मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून विनायक माळी कसा बनला कॉमेडी किंग ?
सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओ ने धुमाकुळ घालणारा सर्वांचा लाडका दादूस म्हणजेच आपला ‘आगरी किंग’ विनायक माळी
आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने खुप कमी वेळात कॉमेडीच्या जगात धुमाकूळ घातला आहे. या व्यक्तीला अनेक जण दादूस म्हणतात. तर काही जण दादूस शेठ.
सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओ ने धुमाकुळ घालणारा सर्वांचा लाडका दादूस म्हणजेच आपला ‘आगरी किंग’ विनायक माळी होय.
मी ‘आगरी किंग’नसून प्रत्येकाच्या घरातील आपलासा वाटणारा विनायक माळी असल्याचं तो सांगतो. असा साधेपणाने वागणारा दादूस ने लोकांच्या मनात घर केले आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेला विनायक हा त्याच्या चाहत्यांसाठी खूप मोठा सेलिब्रेटी आहे.
अनेक मोठे कलाकार विनायकची मदत घेतात
विनायक माळी हे नाव सध्या सोशल मीडियावर खुप जास्त गाजत आहे. याचे कारण म्हणजे त्याचे लोकांना हसवणारे विनोदी व्हिडिओ. विनायकची लोकप्रियता खुप जास्त आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. दिवसेंदिवस त्याची प्रसिद्धी वाढत आहे
विनायकची प्रसिद्धी एवढी जास्त आहे की, अनेक मोठे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रोमोशन करण्यासाठी विनायकची मदत घेतात. त्यासोबतच त्याला अनेक कॉमेडी चित्रपटांच्या ऑफर देखील आल्या आहेत.
विनायकने खुप कमी वेळात मनोरंजन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विनायकला आगरी कॉमेडी किंग बोलले जाते. त्याला युट्युबवरील कॉमेडीचा बादशहा बोलले तर त्यात काही चुकीचे नाही. हलके-फुलके दिलदार विनोद आणि चाहत्यांना हसविण्यासाठीची कॉमेडी हि एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही.
विनायक माळी उर्फ दादूस यांच्याकडे हा खजिना प्रेक्षकांसाठी आहे. आजच्या जगात फक्त सौंदर्य आणि ग्लॅमर लोकांना आकर्षित करते तिथे एक प्रतिभावान आणि डाउन-टू-अर्थ मुलगा आपल्या साधेपणाने लाखो लोकांची मने जिंकत आहे. आगरी भाषेत असणारे त्याचे व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून मोठ्या प्रमाणात ते शेअरही केले जातात.जाणून घेऊया
विनायक माळी कसा झाला कॉमेडी किंग.
विनायक माळीचा जन्म २२ सप्टेंबर १९९५ ला रायगड जिल्ह्यातील पनवेल इथे झाला. तो एका मध्यम वर्गीय आगरी कुटुंबात जन्मला. त्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. त्याचे सगळे बालपण ठाण्यात गेले. त्याचे शिक्षण देखील ठाण्यातच झाले आहे.
वयाच्या २५ व्य वर्षांत तो इतका जास्त फेमस झाला कि लोक प्रेमाने त्याला ‘आगरी किंग’ म्हणू लागले. सोशल मीडिया वर जरी तुफान फेमस झाला तरी तो तेवढंच शिक्षणाला देखील गांभीर्याने घेतो. त्याने बी कॉम इन फायनान्शियल मार्केटींग केले. सध्या तो एलएलबीचं शिक्षण घेत आहे. एलएलबी करत असताना त्याला विप्रो कंपनीत नोकरी मिळाली होती.
आवड म्हणून विनायकने स्वतःचे यूट्यूब चॅनेल काढले. जसे जसे काम वाढत गेले तसे तेथे त्याला जास्त वेळ द्यावा लागत होता म्हणून लवकरच त्याला विप्रोमधील नोकरीसाठी हे काम थांबवावे लागले.
विनायक माळीच्या प्रसिद्धीची भुरळ चित्रपटसृष्टीलाही पडली आहे
लोकांना तो खूप आवडायला लागला. सोशल मीडिया वर रातोरात फेमस झालेल्या सेलिब्रेटी सारखी विनायक ची कहाणी अज्जीबात नाही. त्याचे फॅन्स हे रात्रीत वाढले नाहीत तर त्याची कला आणि त्याचे कॉमेडी कन्टेन्ट लोकांना आवडत गेले आणि तो हळूहळू सोशल मीडिया स्टार बनला.
विनायक माळीच्या प्रसिद्धीची भुरळ आता मराठी चित्रपटसृष्टीलाही पडली आहे. त्याच्या सोशल मीडिया वरून बरेच मराठी चित्रपटाचं प्रमोशनही केलं जात.
सुरुवातीला एकटा अभिनय करत होता
सुरुवातीला त्याने हिंदीमधून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.विनायक स्वतः त्याच्या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहितो. त्यासोबतच तो दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून देखील स्वतः काम करतो. विशेष म्हणजे विनायकचे सगळे व्हिडिओ आगरी कोळी भाषेतून असतात. म्हणून त्याचा अभिनय खुप नैसर्गिक वाटतो.
हळूहळू विनायकच्या व्हिडिओची प्रसिद्धी वाढत होती.म्हणून विनायकने त्याच्या व्हिडिओमध्ये अनेक बदल केले. सुरुवातीला तो एकटा अभिनय करत होता. त्यानंतर त्याने त्याच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. माझी बायको, दादूस सीरिज, दादूस निघाला गोव्याला अशा अनेक प्रकारच्या व्हिडिओ त्याने बनवल्या.
आगरी कॉमेडी किंग म्हणून प्रसिद्ध
विनायकच्या या व्हिडिओला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. विनायक माळीची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, इंस्टाग्राम, टिकटॉकवरील त्याच्या आवाजातील व्हिडीओ उपलब्ध आहेत. अनके तरुण-तरुणी त्यावर व्हिडीओ रेकॉर्ड करुन शेअर करताना दिसतात.
तसेच विनायक ला गायनाची आणि डान्स ची आवड आहे.त्याचे व्हिडिओ खुप मोठ्या प्रमाणावर हिट झाले. लाखो करोडो लोकांनी त्याचे व्हिडिओ बघितले. आज तो अग्री कॉमेडी किंग म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची लोकप्रियता खुप जास्त आहे. त्याचे करोडो चाहते आहेत.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम