Take a fresh look at your lifestyle.

आणि वयाच्या २५च्या वर्षी तो कोट्याधीश झाला

0

सध्याचा जमाना स्टार्ट अपचा आहे. आपल्या लहान वयात काहीतरी सुरुवात करून यशाचे शिखर गाठणारी अनेक नावे तुम्हाला माहिती असतील. अश्याच एका तरुण मुलाबद्दल आपण जाणून घेवूया. जो वयाच्या २५च्या कोट्याधीश झाला.

हि गोष्ट आहे एवन स्पीगल या तरुणाची.

आता तुम्ही म्हणाल, कोण हा एवन स्पीगल. त्याने असा काय तीर मारला ज्याने तो कोट्याधीश झाला. पण तुम्हाला एवन स्पीगल जरी माहित नसला तरी त्याने तयार केलेले स्नॅपचॅट अप मात्र माहित असेल. सध्या जमाना जरी व्हाटसअप चा असला तरी स्नॅपचॅट वापरणारी एक मोठी संख्या सध्या वाढत चालली आहे.

अॅप बनवण्याचा निर्णय

एवन स्पीगल जगप्रसिद्ध अश्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकत होता. त्याच वेळी एवन एका साॅफ्टवेअर कंपनीत इंटर्नशिप करत होता. स्टॅनफर्डमध्ये त्याची भेट बाॅबी मर्फी याच्याशी झाली आणि या दोघांनी ‘स्नॅपचॅट’ हे अॅप बनवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेमध्ये हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे.

फेसबुकची ऑफर

स्नॅपचॅट अॅपच्या वाढत्या लोकप्रियतेची दखल फेसबुकलाही घ्यावी लागली. २०१३ साली फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग याने स्नॅपचॅट विकत घेण्याचा प्रस्ताव एवन स्पीगल याला दिला होता. २०१३ साली जेव्हा फेसबुकने विक्रीसाठी प्रस्ताव दिला होता, तेव्हा ३ अब्ज डाॅलर्स (सुमारे २१० अब्ज रूपये!) देत विकत घेण्याचा एवनपुढे प्रस्ताव ठेवला होता. पण एवनला आपली कंपनी यापुढेही वाढणार असल्याचा विश्वास होता. त्यामुळे त्याने हा प्रस्ताव धुडकावला.

पुढे फेसबुकने ‘व्हाॅट्सअॅप’ कंपनी ताब्यात घेतली पण स्नॅपचॅटचा पसारा वाढतच गेला. त्यामुळे स्नॅपचॅट न विकण्याचा निर्णय योग्यच ठरला. आजघडीला कोट्यावधी तरुण याचा वापर करतात.

आता ‘स्नॅपचॅट’चे शेअर्स अमेरिकेतल्या शेअर बाजारात उपलब्ध होणार आहेत आणि या आयपीओ साठी ‘स्नॅपचॅट’ची व्हॅल्युएशन झालंय ते २० अब्ज डाॅलर्सचं!

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.