ऑनलाईन शिक्षणासाठी राज्य सरकारचा अभिनव प्रयोग
जगात आणि देशात कोरोना विषाणू आल्यापासून सगळ काही लॉकडाऊन मध्ये अडकल आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आपलं शिक्षण देखील लॉकडाऊन मध्ये अडकलं आहे कारण कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत.
दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरु होण्याची लगभग असते पण यंदा ते होवू शकले नाही. त्यावर उपाय म्हणून सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवले जात आहेत. पण हि ऑनलाईन पद्धत अनेक ठिकाणी शक्य नाही. कारण काही जुन्या पिढीतील शिक्षकांना हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील हे शक्य नाही.
त्यामुळे अभ्यासासाठी अचानक फक्त डिजिटल पद्धतीचा वापर करणे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही त्रासदायक आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने जिओसमवेत करार करून सरकारने मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण सुलभ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी यूट्यूबवर चार शैक्षणिक चॅनेल सुरू केले आहेत. सध्या लॉकडाऊन मुळे घरी असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडलेले ठेवणे हे यामागील त्यांचे ध्येय आहे.
सध्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी दोन भाषांमध्ये चॅनल नुकतीच सुरू करण्यात आली आहेत. तर लवकरच हिंदी व इंग्रजी भाषेतही चॅनल सुरू केली जाणार आहेत.
तर जिओ टीव्ही वरती राज्य सरकार १२ चॅनल सुरु करणार आहे. त्यापैकी ५ जुलै रोजी तीन चॅनल सुरु करण्यात आली आहेत. बाकी नऊ चॅनल लवकरच सुरु होतील. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या चॅनलसोबतच जिओ सावन वरती अॉडीओबुक देखील सुरु करण्यात आली आहेत.
लवकरच ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल पण राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. हे मात्र नक्की !
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम