Take a fresh look at your lifestyle.

कशी होती ‘राज’ यांची ‘राज’कीय एन्ट्री ?

राज्याच्या राजकारणात सध्या त्यांनी घेतलेल्या भोंग्याच्या भूमिकेमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. 

0

राज ठाकरे हे महाराष्ट्रच काय तर संपूर्ण देशात बहुचर्चित असे खास व्यक्तिमत्त्व आहे. एक कलाकार व एक राजकारणी असे दुहेरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत.

त्यांचे वडील श्री. श्रीकांत ठाकरे हे संगीत क्षेत्रातील त्याकाळातले मोठं नाव होत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी देहयष्टी, बोलायची पध्दत, वक्तृत्व, वैशिष्ट्यपूर्ण व्यंगचित्रकला, स्पष्टवक्तेपणा असे सर्व सर्व गुणविशेष त्यांना काकांकडून मिळाले.

एकत्र कुटुंब पद्धतीमधे श्री. राज यांना काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेकडून मोठे बाळकडू मिळाले.

पण शिवसेना काही त्यांना मिळाली नाही.  श्री. राज ठाकरे यांना त्याला सामोरे जावे लागले. शिवसेना सोडून त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने पक्ष स्थापन केला. असा नवीन पक्ष स्थापन करणे व तो राज्यस्तरावर चालवणे सोपं नसते, तसे पहील्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे १४ आमदार निवडुन आले होते. 

शिवसेनेत सक्रिय

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते होते. 1966 साली त्यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रभर पक्ष वाढवत नेला. कालांतरानं ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आले आणि शिवसेनेत सक्रिय झाले.

बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली होती.

विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा खूप मोठा वाटा होता.

आयुष्याला कलाटणी देणारा दिवस 

महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं. याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली  दिवस होता 30 जानेवारी 2003.  हा दिवस राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणारा दिवस  ठरला. यामुळे उद्धव हेच आता  शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 

छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे या मोठ्या नेत्यांनी सेना सोडलेली होतीच. पण , राज यांच्या जाण्यानं शिवसेनेतून पहिल्यांदा एक ‘ठाकरे’ बाहेर पडले.  27 नोव्हेंबर 2005 रोजी राज यांनी शिवसेना सोडली. नंतर 9 मार्च 2006 रोजी   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.राज ठाकरे यांनी पुढे स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल सुरू केली. 

खळ्ळ-फट्याक ही स्टाईल कायम

पक्ष स्थापन केल्यापासून मराठी माणूस व परप्रांतीय या दोन मुद्द्यांवर काम केले, आता हिंदुत्व हा सुद्धा मोठा मुद्दा त्यांनी घेतला आहे. विषय हाताळताना स्पष्टवक्तेपणा व परखड विचार हे त्यांनी कधी सोडले नाही.

आझाद मैदानावर रझा अकादमी विरुद्ध काढलेला मोर्चा असो वा टोलविरोधातले आंदोलन असो,अगदी  तबलिघी जमातीवर केलेले भाष्य असो, परखडपणा त्यांनी अजूनही सोडला नाही व परिणामांची फिकीर देखील केली नाही. आंदोलनाची खळ्ळ-फट्याक ही स्टाईल कायम चर्चेत असते.

त्यांच्या सारखी प्रभावी वक्तृत्वशैली आज इतर पक्षांच्या महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्यांकडे नाही. नवनवीन प्रयोग ते नेहमी करत असतात .

सुरुवातीला ते निवडणुकीचे तिकिट देताना संभाव्य उमेदवारांची परिक्षा घ्यायचे. त्यावेळी या प्रकाराची खिल्ली उडवण्यात आली. त्यांनी त्याची फिकीर केली नाही. आता सुद्धा त्यांनी शॅडो कॅबिनेट स्थापन केले आहे. आता नुकतेच त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. दोन झेंडे केले आहेत.

राज्याच्या राजकारणात सध्या त्यांनी घेतलेल्या भोंग्याच्या भूमिकेमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. अशा लक्षवेधी गोष्टींमुळे श्री. राज ठाकरे यांची दखल सर्वच पक्षांना घ्यावी लागते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.