Take a fresh look at your lifestyle.

राजस्थानच्या २२ वर्षीय तरुणाने बनवलेले “फेस शिल्ड” कोरोना योध्यासाठी आशादायी !

0

सध्या संपूर्ण जगासमोर एकच प्रश्न आहे, तो म्हणजे कोरोना व्हायरस. यावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. पण तोपर्यंत कोरोनापासून बचाव तर करावा लागेल. सध्या जगभरात बचावासाठी अनेक पर्याय शोधले जात आहेत. मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, ठराविक अंतर ठेवणे, अगदी आपल्याकडे आपल्याकडे सध्या जो लॉकडाऊन चालू आहे. तो देखील कोरोना रोखण्याचा एक उपायच आहे.

यासोबतच सध्या अजून एक उपाय लोकांना सांगितला जातो आहे तो म्हणजे फेस शिल्ड मास्क

प्रत्येक भारतीय व्यक्तीला अभिमान वाटेल असे हे “फेस शिल्ड मास्क” बनविले आहे राजस्थानमधील बुंदी येथील शेतकरी कुटुंबातील नवीन सुमन या २२ वर्षीय युवकाने. फेस शिल्ड हि कोरोनाच्या लढ्यात चेहऱ्यावर ढाल बनायचे काम करत आहे.

हे फेस शिल्ड मास्क नवीन याने आपल्याजवळ उपलब्ध असणाऱ्या काही टाकाऊ साधनापासून अतिशय कमी किमतीत बनविले आहे आणि हे बनविण्यासाठी त्यांनी फक्त ३० रुपये खर्च केला असून कोणतीही सामान्य व्यक्ती आपल्या घरी फक्त १० मिनिटांत हे फेस शिल्ड बनवू शकेल असे तंत्रज्ञान त्याने विकसित केले आहे. एवढेच नाही तर नवीन सुमन याने हे फेस शिल्ड सामान्य व्यक्तीला घरी बनवता येईल याची प्रात्यक्षिके सोशल मीडियावर लोकांना मोफत शिकवली.

राजस्थान मधील एका २२ वर्षीय तरुणाने बनवलेल्या या फेस शिल्ड मास्क ची सध्या जगभर चर्चा आहे.

कोण आहे नवीन सुमन ?

नवीन सुमन यांनी ब्लॉकचेन आणि फिनटेक या क्षेत्रात अमेरिकेतून पदवी पास केली आहे. भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया प्रकल्पाअंतर्गत त्याने याआधी कोरफडी पासून बॅटरी बनवून जागतिक पातळीवरील पेटंट मिळूवून भारताचे नाव चमकवले आहे. याशिवाय नवीन यांनी नासा, इंटेल, अँपल सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुख्यालयांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. येणाऱ्या काळात भारतातील मुलांना नवनवीन उद्योग आणि संकल्पनेत काम करता येईल यासाठी तो प्रयत्न करतो आहे.

मास्कला प्रभावी पर्याय म्हणून वापरण्यात येणारे फेस शिल्ड मास्क आपण पाहिले असतील. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी फेस शिल्ड मास्क घालण्याची शिफारस शासनाकडून केली जात आहे. अगदी जपानमधील टोकियोच्या महामारीशास्त्र संशोधकांचे म्हणणे आहे की फेस शिल्ड मास्क संरक्षण करण्यास इतर मास्कपेक्षा अधिक सक्षम आहे. याचे कारण असे की फेस शिल्ड मास्क चेहऱ्यावरील अधिक विषाणू रोखू शकते आणि चेहऱ्याला वारंवार हात लावण्यापासून प्रतिबंधित करतो कि ज्यामुळे विषाणूचा संसर्ग थांबून कोरोना पासून बचाव होऊ शकतो .

https://twitter.com/AloeEcell/status/1248872800200224772

फेस शिल्ड ज्यामुळे संक्रमित व्यक्तीपासून फ्रंटलाइन वॉरियर्सचे म्हणजे पोलीस , डॉक्टर आणि इतर सेवा देणारे कर्मचारी बरोबर पेशंट यांचेही संरक्षण करण्यास मदत होत आहे . पोलीस , डॉक्टर आणि इतर सेवा देणारे कर्मचारी बरोबर पेशंट त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा-पुन्हा हात ठेवू शकणार नाहीत. फेस शील्ड तयार झाल्यानंतर नवीन सुमनला देशातील विविध राज्यांमधून हे विकण्यासाठी डिमांड पास मिळाला आहे. भारतच नव्हे तर पूर्ण जगभर हे फेस शिल्ड मास्क वापरले जात आहे.

  • रितेश पोपळघट

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.