच्या जागी ४४ वर्षीय सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. टाटा आता निवृत्त झाले असले तरी ते कामात गुंतले आहेत. रतन सध्या टाटा समूहाचे निवृत्त अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते टाटा सन्सच्या ट्रस्टचे अध्यक्षही आहेत.

भारतातील तसेच इतर देशांतील अनेक संस्थांमध्येही रतन टाटा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य आणि नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिरियडनेस कौन्सिलचे सदस्य आहेत. 

 लग्न होणारच होत … 

रतन टाटा यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये नोकरी केली. त्या दिवसांच्या आठवणीत रमताना ते सांगतात, “हवा खूपच छान होती, माझ्याकडे गाडी होती आणि माझं माझ्या नोकरीवरही खूप प्रेम होतं…याच दिवसांत मी एका मुलीच्या प्रेमात पडलो”. रतन टाटा तिच्याशी लग्नही करणार होते पण त्याचवेळी त्यांच्या मोठ्या बहिणीची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना भारतात यावं लागलं.

ज्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते ती आपल्यासोबत भारतात येईल, असं रतन टाटांना वाटलं होतं पण त्याचवेळी भारत-चीनचं युद्ध सुरू झालं आणि त्यामुळेच त्या मुलीचे आईबाबा तिला भारतात पाठवायला तयार नव्हते, त्यानंतर हे नातं तुटलं. आपल्याला माहिती आहे की, रतन टाटा यांनी कधीच विवाह केला नाही.

अपमानाचा बदला …. चांगल्या कृतीतून 

रतन टाटा यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असताना त्यांचा एकदा खूप मोठा अपमान झाला. या अपमानाची धग त्यांच्या मनात कायम होती. याचा बदला बोलून नाही तर आपल्या चांगल्या कृतीनं करून दाखवण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्यांनी संपूर्ण जगाला करून दाखवलं.

1988 रोजी रतन टाटा यांनी टाटा मोटर्सची इंडिका कार लॉन्च केली होती. हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. रतन टाटा यांनी या प्रोजेक्टसाठी दिवस रात्र एक केले होते, मात्र काही कारणांमुळे त्यांना या प्रोजेक्टमध्ये यश मिळाले नाही. टाटा मोटर्सला मोठं नुकसान सहन करावं लागलं. नुकसान भरपाई करण्यासाठी शेअरहोल्डर्सने कंपनीना विकण्याचा सल्ला दिला.

रतन टाटा कंपनी विकण्याचा प्रस्ताव घेऊन अमेरिकेत फोर्ड मोटरच्या मुख्य ऑफिसमध्ये गेले. त्यांच्यासोबत कंपनीचे शेअर होल्डर्सही होते. फोर्ड कंपनीसोबत रतन टाटा यांची तीन तास मीटिंग चालली. 

 यादरम्यान, फोर्डच्या चेअरमनने रतन टाटा यांचा अपमान करत म्हटले की, ‘जर तुला व्यवसायाचं कोणतंही ज्ञान नव्हतं तर तू ही कार लॉन्च करण्यासाठी एवढा पैसा का गुंतवला. आम्ही तुझी कंपनी विकत घेऊन तुझ्यावर उपकार करत आहोत.’ कंपनी विकावी लागणार या विचारानेच रतन टाटा दुःखी होते. त्यात या बोलण्यामुळे ते पुन्हा दुखावले गेले . मीटिंग अर्ध्यावर सोडून ते भारतात परतले. यानंतर त्यांनी टाटा मोटर्स न विकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुन्हा एकदा शुन्यापासून उभे केले आणि यावेळी कंपनीला नफा झाला.

 भारत सरकारने रतन टाटा यांचा पद्मभूषण (2000) आणि पद्मविभूषण (2008) देऊन सत्कार केला. हे सन्मान देशातील तिसरे आणि दुसरे सर्वोच्च नागरी सन्मान आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.