रवींद्रनाथ टागोरांनी भारताचंच नाहीतर बांग्लादेशाचही राष्ट्रगीत लिहलं
रवींद्रनाथ टागोर यांना आपण महाकवी म्हणतो. आपल्या देशाचे राष्ट्रगीत “जन गण मन” आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत. पण याच रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत बांगलादेशाचेही राष्ट्रगीत लिहले आहे. ते आपणास माहित आहे का ?
रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दलची हि विशेष माहिती आपल्यासाठी
याची सुरुवात होते बंगालच्या फाळणीपासून. भारतात ब्रिटीशांची सत्ता असताना १९०५ साली जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगालची ‘पूर्व बंगाल’ आणि ‘पश्चिम बंगाल’ अशी फाळणी केली होती. त्याला ब्रिटिशांनी कारण दिले होते प्रशासकीय सोय, पण मूळ कारण होते धार्मिक ध्रुवीकरण – पश्चिम बंगाल हिंदूबहूल आणि पूर्व बंगाल आणि आसाम मुस्लिमबहूल.
तेव्हा बंगालच्या सामान्य जनतेला या राजकारणाबद्दल जागृत करण्यासाठी, संयुक्त बंगाल प्रांताचे चैतन्य जागे ठेवण्यासाठी अशी लेखकांनी अनेक गाणी लिहीली गेली, प्रसिद्ध करण्यात आली. त्यावेळी टागोर यांनी टागोरांचे आमार शोनार बांग्ला (माझा सोनेरी बंगाल) हे गाणे लिहले होते. त्यावेळी रविंद्रनाथांनी हे गीत बंगालच्या एकीकरणाचे प्रतीक म्हणून लिहिले होते! पुढे हीच फाळणी पुढील व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्सने १९११साली जनमताच्या रेट्यापुढे झुकून रद्द केली होती)
पुढे १९४७ साली भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश झाले. आताचा बांग्लादेश हाही तेव्हा पाकिस्तानचा भाग होता. पण बांग्लादेश मुक्तीसंग्रामानंतर १९७१ साली स्वतंत्र बांग्लादेशाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर १९७१ मध्ये बांग्लादेशात राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले. हे गाणे बंगाल बद्दल असल्यामुळे भारतातही ते गायले जाते.
आजही ‘आमार शोनार बांग्ला’ हे बांग्लादेशाचे अधिकृत राष्ट्रगीत आहे. अजून एक माहितीसाठी म्हणजे भारताप्रमाणेच बांगलादेशनेही संपूर्ण कवितेचे केवळ पहिले कडवेच राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केले आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम