३० सेकंदात कळेल ‘कोरोना’चा अहवाल
मागच्या काही महिन्यात कोरोना आपल्यासाठी आता नवीन राहिला नाही. पण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता महाराष्ट्र सरकार आता नवा पुढाकार घेत आहे.
महाराष्ट्रात आता आवाजाद्वारे कोरोना तपासला जाणार आहे.
नुकतेच राज्य सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट करून हि माहिती दिली आहे. बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) पुढील आठवड्यापासून आवाजावर आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोरोना संक्रमणाची तपासणी करणार असल्याचे समजते.
काय आहे हे तंत्रज्ञान ?
यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आवाज ऐकून लोकांमध्ये होणारे संसर्ग ओळखण्याचे काम केले जाते. संशयास्पद रुग्णाला मोबाइल किंवा कम्प्युटरसमोर बोलण्यास सांगितले जाईल. यामध्ये आधीच व्हॉइस अॅनलीसीस इन्स्टॉल केलेले असेल. यामध्ये आवाजाबरोबर संशयिताचे तापमान, बीपी याचाही वापर केला जाईल.
३० सेकंदात येईल अहवाल
संशयिताच्या बोलणे सुरु झाल्याबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपले काम सुरू करेल. संशयिताच्या आवाजाची वारंवारिता काय आहे आणि आवाजात काही खरखर ऐकू येतेय का ? याचा अंदाज घेतला जाईल.
या अॅपमध्ये निरोगी लोकांचे हजारो आवाजाचे नमुने असतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून या आवाजाशी संशयित व्यक्तीचा आवाज मॅच केला जाईल. त्यानंतर अवघ्या ३० सेकंदात रिपोर्ट दिला जाईल.
या टेक्नोलॉजीच्या मागे टिंबर नावाचे ऑडिओ अॅप काम करते. हे अॅप आवाजाच्या गुणवत्तेवर काम करते. आपल्या कानाला आवाजाच्या पॅरामीटरमध्ये होणारे वेगवेगळे बदल कळत नाहीत, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मात्र हे बदल व्यवस्थित मोजते.
कोणत्याही व्यक्तीच्या आवाजात ६३०० वेगवेगळे आवाजाचे पॅरामीटर असतात, जे माणसाला जाणून घेणे सोपे नाही. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हे बदल टिपणे शक्य आहे.
कोरोना विषाणू माणसाच्या श्वसन संस्थेवर परिणाम करतो त्यामुळे याचा परिणाम माणसाच्या आवाजावर देखील होत असणार. म्हणून महाराष्ट्रात व्हॉइस टेस्टिंग तंत्रज्ञान सुरू केले जात आहे.
व्हॉइस टेस्टिंगची संकल्पना
जगात व्हॉइस टेस्टिंग तंत्रज्ञान चा वापर करणारा इस्रायल पहिला देश होता. जुलै महिन्यात कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेता, टेक्नॉलॉजीने पुढारलेल्या या देशाने लवकरात लवकर टेस्टिंग टेक्नॉलॉजी शोधण्यासाठी पुढाकार घेतला.
सध्या ज्या प्रकारे कोरोना टेस्टिंग केली जाते. त्याचा रिपोर्ट यायला कित्येक तास आणि दिवस लागत आहेत. यामुळे रिपोर्ट येईपर्यंत त्या रुग्णाकडून इतरांना संसर्ग होऊ शकतो. याचा विचार करून इस्रायलने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित टेक्नॉलॉजीची निर्मिती केली.
इस्रायलनेही या तंत्रज्ञानासाठी भारताशी भागीदारी केली आहे. या चाचणीचे निकाल बरोबर आल्यास भारतात चाचणी किट्स बनवल्या जातील आणि इस्रायल त्याचे जगभर मार्केटिंग करेल.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम