आपण गुगल काहीही फुकट बघू शकतो ? पण त्याचे नेमके कारण काय …
असे म्हणतात की कुठलीही कंपनी ही कुठलीही सेवा जास्त काळ फुकट नाही देऊ शकत. पण गूगल ह्याला नक्कीच अपवाद आहे ? इतक्या सगळ्या सेवा आणि उत्पादने (थोड्यावगळता) गूगल फ्री मध्ये कसे काय देऊ शकते ह्याचा विचार कधी केला आहे का ?
गूगलचे सगळ्यात महत्वाचे प्रॉडक्ट (उत्पादन) कोणते आहे माहीत आहे का? ह्याचे उत्तर आहे ग्राहक. आता तुम्ही म्हणाल असे कसे. ग्राहकच उतपादन कसे होऊ शकते. तर आपण जेव्हा गूगलचे कुठलेही उत्पादन किंवा सेवा वापरतो, तेव्हा आपण दिलेली माहिती गूगल साठवून ठेवते. प्रत्येक ग्राहकाचा त्यांच्याकडे एक प्रोफाइल बनलेला असतो. आणि ह्याचा वापर ते जाहिरात दाखविण्यासाठी करतात.
गुगल सगळ्यात जास्त नफा जाहिरातींच्या माध्यमातून
गुगल सगळ्यात जास्त नफा (दोन तृतीयांश पेक्षा जास्त) हा जाहिरातींच्या माध्यमातून कमावते. जाहिराती दाखविण्यासाठी त्यांचे दोन प्लॅटफॉर्म आहेत ते म्हणजे – गूगल ऍडसेन्स आणि गूगल ऍडवर्ड्स (नवीन नाव गूगल ऍड्स). जेव्हा तुम्ही गुगलमध्ये एखादी गोष्ट शोधत असता त्यावेळेला तुम्हाला त्याच्या संबंधित काही जाहिराती दाखवल्या जातात. उदा. जर तुम्ही घड्याळ शोधत असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिले काही घड्याळ त्यांच्या किमतीसहित दाखवले जातात. आणि त्यापैकी जर कशावर तुम्ही क्लिक केले तर ती मोबाईल कंपनी गूगलला पैसे देते. अशाच प्रकारे काही वेळेला उत्पादने न दाखवता वेबसाईट्स जाहिरातीच्या माध्यमातून गूगल मध्ये सुरुवातीला दाखवल्या जातात. आणि त्याचा क्लिक वर ती वेबसाईट गूगलला पैसे देते.
ह्याव्यतिरिक्त विविध वेबसाईट्स वर ऍडसेन्सच्या माध्यमातून जाहिराती दाखवल्या जातात. म्हणजेच समजा तुम्ही एखादी ट्रॅव्हल वेबसाईट उघडला आणि जर ती वेबसाईट ऍडसेन्स मध्ये समाविष्ट असेल तर त्यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हल पॅकेजच्या किंवा अन्य जाहिराती गूगल दाखवते आणि जेव्हा त्यावर क्लिक केले जाते तेव्हा ज्या वेबसाईट किंवा उत्पादनाबद्दल ती जाहिरात आहे ती वेबसाईट पैसे देते जे गूगल आणि ज्या वेबसाईटवर ती दाखविण्यात येते ह्यामध्ये वाटून घेतले जातात.
सध्याच्या काळामध्ये मोबाईल जगतामध्ये जिचा सगळ्यात जास्त बोलबाला आहे ती अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टिम ही सध्या गुगलच्या मालकीची आहे. आणि गूगल ह्यातून पण बऱ्यापैकी नफा कमावते. पण ह्याचे अधिकृत आकडे उपलब्ध नाही आहेत. मोबाईलवर पण आपण ज्या खूप ठिकाणी जाहिराती बघतो त्यामागे पण गुगलच असते.
गूगल प्ले प्लॅटफॉर्मवर काही ऍप्स आहेत जी वापरण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागतात जसे की वेगवेगळे गेम्स. ह्यामधून जे पैसे भेटतात ते गूगल आणि ऍप बनविणारी कंपनी ह्यामध्ये वाटून घेतले जातात.
गूगल प्ले मीडियाचा वापर आपण मूवी बघण्यासाठी (प्ले मुव्हीज) तसेच डिजिटल पुस्तके वाचण्यासाठी करू शकतो (प्ले बुक्स). आणि ह्या प्लॅटफॉर्मवरील ज्या गोष्टींसाठी ग्राहक पैसे मोजतात तो नफा पण गूगल आणि त्या कंपनीमध्ये वाटून घेतला जातो.
ह्याशिवय गुगलचा स्वतःचा क्लाऊड सर्विस प्लॅटफॉर्म आहे त्याची सेवा काही कंपन्या वापरतात आणि त्यातून पण नफा येतो.
गुगल पे ही पेमेंट सेवा कंपनीने काही काळापूर्वी बाजारात आणली. सुरुवातीला जरी ही सेवा ग्राहकांना फ्री मध्ये देण्यात आली तरी पुढे जाऊन खरेदी करताना काही शुल्क गूगल आकारेल अशी शक्यता आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेले काही पेमेंट प्लॅटफॉर्म खरेदीच्या वेळेला थोडे शुल्क लावताना दिसतात. ह्या प्लॅटफॉर्मचा वापर पण लौकरच नफा कमविण्यासाठी गूगल करेल.
गूगलच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर पण विडिओ आणि टेक्स्ट स्वरूपातील जाहीराती दाखवल्या जातात. आणि ह्यातून भेटणार नफा पण गूगल आणि युट्यूब चॅनेल ह्यामध्ये वाटून घेतला जातो.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम