क्रिकेट क्षेत्रातील ते ५ खेळाडू ज्यांनी चुकीचा संदेश जाऊ नाही म्हणून करोडो रुपयांच्या जाहिराती नाकारल्या
क्रिकेट या खेळाची जागतिक पातळीवरील लोकप्रियता वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे भारतीय क्रिकेटवर आतोनात प्रेम करतात त्याच प्रमाणे ते क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर देखील प्रेम करतात. व चाहत्यांच्या याचा प्रेमामुळे हे खेळाडू मोठे होतात जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करण्यास सक्षम ठरतात.
मानवी स्वभावानुसार आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सवई किंवा त्याच्या जीवन जगण्याच्या शैलीतून आपण अनेक गोष्टी आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. विशेषतः ती आवडती व्यक्ती खेळाडू, अभिनेता किंवा एखाद्या मोठ्या पदावरील व्यक्ती असल्यास हे अधिक बघायला मिळते. यात चांगल्या व वाईट दोन्ही गोष्टींचा समावेश असतो.
अशाच प्रकारे जेव्हा लोकप्रिय खेळाडू विविध गोष्टींची जाहिरात करतात त्याचाही प्रभाव चाहत्यांच्या जीवनावर कळत न कळत होत असतो. त्यामुळे कशाची जाहिरात करावी व कशाची नाही. हा देखील या खेळाडूंसाठी महत्वाचा विषय ठरतो. अशाच प्रकारे आपल्या कृतीतून काही चुकीचा संदेश जाऊनये या उद्देशाने ५ असे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी करोडो रुपयाच्या जाहिराती नाकारल्या आहेत.
१ सचिन तेंडुलकर –
मास्तर ब्लास्टर क्रिकेटचा देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनचे नाव या यादीत सर्वप्रथम येते. सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खेळाडू आहे. सचिन तब्बल २४ वर्ष क्रिकेट खेळला त्या दरम्यान त्याने मोठे यश प्राप्त केले. व भारतातच नाही तर इतर देशातही आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. एवडे महान व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणाऱ्या सचिनने त्याच्या जीवनात त्याला मिळालेली तंबाखू ची जाहिरात करण्यास कधीच होकार दिला नाही. तंबाखूच्या एका कंपनीने आपली जाहिरात करण्यासाठी अनेकदा सचिनशी संपर्क केला मात्र सचिनने त्याला नकार दिला. सचिनने क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्या नंतर देखील एका मद्य निर्मात्या कंपनीने सचिनला ब्रँड अँबेसिडर बनण्यासाठी संपर्क केला होता. परंतु सचिनने त्यालाही नकार दिला.
२ हाशिम आमला
हाशिम आमला या साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजाने क्रिकेट मधील अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. आमलाला आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जाते. आमलाने आपल्या साऊथ आफ्रिकेच्या जर्सीला स्पॉनसर केलेल्या मद्य निर्मात्या कंपनीचा लोगो आपल्या जर्सीवर लावू दिला नाही. यातून चुकीचा संदेश जात असल्याने आमलाने हा निर्णय घेतला. व एव्हडेच नाही तर आमला यासाठी ५०० डॉलर भरण्यास देखील तयार होता.
३ विराट कोहली
भारताचा सर्वात लोकप्रिय खेळाडू व जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून ओळख प्राप्त केलेल्या विराट कोहलीने देखील मानवी जीवनावर वाईट परिणाम करणाऱ्या गोष्टीच्या जाहिराती करणे बंद केले. २०१७ नंतर विराटने अशा जाहिराती स्वीकारल्या नाहीत.
४ राशिद खान
अफगाणिस्थानचा फिरकी गोलंदाज राशिद खान याने मागील काही वर्षात जागतिक क्रिकेट मध्ये आपली छाप सोडली आहे. राशिद खान बिग बॅश लीग या ऑस्ट्रेलियन टी-२० लीग मध्ये ऍडिलेड स्ट्राईकर्स कडून खेळतो व संघाला देखील एका बियर निर्मात्या कंपनीने स्पॉन्सर केले आहे. मात्र राशीदने त्या कंपनीचे नाव आपल्या जर्शीवर लावण्यास नकार दिला आहे.
५ इमाद वसीम
पाकिस्तानचा ऑलराऊंडर इमाद वसीम हा कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका तल्लवाह या संघाकडून खेळतो या संघाच्या जर्सीवर एका बियर निर्मात्या कंपनीचे नाव आहे. मात्र इमादने या कंपनीचे नाव आपल्या जर्सीवर ठेवण्यास नकार दिला आहे.
या काही खेळाडूंनी आपल्या जीवनातील महत्वाचे निर्णय घेऊन जगातील सर्वच खेळाडूंसाठी व क्रिकेटप्रेमींसाठी एक महत्वाचा संदेश दिला आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम