कालिचरण महाराजने लढवली होती अकोला महानगरपालिका निवडणुक
छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशातून कालीचरण महाराजला अटक केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने धर्मसंसद वादात अडकली असून यासोबतच एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे कालीचरण महाराज.
कालीचरण महाराजने महात्मा गांधींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख करत शिवीगाळ केली. यामुळे मोठा गदारोळ झाला आणि महाराष्ट्रासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. अखेर छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशातून कालीचरण महाराजला अटक केली आहे.
पण हा कालिचरण महाराज नेमका आहे तरी कोण? त्याचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध? हे जाणून घेऊयात.
कालीचरण महाराज अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये ‘भावसार पंचबंगला’ भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांचे मूळ नाव ‘अभिजीत धनंजय सराग’ असं आहे. त्याच्या आईचं नाव सुमित्रा तर वडिलांचं नाव धनंजय सारंग आहे.
लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्या मंडळींना तो शिकावा आणि काहीतरी वेगळं काम करावे असे वाटायचे.
एका मुलाखतीत बोलताना कालीचरण महाराजने सांगितलं होतं की, “मला शाळेत जाणं पसंत नव्हतं. शिक्षणात मला कोणताही रस नव्हता. जर मला जबरदस्तीने शाळेत पाठवलं तर मी आजारी पडायचे. सर्वजण माझ्यावर प्रेम करायचे त्यामुळे माझं म्हणणं ऐकायचे. माझी धर्माकडे ओढ असल्याने अध्यात्माकडे वळलो”
२०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुक लढवली होती
कालिभक्त म्हणून त्याने कालिचरण महाराज नाव धारण केलं. आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं तो सांगू लागला. दोन वर्षांपुर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने कालीचरण महाराज प्रसिद्धीझोतात आला.
२०१७ मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कालीचरण महाराजला पराभवाचा सामना करावा लागला.
महाराष्ट्रातील अकोला येथे दरवर्षी कालीचरण कंवर यात्रेत भाग घेतात. कालीचरण महाराज गेल्या वर्षी मध्य प्रदेशात शिव तांडव स्तोत्र गाऊन प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनीही त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
कालीचरण महाराज आपल्या कपाळावर लावतात लाल ठिपका
कालीचरण महाराज नेहमी आपले केस उघडे ठेवतात आणि कपाळावर एक मोठा लाल ठिपका ठेवतात. ते सहसा लाल रंगाचे कपडे घालतात. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक पेजेस तयार करण्यात आली असून त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
भैय्युजी महाराजांसोबत इंदूरमध्ये अनेक वर्षे राहिले
इंदूरमधील वास्तव्यादरम्यान, कालीचरण भय्यूजी महाराजांच्या आश्रमात जाऊ लागले आणि लवकरच त्यांच्या जवळ आले. येथून त्यांच्या नवीन नावाशी ‘महाराज’ हा शब्द जोडला गेला आहे. इंदूरमध्ये अनेक वर्षांच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी एक अनोखा पोशाख धारण केला आणि लवकरच ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम