Take a fresh look at your lifestyle.

किशोर कुमार मधुबालाला म्हणाले होते “डझनभर मुले पैदा करून खंडव्याच्या गल्लीमध्ये फिरेन”

किशोर कुमार यांच्याबद्दलचे असेच पाच मजेदार किस्से जे तुम्ही आवर्जून वाचले पाहिजेत.

0

भारतात किशोर कुमार यांची गाणी ऐकली नाहीत असा माणूस शोधून देखील सापडणार नाही. किशोर कुमार यांच्या बद्दलच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतीलही.

किशोर कुमार यांच्याबद्दलचे असेच पाच मजेदार किस्से जे तुम्ही आवर्जून वाचले पाहिजेत.

पहिला किस्सा

मध्यप्रदेश मधील खंडवा मधून किशोर कुमार हिंदी संगीताचे राजा कसे बनले याची एक मजेदार कहाणी आहे. किशोर सुट्टी घालवण्यासाठी मुंबईत त्याचा मोठा भाऊ अशोक कुमार यांच्या घरी गेला होते.

एके दिवशी अशोक कुमार यांच्या घरी अचानक संगीतकार सचिन देव बर्मन आले होते. जेव्हा घरच्या बैठकीत त्यांना कुणाच्यातरी गाण्याचा आवाज ऐकू आला.

तेव्हा त्यांनी विचारले की, “कोण गात आहे?”

अशोक कुमार यांनी उत्तर दिले-

“मला एक लहान भाऊ आहे. जोपर्यंत तो गाणे गात नाही तोपर्यंत त्याची अंघोळ पूर्ण होत नाही.”

संगीतकार सचिन देव बर्मन यांना पहिल्यांदा किशोर कुमार यांच्या आवाजाबद्दल माहिती मिळाली. बाकी त्यानंतरचा किशोर कुमार यांचा प्रवास तुम्हा-आम्हा सगळ्यांना माहित आहे. सचिन देव बर्मन यांनी किशोरची प्रतिभा ओळखली आणि भारतीय संगीताला एक हिरा दिला जो अजूनही चमकत आहे.

दुसरा किस्सा

किशोर कुमार यांच्या अनेक किस्स्यामध्ये ‘पैसा’ हा मुद्दा असायचा. किशोर दा यांनी आपले पैसे कोणालाही-कधीही सोडायचे नाहीत आणि याबद्दलचे बरेच किस्से आहेत.

‘प्यार किए जा’ या चित्रपटात कॉमेडियन मेहमूदने किशोर कुमार, शशी कपूर आणि ओमप्रकाश यांच्यापेक्षा जास्त पैसे घेतले होते. किशोर दा यांना हि गोष्ट मनाला लागली. याचा बदला म्हणून त्यांनी ‘पडोसन’ या चित्रपटात दुप्पट पैसे घेतले.

तिसरा किस्सा

किशोर कुमार यांना त्यांचे जन्मगाव खंडवा आवडत होते. त्याचे वैशिष्ट्य अनेक वेळा पाहिले गेले. किशोर कुमार जेव्हा जेव्हा स्टेज-शो करत असत, तेव्हा ते नेहमी हात जोडून सांगायचे, ‘मेरे दादा-दादियों। मेरे नाना-नानियों। मेरे भाई-बहनों, तुम सबको खंडवे वाले किशोर कुमार का राम-राम। नमस्कार।’

याबद्दलचा अजून किस्सा म्हणजे किशोर कुमार यांनी आपली दुसरी पत्नी मधुबालाला लग्नानंतर विनोदाने म्हटले होते –

‘मला डझनभर मुलांना जन्म घालून त्यांच्याबरोबर खंडवाच्या गल्लीमध्ये फिरायचे आहे.’

चौथा किस्सा

किशोर कुमार यांचे बालपण खंडवा मध्येच गेले. पण तरुणपणी ते इंदौरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आले. तेव्हा ते दर सोमवारी सकाळी इंदौरला येत आणि शनिवारी संध्याकाळी खंडवाला परत येत असत.

किशोर कुमार सांगत की ते अधिक दिवस आपल्या गावापासून दूर राहू शकायचे नाहीत. प्रवासात ते प्रत्येक स्थानकावर डब्बे बदलत असे आणि नवीन गाणी ऐकवून प्रवाशांचे मनोरंजन करत असे.

पाचवा किस्सा

किशोर कुमार आयुष्यभर आपल्या गावाच्या आकर्षणातून मुक्त होऊ शकले नाहीत. मुंबईकर त्याला बांधू शकले नाहीत. मुंबईच्या पार्ट्या आणि ग्लॅमरस त्याच्या आत्म्यात शिरले नाहीत.

खंडवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत अशी त्यांची शेवटची इच्छा होती. ही इच्छासुद्धा पूर्ण झाली आणि खंडवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण शहर त्यांची गाणी गुणगुणत येत होते. किशोर कुमार म्हणायचे – “चित्रपटांमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते खंडव्यात स्थायिक होतील आणि दररोज दूध-जिलेबी खातील.”

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.