Take a fresh look at your lifestyle.

घर, गाडी, बंगला… राष्ट्रपती पदावरून निवृत्तीनंतर कोविंद यांना या सुविधा मोफत मिळणार

दावरून पायउतार झाल्यानंतर रामनाथ कोविंद दिल्लीमध्येच 12 जनपथ येथे राहणार आहेत. त्यांच्या शेजारी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी असतील. सोनिया गांधी त्या 10 जनपथ येथे राहतात.

0

भाजपप्रणित आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती असणार आहेत. आज झालेल्या मतमोजणी मध्ये त्यांनी विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. 

नव्या राष्ट्रपती यांची निवड झाली असली तरी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यापूर्वी 23 जुलै रोजी अशोका हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला जाणार आहे.

राष्ट्रपती पदावर रामनाथ कोविंद यांना अनेक सुविधा मिळत असतात. मोफत वैद्यकीय सेवा, निवास आणि येण्या-जाण्याच्या सुविधा अशा सुविधा मिळतात. या सुविधांमध्ये दरमहा 5 लाख रुपये पगाराचाही समावेश आहे. निवृत्तीनंतरही यातील अनेक सुविधा माजी राष्ट्रपतींसाठी सुरूच असतात.

रामनाथ कोविंद बनणार सोनिया गांधी यांचे शेजारी

मिडिया संस्थाच्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निवृत्तीची तयारी गेल्या महिन्यापासूनच सुरू झाली होती. पदावरून पायउतार झाल्यानंतर रामनाथ कोविंद दिल्लीमध्येच 12 जनपथ येथे राहणार आहेत.

12 जनपथ हा बंगला दिल्लीमधील लुटियन्स परिसरातील सर्वात मोठ्या बंगल्यांपैकी एक आहे. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आपल्या मृत्यूपर्यंत या बंगल्यात राहत होते. त्यांच्या शेजारी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी असतील. सोनिया गांधी त्या 10 जनपथ येथे राहतात. महाराष्ट्रातील जेष्ठ नेते शरद पवार हे देखील जवळच 6 जनपथ या बंगल्यात राहतात.

रामनाथ कोविंद 25 जुलैलाच या बंगल्यात शिफ्ट होतील. या बंगल्याशिवाय रामनाथ कोविंद यांना इतर सुविधाही मिळणार आहेत. या सर्व सुविधा प्रेसिडेंशियल अचिव्हमेंट अँड पेन्शन ऍक्ट 1951 अंतर्गत उपलब्ध असतील.

निवृत्तीनंतर काय सुविधा मिळणार ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार रामनाथ कोविंद यांना निवृत्तीनंतर दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळणार आहे. त्याचबरोबर सरकारकडून सचिव स्तरावरील कर्मचारी आणि कार्यालयांसाठीही पैसे उपलब्ध होतील. तसेच त्यांना मिळालेल्या घराला त्यांना भाडेही द्यावे लागणार नाही. किमान आठ खोल्या असलेल्या घराला ही सुविधा लागू असेल.

तसेच निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद यांना दोन लँडलाईन फोन, एक मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्शन दिले जाणार आहे. यासोबतच मोफत वीज आणि पाण्याचीही व्यवस्था असेल. एक कार आणि ड्रायव्हर देखील दिला जाईल. निवृत्त झाल्यानंतर रामनाथ कोविंद यांना दोन सचिव आणि दिल्ली पोलिसांची सुरक्षाही मिळणार आहे.

माजी राष्ट्रपतींवर आयुष्यभर मोफत उपचाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच प्रवासासाठी मोफत प्रथम श्रेणीचे रेल्वे तिकीट आणि विमान तिकीटाचीही सुविधा आहे. राष्ट्रपतींसोबत आणखी एक व्यक्ती मोफत प्रवास करू शकते.

प्रत्येक पाच प्रवाशांमागे एक सहाय्यक सुविधाही आहे. याशिवाय माजी राष्ट्रपतींना देशभर फिरण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त कारही मिळते. या सर्वांसह, माजी राष्ट्रपतींच्या पत्नी/पतीला सचिव स्तरावरील मदतीसाठी दरमहा 30 हजार रुपये मिळतील.

रामनाथ कोविंद यांच्या नंतर लवकरच नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपला कार्यभार स्वीकारतील. 

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.