Take a fresh look at your lifestyle.

व्हाॅट्स अप वर एक मेसेज आला आणि जिल्हा रात्रभर जागा राहिला

0

कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे सध्या अख्खा भारत घरात बसून आहे. दिवसभर घरात बसून करायचं काय ? हा आता लोकांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जवळपास सगळा भारत घरात फेसबुक, व्हाॅट्स अप करत बसला आहे.

अशातच व्हाॅट्स अप वर एक मेसेज आला आणि सगळा जिल्हा रात्रभर जागा राहिला

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की झालं तरी काय ? तर मग वाचा

काल रात्री उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील किल्लारी, उमरगा, निलंगा याच्यासह इतर काही भागात एक व्हाॅट्स अप मेसेज व्हायरल झाला. तसंही सध्या सगळ्यांना काम नसल्याने बरेच मेसेज व्हायरल होत आहेत. पण या मेसेजने मात्र लोकांची झोपच गायब केली.

काय होत या मेसेजमध्ये ? थोडक्यात वाचा

“एका गावात एका बाईला दोन तोंडाचं बाळ झालं आणि ते जन्माला येताच बोलू लागलं. ते दुतोंडी बाळ म्हणालं की आता जग बुडणार आहे. जे आज रात्री जागे राहतील ते जगतील. जे झोपतील ते कायमचे झोपतील. एवढं सांगून ते बाळ तात्काळ गतप्राण झालं. तरी ज्यांना जिवंत रहायचे आहे त्यांनी कोणीही रात्री झोपू नये.”

बघता बघता हा मेसेज आख्या पंचक्रोशित व्हायरल झाला आणि लोकं रात्रभर जागी राहिली. आपल्या बायका-पोरांना घेवून लोक आपापल्या घराबाहेर पडले. गावातल्या बायका आपल्या मुलाबाळांना झोप येऊ नये म्हणून पेंगणाऱ्या लेकरा बाळांना फटके मारत होत्या.

दुसरीकडे रात्रभर लोकांचे फोन वाजत होते. अनेक लोक आपापल्या नातेवाईकांना फोन करून झोपू नका म्हणून काळजीने सांगत होते. झोपलेल्या पाहुण्या रावळ्याना झोपू नका सांगत होते. सगळ्या गावात हीच परिस्थिती. रात्रभर मोठा धुमाकूळ चालू होता.

ज्यांना हे व्हायरलच गणित कळत होत, ते बाकीच्या लोकांना समजावून नाकी नऊ आले तरी कोणीही ऐकायला तयार नव्हते. शेवटी रात्र सरली आणि दिवस उजाडल्यावर सगळा प्रकार थांबला आणि मग लोक आपापल्या घरी परत गेले.

बाकी हे सगळ सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे

कोरोनामुळे लोकं निवांत घरात आहेत. त्यामुळे बसल्याबसल्या अनेकजण मुद्दाम अफवा परसवण्याचे उद्योग करत आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.

बाकी सरकारने अश्या उद्योगी लोकांना शोधून योग्य भाषेत समज द्यावी हि विनंती

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.