स्टेट बँकेतील नोकरी सोडून सुरु केला कृषी पर्यटनाचा व्यवसाय; विदेशातील लोकही येतात पाहायला
जेव्हा माणसाला प्रत्येक ठिकाणाहून नकारच मिळतो, तेव्हा तो खूपच निराश होतो. त्यात एखाद्या मुलीनं नाकारणं तर जास्त दु:ख देतं. मुलीनं नाकारल्यानंतर अनेकजण दु:खात बुडून बरबाद होतात.
याउलट काही लोक मात्र आयुष्यात काहीतरी करून दाखवतात. अशीच एक व्यक्ती आहे मनोज हाडवळे.
मुलीनं नाकारलं, बँकेनं नाकारलं, सगळेच नाकारतात इथं थांबायाचंच कशाला म्हणून त्यांनी कधी वर्धा सोडायचा निर्णय घेतला होता. सगळीकडून नाकारली जाणारी ती व्यक्ती आज यशस्वी व्यावसायिक झाले आहेत. आज आपण त्यांचा प्रवास, संघर्ष आणि यशाबद्दल माहिती घेणार आहोत.
अपघात आणि ओघानं ते पर्यटनात आले
स्टेट बँकेतील कृषी अधिकारीपदाची नोकरी सुरू झाली. परंतु त्यात समाधान नव्हतं. अपघात आणि ओघानं ते पर्यटनात आले. गेल्या 10 वर्षात 21 देशातून लोक त्यांच्या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी आले आहेत. वर्षाला आज त्यांचा 15-20 लाखांचा टर्न ओव्हर आहे अशी एकंदरीत त्यांची कहाणी आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचे मनोज हाडवळे यांची एमएससी अॅग्री झाली तरी, परंतु जगण्याचं कारण मात्र त्यांना समजलेलं नव्हतं. राजुरीतचं त्यांचं शिक्षण झालं.
10 वी झाल्यानंतर 11 वी, 12 वी साठी ते प्रवरानगरला गेले. 12 वी नंतर त्यांनी बीएससी अॅग्रीला जाण्याचं ठरवलं. मराठवाड्यातील जालन्यात त्यांनी प्रवेश घेतला. 12 वीनंतर वडिलांना पॅरालिसिसचा झटका आला.
भावावर सगळी जबाबदारी
मोठ्या भावावर सगळी जबाबदारी आली. त्याच्या त्यांचा लोड नको म्हणून बीएससीनंतर ते एक महिना दिल्लीला गेले. फेलोशिप मिळावी म्हणून ते तिथंच थांबले. फेलोशिप मिळाली नाही. पण देशात हॉर्टीकलच्या विषयात त्यांना 32 वा क्रमांक मिळाला.
परभणीला एमएमसीला त्यांनी अॅडमिशन घेतलं.अशात वर्ध्याला एका नोकरीची संधी त्यांना मिळाली. शेतकरी आत्महत्या करतात, त्यांना मायक्रो फायनान्स करण्याचं काम त्यांना मिळालं. वर्ध्यात सेवाग्राम आणि पवनार जवळ त्यांचा पोर्टफोलिओ होता.
स्टेट बँकेत नोकरीसाठी पुन्हा वर्ध्यात पोस्टींग झाल्यानंतर ते नाराज झाले होते. त्यांना पुण्यात पोस्टींग हवी होती. ते फ्रस्ट्रेट होते. त्यांनी कोपऱ्यावरील एका वाचनालयातून काही पुस्तकं आणली आणि काही रेफरंस पुस्तकं त्यांनी आणली. भारतवर्ष दर्शनम नावाचं थिसिस त्यांनी लिहिलं.
सुट्टीला गावी आल्यानंतर ते तो थिसिस घरी घेऊन आले. टिंग्या चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश हाडवळे हे त्यांचे मधले बंधू आहेत. त्यांच्या भावानं हा थिसिस महावीर जैन या त्यांच्या मित्राला दाखवला त्यांना तो खूप आवडला.
परंतु नोकरी सोडायची नव्हती
सेवाग्राम हे गांधीजींचं आश्रम आहे. पवनारला विनोबा भावेंचं आश्रम आहे. त्या जागेत त्यांना रहायला मिळालं. वर्ध्याला जाणं त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. तिथं त्यांनी परदेशी लोक त्यांनी पाहिले. त्यांच्या लक्षात आलं की, शेती आणि ग्रामीण संस्कृती पहायला परदेशातून लोक येतात आणि यालाही पर्यटन म्हणतात.
पर्यटन वेगळं सेक्टर आहे आणि त्यांच्यासाठी हे अनोळखी नाही हे त्यांना कळालं.
शाळेत असताना ते शिक्षकांना डोंगर फिरायला घेऊन जायचे. या बदल्यात त्यांना 10 रुपये मिळायचे. म्हणजे त्यांनी आधीच गाईडचं काम केलं होतं. आपण पर्यटन का करू नये असा प्रश्न त्यांना पडला. पर्यटनाला जर शेतीची जोड दिली तर चांगलं पर्यटन उभं राहिल हे त्यांना समजलं होतं. परंतु नोकरीची सोडायची नव्हती.
वयाची साठीपर्यंत आपण हेच करणार का असा प्रश्नही त्यांना सतावत होता. कारण बँकेतील अधिकाऱ्यांचं फॅमिली लेवलचं फ्रस्ट्रेशन त्यांनी खूप जवळून पाहिलं होतं. हे भविष्य नको हे त्यांनी पक्क ठरवलं आणि महिन्याभरातच नोकरीचा राजीनामा दिला.
यानंतर ते मुंबईत आले , नंतर मोठ्या भावाकडे राहिले. नव्यानं काही सुरू करायला काही सुचतच नव्हतं. गावी आले. लोकांना जेव्हा कळालं की, मी बँकेतील नोकरी सोडली तेव्हा मात्र सर्वांनी नावं ठेवली. त्यांना काढून टाकलं असेल असा संशय लोकांनी घेतला.
एकदा तर त्यांचा मधला भाऊ मंगेशही त्यांना म्हणाला, तुला नोकरी सोडायला मी पाठींबा दिला ही माझी चूक झाली. हे गरम तेलासारखं त्यांच्या कानात गेलं. यानंतर झोपले नाहीत. यानंतर त्यांनी काही करण्याचा निर्णय घेतला.
भारतातील 10 मध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला
यानंतर त्यांनी घर सोडलं. मित्रासोबत ते केरळला कांदा विकायलाही गेले. यानंतर ते पुण्यात आले. कृषी पर्यटनावर स्टडी गेला. नंतर जुन्नरमधील राजुरी गावात त्यांनी पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन सुरू करण्याचं ठरवलं. एकदा त्यांनी द्राक्ष महोत्सवदेखील साजरा केला.
सप्टेंबर 2011 रोजी पराशर कृषी व ग्रामीन पर्यटन जुन्नरचं उद्घाटन झालं. नोव्हेंबर 2012 रोजी भारतातील 10 मध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला. 2014 साली त्यांचं लग्नही झालं.
कृषी पर्यटनाचं ट्रेनिंग
आतापर्यंत 3000 हून अधिक जास्त शेतकऱ्यांना त्यांनी कृषी पर्यटनाचं ट्रेनिंग दिलं. त्यांच्या अनेक नोट्स वर्तमानपत्रात छापून आल्या आहेत. 2013 पासून ते महाराष्ट्र पर्यटन विभागासोबत नोंदणीकृत होते. ते 1 जानेवारी 2021 पासून महाराष्ट्र पर्यटन विभागाकडे राज्याचे पर्यटन प्रशिक्षक म्हणून आहेत.
पराशरला 10 वर्षे झाली. आजवर 10 ते 12 हजार लोकांनी त्याच्या पर्यटन केंद्राला भेट दिली आहे. 21 देशातील लोक तेथे आले आहेत. विविध विद्यार्थीही आता तिथं भेट देताना दिसतात.
पुण्याला जेवढी परदेशी मुलं येतात त्यातील 60 टक्के मुलं आज ग्रामीण भागातील अनुभवासाठी पराशरला जातात. 2014 साली नॅशनल सिड कॉर्पोरेशननं त्यांच्या हिसार आणि सुरतगड म्हणजे हरियाणा आणि राजस्थान या दोन राज्यात त्यांच्या लँड बँक अॅग्री टुरिजम डेव्हलप करण्यासाठी कंसलटंट म्हणून हाडवळे यांना बोलवण्यात आलं होतं.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम