Take a fresh look at your lifestyle.

हरभजनच्या “एप्रिल फुल”मुळे गांगुली कॅप्टनपद सोडायला तयार झाला होता

भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व कर्णधार सौरभ गांगुली यांनी नुकताच एका कार्यक्रमात एका किस्सा सांगितला

0

क्रिकेट या खेळात मैदानाशिवाय मैदानाबाहेर म्हणजेच ड्रेसिंग रूम मध्ये जे काही होते किंवा ड्रेसिंग रूम मध्ये खेळाडूंची वर्तवणूक जशी असते त्यानुसारही खेळाडूंच्या खेळात बदल बघायला भेटू शकतात.

याचे एक उत्तम उदाहरण भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व कर्णधार सौरभ गांगुली यांनी अन अॅकडमी या अँपवर संवाद साधतांना सांगितलं आहे.

हरभजन सिंग व सचिन तेंडुलकरने सौरभ गांगुलीला कस एप्रिल फुल बनवलं होत, त्याविषयी हा किस्सा आहे. यावर अधिक बोलतांना गांगुली सांगतात, भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करत असतांना भारत विरुद्ध पाकिस्तानची सिरीज सुरु होती. त्या मालिकेदरम्यान गांगुली लवकर आउट होत होते, त्यांच्याकडून धावाही बनत नव्हत्या.

कर्णधार पद सोडायला तयार झाले

त्यादरम्यानच १ एप्रिल रोजी आपल्या फलंदाजी विषयीच विचार करत असतांना गांगुली ड्रेसिंग रूम मध्ये गेले. तेथे हरभजन व सचिनसह इतरही खेळाडू होते. त्यावेळी त्या दोघांनी गांगुलीला सांगितले कि तुम्ही जे मीडियाला सांगितलं ते बघून आम्ही तुमच्यावर नाराज आहोत.

गांगुलीने विचारले मी काय सांगितले तेव्हा त्यांनी उत्तर दिल कि एका वृत्तपत्रात असे छापून आले आहे कि तुम्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज आहात. हे ऐकून गांगुली अजूनच निराश झाले व अक्षरशः ते कर्णधार पद सोडायला तयार झाले.

मी कर्णधार पदाचा राजीनामा देतो

गांगुली म्हणतात कि मी संघाला सांगितले कि जर तुम्हाला असे वाटते कि मी तुमच्या प्रदर्शनावर नाराज आहे. व माझी काही चूक झाली असेल तर मी कर्णधार पदाचा राजीनामा देतो.

गांगुलीने असे बोलताच हरभजन ओरडला एप्रिल फुल.

गांगुलीला बिलकुलच लक्षात नव्हते कि त्या दिवशी १ एप्रिल होते. आणि त्यामुळे त्यांनी या पूर्ण संवादाला गांभीर्याने घेतले होते.

मात्र एप्रिल फुल झाल्या नंतर गांगुलीला हलके वाटले. एव्हढच नाही तर गांगुलीच्या मते या संवादानंतर त्यांच्यावरील पूर्ण दबाव कमी झाला व त्यांनी त्याच्या पुढील मॅच मध्ये चांगली फलंदाजी देखील केली.

अशा प्रकारे ड्रेसिंग रूमचे वातावरण किती आवश्यक असते हे गांगुलीच्या या उदाहरणातून लक्षात येते. व केवळ संघातील इतर खेळाडूंसाठीच नाही तर कधी-कधी कर्णधारासाठी देखील हे वातावरण व संघातील इतर खेळाडूंची वागणूक महत्वाची ठरते. कारण संघातील प्रत्येक खेळाडूला धीर देण्याचे काम व त्या खेळाडूंवरील दबाव कमी करण्याचे काम कर्णधार करत असतो.

अशा वेळी कर्णधारावरील दबाव कमी करण्यासाठी कुणीच नसत त्यामुळे इतर खेळाडूंची अशी वागणूक किंवा त्यांच्या सोबत झालेला मनमोकळा संवादही अनेकदा कर्णधाराला मोठा धीर देऊन जातो. म्हणूनच क्रिकेट विषयी बोलतांना क्रिकेट विश्लेषक नेहमी ड्रेसिंग रूमच्या वातावरणावर देखील बोलतात.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.