Take a fresh look at your lifestyle.

आणि वाजपेयी म्हणाले ” तर पाकिस्तानमध्येही निवडणुका लढणे सोपे जाईल”

0

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश. दोन्ही देशामध्ये आजवर चार युद्ध झाली. अनेकदा सीमेवर तणाव असतो. पण सीमेवर तणाव असला कि त्याचा परिणाम दोन्ही देशातील इतर सबंधावर देखील पडतो.

असाच प्रसंग १९९९ साली झाला होता. १९९९ साली भारत पाकिस्तान मध्ये कारगिल युद्ध झाले. दोन्ही देशातील तणावपूर्वक या वातावरणाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट पूर्णपणे बंद झाले. त्यानंतर जवळपास पाच वर्ष भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये कोणताही सामना झाला नाही.

२००४ साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दोन देशांमधील संबंध चांगले करण्यासाठी क्रिकेटचा मार्ग निवडला आणि पुन्हा भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली.

पाकिस्तान सोबत सबंध पुनर्स्थापित करण्यासाठी २००४ सालीच पंतप्रधान वाजपेयी सार्क शिखर परिषदेसाठी पाकिस्तानमध्ये गेले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी सौरव गांगुलीच्या नेतृत्वात असलेल्या टीमला तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली.

दोन्ही देशातील सबंध सुधारण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतलेल्या या निर्णयाचे मोठे स्वागत झाले. भारतीय क्रिकेट टीमचा तो दौरा इतका लोकप्रिय झाला की त्या मालिकेतील एका खेळाडूचा प्रत्येक डाव अजूनही आठवतो. मग वीरेंद्र सेहवागची 309 धावांची खेळी असो किंवा सचिन, द्रविड आणि गांगुलीची शानदार कामगिरी.

सर्वात विशेष म्हणजे टीम इंडियाने एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकली.

त्यावेळी भारतीय टीमसोबत टीम मॅनेजर म्हणून गेलेल्या रत्नाकर शेट्टी वाजपेयी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले कि पंतप्रधान वाजपेयींनी टीमला दिलेला संदेश होता कि “खेल ही नहीं, दिल भी जीतिए”

जेव्हा भारतीय टीम पाकिस्तानला पोहोचली तेव्हा पंतप्रधान वाजपेयींच्या या निर्णयाचे पाकिस्तान मधील लोकांनी मोठे कौतुक केले. खरतर त्यावेळी प्रत्येकाला क्रिकेटचे संबंध सुधारण्याची इच्छा होती.

याच मुलाखतीमध्ये रत्नाकर शेट्टी म्हणतात कि, “टीमच्या अगोदर मी पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी विमानतळ, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वाजपेयीजींची छायाचित्रे घेऊन लोक उभे होते.”

रत्नाकर यांनी हाच प्रसंग पंतप्रधान बाजपेयी यांना सांगितला कि पाकिस्तानमध्ये लोक वाजपेयी यांच्यावर किती आनंदी आहेत. पण रत्नाकर यांनी वाजपेयीजींना सांगितले तेव्हा ते हसले आणि ते म्हणाले, ” तर यानंतर पाकिस्तानमध्येही निवडणुका लढणे सोपे जाईल. “

पाकिस्तानला जाण्यापूर्वी भारतीय टीम जेव्हा पंतप्रधान वाजपेयी यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी वाजपेयींनी टीमला एक बॅट भेट दिली होती, ज्यावर एकच मेसेज लिहिला होता, “केवळ खेळच नव्हे तर हृदय जिंकून घ्या” शुभेच्छा.

जेव्हा पाकिस्तानमध्ये संघ जिंकला तेव्हा वाजपेयींनी शेट्टी यांना बोलावून संघाचे अभिनंदन केले. कॅप्टन सौरव गांगुलीशीही बोललो.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.