Take a fresh look at your lifestyle.

फुलन देवी : बलात्काराचा बदला घेण्यासाठी तिने २२ ठाकुरांना गोळ्या घातल्या

0

आपल्या देशात जेव्हा जेव्हा बलात्कार होतो तेव्हा सर्वत्र एकच आवाज उठविला जातो की बलात्कार करणार्‍यांना फाशी द्यावी. पण हि फक्त चर्चाच राहते. पण आपल्या देशात अशी एक स्त्री होवून गेली तिने या चर्चा फक्त चर्चाच ठेवल्या नाहीत.

हे नाव म्हणजे फुलन देवी

फूलन देवीची गोष्ट प्रत्येक स्त्रीने वाचली पाहिजे, तिच्याकडून अन्याया विरोधात लढण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. फूलनचा जन्म १० ऑगस्ट १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील घुरा येथे झाला. ती कुटुंबातील चौथी अपत्य होती आणि लहानपणापासूनच ती तिच्या तीक्ष्ण स्वभावामुळे संपूर्ण गावात ओळखली जात होती.

लहानपणापासूनच फुलन बाकी मुलींसारखी नव्हती, जी शांत राहून अन्याय सहन करेल.

लहान असतानाच फुलनने आपल्या वडिलांची जमीन हडप केल्याची माहिती मिळताच जमीन परत मिळवण्यासाठी धरणे आंदोलन केले. याची भीती बाळगून फूलनच्या वडिलांनी वयाच्या 10 व्या वर्षी तिचे लग्न लावून दिले.

१० वर्षाच्या फूलनचे 30 वर्षांच्या माणसाशी लग्न झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री फूलनच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर, फूलनने दररोज बलात्कार करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ती वैतागून घरी परत आली. गावी परत आल्यामुळे फूलनला अनेकदा अपमान सहन करावा लागला.

तर गावातील तरुण मुले फुलनचा येता-जाता चिडवायचे. पण गावच्या पंचायत मध्ये तक्रार केल्यावर निकाल मात्र फुलनच्या विरोधात दिला जात असे. खालच्या जातीमध्ये जन्मल्यामुळे तिला अनेकदा हा अपमान सहन करावा लागला.

सासरी पुन्हा आल्यानंतर फूलन देवी काही दरोडेखोरांच्या संपर्कात आल्या. याबद्दल मात्र अनेक तर्कवितर्क आहेत. काही लोक म्हणतात की डाकुंनी त्यांचे अपहरण केले. पण फूलन देवी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, “नशिबाला हेच मंजूर होते.”

दरोडेखोरांच्या सोबत असताना एक दिवस दरोडेखोरांच्या टोळीचे प्रमुख असलेल्या बाबू गुर्जर याने फूलनवर बलात्कार केला. पण टोळीतील विक्रम मल्लाह याला हे सहन झाले नाही आणि त्याने बाबू गुर्जरला ठार मारले. त्यामुळे विक्रम मल्लाह दुसर्‍या दिवशी दरोडेखोरांचा सरदार झाला.

पण श्रीराम ठाकूर आणि लाला ठाकूर यांची एक दुसरी टोळी होती, जे बाबू गुर्जर यांच्या हत्येवर संतप्त होते आणि त्यांच्या मते याला फूलन देवी जबाबदार होती. याच कारणामुळे दोन टोळीत मोठी लढाई झाली. यातच विक्रम मल्लाहला आपला जीव गमवावा लागला.

असे म्हटले जाते की, त्यानंतर ठाकूरांच्या टोळीने तीन आठवड्यांपर्यंत फूलनवर अत्याचार केला. फुलन देवीच्या आयुष्यावरील बॅंडिट क्वीन चित्रपटात देखील दाखवले गेले आहे.

१९८१ साली तिथून सुटल्यानंतर फुलन दरोडेखोरांच्याच टोळीत सामील झाली. फूलन बेहमई गावात परत आली आणि तिच्यावर बलात्कार करणार्‍या दोन लोकांना तिने ओळखले. त्यानंतर तिने बाकी लोकांबद्दल माहिती विचारली पण कोणीही काहीही सांगितले नाही.

त्यामुळे त्या दिवशी फुलनने भर बाजारात गावातील 22 ठाकुरांना गोळ्या घातल्या.

इतक्या मोठ्या हत्याकांडामुळे फुलनला पूर्ण राज्यात प्रसिद्धी मिळाली. शासकीय पातळीवरून तिला पकडण्याच्या अनेक योजना आखल्या गेल्या. पण प्रत्येक वेळी पळून जाण्यात यशस्वी झाली.
तेव्हाचे भिंड डिव्हिजनचे एसपी राजेंद्र चतुर्वेदी मात्र फुलन देवीच्या टोळीशी संपर्कात होते. चतुर्वेदी यांच्यामुळे फूलन दोन वर्षांनंतर शरण येण्यास तयार झाली. त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

फुलन देवीवर २२ खून, ३० दरोडे आणि १८ अपहरण केल्याचा आरोप लावला गेला. त्यानंतर जवळपास ११ वर्षे फुलन तुरुंगात होती. जेल मधून बाहेर आल्यानंतर १९९६ साली फुलन देवीने समाजवादी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविली. निवडून आली. मिर्जापूरची खासदार झाली.

पण २ जुलै २००१ रोजी फूलन देवी संसदेमधून परत येत असताना शेरसिंह राणा यांनी अशोक नगर येथील घराजवळ तिला गोळ्या घातल्या. त्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले पण ती वाचू शकली नाही.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.