Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही नादच केलाय थेट, रिक्षाचालकाच्या मुलीला 41 लाखांचे पॅकेज

राज्यात सध्या कोल्हापूरची अमृता कारंडे चर्चेचा विषय बनली आहे. चर्चेचा विषय बनण्याचं कारणं नेमकं काय आहे ?

0

अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या इंजिनिअरिंगला बरे दिवस नाहीत, असं चित्र संगळीकडं आहे. मात्र, अमृतानं कोणत्याही विषयाचा अभ्यास सकारात्मकपणे आणि सातत्यानं केला की यश आपल्यापासून दूर राहत नाही हे दाखवून दिलं आहे.

कोल्हापूरच्या अमृताला जगप्रसिद्ध अॅडोब कंपनीनं 41 लाखांचं पॅकेज दिलय. अमृताच्या या यशाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये बेरोजगारी आणि पगार कपाती संदर्भातील बातम्या समोर येत असतानाच कोल्हापूरमधील अमृता कारंडे या तरुणीला ४१ लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे.

आयआयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना इतक्या पगाराच्या नोकऱ्या सहज उपलब्ध होतात. मात्र ,इंजिनिअरिंग शिक्षण घेत असतानाच इतक्या मोठ्या रकमेची प्लेसमेंट महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच होतेय. अमृता कारंडे सध्या कोल्हापुरातील ‘केआयटी’ महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत होती. नुकतेच तिने चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे.

वडील रिक्षाचालक आहेत तर आई गृहिणी

अमृता ही मध्यमवर्गीय मराठी घरातील मुलगी असून तिचे वडील विजयकुमार हे रिक्षाचालक आहे तर आई गृहिणी आहे. “मला शिक्षण घेता यावं म्हणून माझ्या पालकांनी फार कष्ट घेतले आहेत. मला त्यांच्या या कष्टानंतर त्यांना थोडा आनंद देता आला याचं समाधान आहे. मला भारतामधील माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची इच्छा आहे,” असं अमृताने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या संख्येनं अभियांत्रिकी महाविद्यालयं स्थापन झाली. अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढल्यानं मोठ्या संख्येने इंजिनिअरिंग उत्तीर्ण असलेले विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांना नोकरी मिळणं अवघड होऊ लागलं आहे.

इंजिनिअरिंगची महाविद्यालय देखील ओस पडू लागली होती. इंजिनिअरिंग हा सध्या सगळीकडेच चेष्टेचा विषय बनलाय. या क्षेत्रातील बेरोजगारीमूळे तर याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.

आता इंजिनिअरिंग मराठी भाषेतून देखील शिकवलं जाणार आहे.

मात्र, या इंजिनियरिंग क्षेत्रातही मोठ्या संधी असू शकतात हे कोल्हापुरातल्या केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी अमृता कारंडे दाखवून दिलंय. कारण, मध्यम वर्गीय कुटुंबातील अमृताला अॅडोब या एका प्रसिद्ध कंपनीने एक दोन नाही तर तब्बल वार्षिक 41 लाखांच्या वार्षिक पॅकेजवर करारबद्ध केलंय.

इंटर्नशिपसाठी निवड झाली आणि

अमृता कारंडे तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच ‘ॲडोब’ कंपनीने ‘C कोडिंग’ ही देशस्तरावरील अभिनव स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन अमृताची अडीच महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. या इंटर्नशिप दरम्यान तिला मासिक 1 लाख रुपये शिष्यवृत्तीही मिळत होती. या इंटर्नशिप दरम्यान घेण्यात आलेल्या विविध चाचणी परीक्षांमधून तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती.

खास प्रीप्लेसमेंटची ऑफर

तिने दाखवलेली गुणवत्ता प्रमाणभूत धरून ”ॲडोब कंपनीने तिला ही खास प्रीप्लेसमेंटची ऑफर दिली आहे. ही प्लेसमेंट देशपातळीवरील विशेष म्हणून गणली जाते. अमृता आता ॲडोब कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून रुजू होणार आहे. इतकी मोठी संधी मिळाल्याचं समाधान अमृता बरोबरच तिच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना देखील आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.