Take a fresh look at your lifestyle.

बोटीवरून उडी मारून हिरोईनचा जीव वाचवला आणि थेट लग्नाचा प्रस्ताव दिला

देव आनंदने पांढरा शर्ट आणि त्यावर काळा कोट हि स्टाईल इतकी लोकप्रिय केली कि त्यांची हि स्टाईल लोक कॉपी करू लागले.

0

बॉलिवूडमध्ये अनेक हिरो आले आणि काळाच्या ओघात विसरून गेले. पण काही मोजकेच असे आहेत, की ज्यांच्याशिवाय हिंदी चित्रपटांचा इतिहास अपूर्ण राहील. देव आनंद देखील अशाच एका हिरोपैकी एक होते.

देव आनंद यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहे. आपल्या काळात रोमँटिक आणि फॅशन आयकॉन म्हणून त्याची प्रसिद्धी होती. पण त्यांच्या काळा कोट घालण्याचे अनेक किस्से सांगितले जातात. देव आनंदने पांढरा शर्ट आणि त्यावर काळा कोट हि स्टाईल इतकी लोकप्रिय केली कि त्यांची हि स्टाईल लोक कॉपी करू लागले.

पण त्यानंतर एक काळ आला जेव्हा देव आनंदला सार्वजनिक ठिकाणी काळ्या रंगाचा कोट घालण्यास बंदी घातली गेली.

हिंदी चित्रपटसृष्टीत सदाहरित अभिनेता देव आनंद जो आपल्या कौशल्याची, कामगिरीची आणि जादूटोण्याची जादू जवळपास सहा दशकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोचवत असे, अभिनेता होण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागले. विशेष म्हणजे देव आनंद मुंबईत पोहोचला तेव्हा त्याच्याकडे फक्त 30 रुपये होते.

काळ्या कोटची जादू

आपल्या अभिनयासोबत देव आनंद काळ्या कोटमुळे कायम चर्चेत असायचे. देव आनंदने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक कोटची फॅशन लोकप्रिय केली. पण त्याच वेळी कोर्टाने त्यांना त्यांचा काळा कोट घालण्यास बंदी घातली. त्याला कारणही तसचं होत.

यामागचे कारण तसे खूपच रंजक आणि विचित्रही होते. ते म्हणजे देव आनंद यांच्या काळ्या कोट घालण्याच्या काळात काही मुलींच्या आत्महत्या झाल्या. कदाचित असा एकमेव अभिनेता असेल ज्याच्यासाठी प्रेम पहिले गेले असेल आणि त्यामध्ये कोर्टाने हस्तक्षेप करावा लागला असेल.

एकेकाळी फक्त ३० रुपये घेऊन मुंबईमध्ये पोहचले होते

मुळचे गुरुदासपूरचे असलेल्या देव आनंद यांचे खरे नाव धर्मदेव पिशोरिमल आनंद होते. त्यांनी लाहोरमध्ये इंग्रजी साहित्याचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. पुढच्या शिक्षणासाठी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणास नकार दिला. वडिलांनी स्पष्टपणे सांगितले, पुढे अभ्यास करायचा असेल तर नोकरी मिळवा.

याच घटनेमुळे त्यांचा बॉलिवूडचा प्रवासही सुरू झाला. १९४३ साली आपली स्वप्ने साकार करण्यासाठी ते मुंबईत आले. त्यावेळी त्याच्याकडे फक्त 30 रुपये होते. राहण्यासाठी जागा नव्हती. मुंबईत पोहोचल्यानंतर देव आनंदने रेल्वे स्थानकाजवळील स्वस्त हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेतली. त्या खोलीत त्याच्याबरोबर इतर तीन लोकही राहत होते जे त्यांच्याप्रमाणेच चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडत होते.

बोटीवरून उडी मारून हिरोईनचा जीव वाचवला आणि मग लग्नाचा प्रस्ताव

किस्सा असा घडला कि देव आनंद आणि सुरैया ‘विद्या’ चित्रपटामधील ‘किनारे किन चले जाए हम’ गाण्याचे शूटिंग करत होते. हे गाणे नदीमध्ये बोटीवर शूट केले जात होते. शूटिंगच्या दरम्यान बोट नदीत पलटी झाली आणि सुरैया नदीत बुडण्यास सुरवात झाली.

त्याक्षणी देव आनंद यांनी कोणताही विचार न करता नदीत उडी मारली. देव यांनी सुरैया न तेथून बाहेर काढले आणि बाहेर येताच प्रपोज केला. सुरैया यांनीही त्यांचा प्रपोज मान्य केला. असे म्हटले जाते की त्यावेळी देव आनंदने सुरैयाला ३००० रुपयांची अंगठी देऊन प्रपोज केले होते.

याच गाण्याच्या शुटींग दरम्यान हा किस्सा घडला होता

आणीबाणीच्या विरोधात मोर्चा

चित्रपट दुनियेसोबतच देव आनंद यांना राजकारणातही विशेष रुची होती. याचाच एक नमुना आणीबाणीच्या विरोधात दिसून आला होता. १९७५ साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीचा संपूर्ण देशभर विरोध होत होता. त्याच वेळी देव आनंद यांनीही आपल्या समर्थकांसह रॅली काढून या आणीबाणीला विरोध दर्शविला होता.

त्यानंतर १९७७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देखील देव यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात प्रचार केला होता. एवढचं नाही तर देव यांनी स्वत: एक राजकीय पक्ष देखील स्थापन केला होता. ज्याला ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ असं नाव दिले होते. पण नंतर तो पक्ष संपला.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.