Take a fresh look at your lifestyle.

१५ वर्षात १५ वेळा बदली : कसा आहे तुकाराम मुंडे यांचा प्रवास

0

आपल्या राज्यात सतत चर्चेत असणारी काही नावे काढली तर यामध्ये सर्वात वरती एक नाव येईल ते म्हणजे तुकाराम मुंडे. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे तुकाराम मुंडे कायम चर्चेत असतात.

नुकतीच त्यांची राज्य सरकारने पुन्हा बदली केली आहे.

महाराष्ट्रात तुकाराम मुंडे प्रसिद्ध होण्याचे मुख्य कारण म्हणजे राजकारणी आणि भ्रष्ट लोकांना ते ज्या प्रकारे वागवतात. त्यामुळे सामान्य जनता मात्र त्यांना हिरो मानते, हे नक्की तुकाराम मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. ३ जून १९७५ रोजी जन्मलेले तुकाराम मुंढे यांचं दहावी पर्यंतच शिक्षण सामान्य पद्धतीनेच जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं.

पुढे त्यांनी इतिहास आणि समाजशास्त्रातून बी. ए. ही पदवी मिळवली तर राज्यशास्त्रातून एम. ए. चे शिक्षण पूर्ण केले. त्याच दरम्यान त्यांनी जळगाव येथे अध्यापनाचे कार्य देखील केले.

पदवीनंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी पुढील अभ्यासाला सुरुवात केली. आधी एमपीएससी मार्फत वित्तीय सेवेचे गट ब अधिकारी म्हणून निवड झाली. एमपीएससी परीक्षेत निवड झाल्यानंतर पुणे येथील “यशदा” या संस्थेत अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होत असते तेव्हाच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. त्यात ते देशातून विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.

२००५ च्या तुकडीचे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचा प्रवास सुरू केला

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंढे यांची पहिली नियुक्ती सोलापूर येथे झाली. याच काळात त्यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून कसे काम करतील याची झलक सर्वच लोकांना पाहायला मिळाली.

याच काळात सोलापुरात अतिक्रमनाच्या प्रश्नावरून तुकाराम मुंढे यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यातच त्यांची बदली झाली. त्यानंतर आजपर्यंत तुकाराम मुंढे आणि बदली हे एक समीकरणच होऊन बसले आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीचे अनेक किस्से सांगितले जातात. त्यातलाच एक किस्सा

२००८ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना त्यांनी काही जिल्हा परिषदेच्या शाळांचा दौरा केला. त्यात त्यांना शिक्षकच शाळेत गैरहजर आढळले. दुसऱ्या दिवशी त्या सर्व अनुपस्थित शिक्षकांना त्यांनी निलंबित केले होते. तेव्हापासून या प्रकारांना चाप बसला तो कायमचाच !

जिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांना डॉक्टर अनुपस्थित दिसले तर त्यांनी डॉक्टरांना पण निलंबित केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने डॉक्टरला निलंबित करण्याचे हे पहिलेच प्रकरण होते.

अनेक ठिकाणी बदल्या होत असताना त्यांनी केलेल्या कामाचाही मोठा ठसा त्यांनी उमठवला आहे. याचीही अनेक उदाहरणे सांगितली जातील.

तुकाराम मुंढे सोलापूरला जिल्हाधिकारी असताना पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी वारकरी लोकांसाठी त्यांनी फक्त २१ दिवसात तात्पुरत्या शौचालयांची निर्मिती केली.

त्याचसोबत मुख्यमंत्री सोडून इतर व्हीआयपी लोकांची खास दर्शनव्यवस्था बंद केली. यावरून मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यामुळे तुकाराम मुंढे जिकडे जातात तिकडे राजकारणी लोकांना डोकेदुखी ठरतात. हे मात्र नक्की

त्यामुळे त्यांच्या अनेक वेळा बदल्या केल्या गेल्या. पण बदल्यांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे.

तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत झालेल्या बदल्या

  1. सोलापूर प्रकल्प अधिकारी (ऑगस्ट 2005 ते ऑगस्ट 2007)
  2. नांदेड : उपजिल्हाधिकारी (सप्टेंबर 2007 ते डिसेंबर 2007)
  3. नागपूर : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (जानेवारी 2008 ते मार्च 2009)
  4. नाशिक : आदिवासी विभाग आयुक्त (मार्च 2009 ते जुलै 2009)
  5. वाशिम : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (जुलै 2009 ते मे 2010)
  6. मुंबई : खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुख्य कार्यकारी अधिकारी (जून 2010 ते जून 2011)
  7. जालना : जिल्हाधिकारी (जून 2011 ते ऑगस्ट 2012)
  8. मुंबई : सहाय्यक विक्रीकर आयुक्त (सप्टेंबर 2012 ते नोव्हेंबर 2014)
  9. सोलापूर : जिल्हाधिकारी (नोव्हेंबर 2014 ते एप्रिल 2016)
  10. नवी मुंबई : महापालिका आयुक्त (मे 2006 ते मार्च 2017)
  11. पुणे : महानगर परिवहन महामंडळअध्यक्ष ( मार्च 2017 ते फेब्रुवारी 2018)
  12. नाशिक : महापालिकेचे आयुक्त (फेब्रुवारी 2018 ते नोव्हेबर 2018)
  13. मुंबई : नियोजन विभाग, मंत्रालयात सहसचिव ( नोव्हेंबर 2018 ते डिसेंबर 2019)
  14. मुंबई : एडस नियंत्रण प्रकल्प संचालक (डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020)
  15. नागपूर : महापालिका आयुक्त (जानेवारी 2020 ते ऑगस्ट 2020)

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.