बाळासाहेब ठाकरेंनी सचिन तेंडुलकरला दिला होता इशारा
क्रिकेट आणि क्रिकेटपटूंशी खूप चांगले सबंध असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा भारताचा सर्वोत्तम खेळाडू असलेल्या सचिन तेंडुलकरला कडक इशारा दिला होता. त्याला कारणही तसच होत.
एका पत्रकार परिषदेत सचिनला विचारण्यात आलं होत की, “मुंबई फक्त मराठ्यांची आहे का?” त्यावर उत्तर देताना सचिन म्हणाला होता, “मी पहिल्यांदा भारतीय आहे. मग मी महाराष्ट्रीयन आहे. मुंबई सर्व भारतीयांची आहे.”
सचिनचं हे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत गेलं. त्यावर सचिनने राजकारणाबद्दल वक्तव्ये करू नये अशा शब्दात त्यांनी जाहीरपणे जोरदार टीका केली होती. पण ते त्यावरच तिथे थांबले नाहीत. त्यांनी “सामना” या शिवसेना मुखपत्रात सचिन तेंडुलकरला एक खुले पत्र लिहिले होता.
त्यांनी लिहिले होते, जिभेची बॅट बनवून मराठ्यांना दुखावणे खपवून घेतले जाणार नाही.
बाळासाहेबांनी सामना मध्ये लिहिले होते की, सचिनने क्रिकेट खेळले पाहिजे. त्याने राजकारणाच्या पिचवर फलंदाजी करण्याचा प्रयत्नही करू नये.” यापुढे तिखट भाषेचा वापर करून त्यांनी लिहिले, “राजकारणाच्या पिचवर क्रिकेटच्या पिचवर तुम्ही जे कमावले आहे ते गमावू नका. सध्या मी तुला तुझ्या भल्यासाठी इतका प्रेमळ संकेत देत आहे.
लोक तुमच्या चौकारांच्या षटकारांवर टाळ्या वाजवतात , पण मराठी जनतेच्या न्यायाच्या हक्काच्या मुद्द्यावर मराठी लोकांना दुखापत झाली तर ते खपवून घेतले जाणार नाही, पण आजकाल क्रिकेटपटू फक्त स्वत:साठी खेळतो. मराठी माणसाने महाराष्ट्र मिळवला तेव्हा तुमचा जन्म पण झाला नसेल.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम