उपचाराअभावी बहिणीचे निधन; टॅक्सी चालकाने चक्क गावात हॉस्पिटल बांधले!
माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात, ज्याने तुमचे आयुष्य बदलून जाते. आज आपण अशाच एका माणसाबद्दल जाणून घेणार आहोत. उपचाराअभावी बहिणीच्या निधन झाल्याने ज्याने आपल्या बहिणीच्या नावाने कोलकाता येथील पुनीरी गावात दवाखाना उघडण्यासाठी रात्रीचा दिवस करून घाम गाळला.
या व्यक्तीचे नाव म्हणजे सैदूल लश्कर. सैदुल कोलकात्यात एक टॅक्सी ड्रायव्हर आहे.
सैदूल टॅक्सी चालवून आपले कुटुंब चालवतो. सैदूलकडे त्याच्या बहिणीवर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याच्या बहिणीला त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना कायमचे सोडून जावे लागले. बहिणीच्या निधनानंतर सैदुलच्या कुटुंबाला मोठे दुःख झाले.
बहिणीच्या निधनानंतर सैदुलला मोठा धक्का बसला. तो स्वत:ला हतबल समजू लागला. कारण तो आपल्या बहिणीवर उपचार करू शकला नाही.
पण त्यानंतर सैदुलने निर्धार केला कि पैशांच्या अभावी आपल्या गावात उपचार न मिळण्यावाचून कोणी वंचित राहणार नाही
हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय
सैदुलने गावात हॉस्पिटल बांधण्याचा निर्धार केला. पण ते तितके सोपे नव्हते. कारण सैदुलची आर्थिक परिस्थिती पाहता त्यासाठी हॉस्पिटलचा प्रवास अडचणीचा होता. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, हॉस्पिटल बांधण्यासाठी दोन बिघा जमीन विकत घेणे आवश्यक होते, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते.
सैदुलने आपला हा प्रॉब्लेम आपल्या बायकोला सांगितला की, त्याला पैसे मिळत नाहीत. त्यानंतर सैदुलच्या बायकोने आपले सर्व दागिने सैदूलला दिले. दागिने देताना त्याच्या पत्नीने त्यांना ती विकून जमीन विकत घेण्यास सांगितले.
सैदूलला माहीत होतं की टॅक्सी चालवून त्याला इतके पैसे कधीच मिळवता येणार नाही ज्यातून त्याला हॉस्पिटल उभं करता येईल.
लोकांकडून मदत मागण्यास सुरुवात
सैदुलने हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतला पण त्यासाठी पैसे मिळत नव्हते. त्यानंतर सैदुल टॅक्सीत बसलेल्या प्रवाशांकडून मदत मागू लागला. मदत मागताना अनेकदा त्याच्या हातात निराशा आली. पण सैदुल म्हणतात की, जर प्रामाणिकपणे केले तर परिणाम उशिरा येतात पण ते चांगले होते.
सैदुलची जिद्द पाहून हळूहळू लोक त्यांना मदत करू लागले.
सैदूल म्हणाला की, एक २३ वर्षांची मुलगी त्याच्या कॅबमध्ये बसली. ती मेकॅनिकल इंजिनियर होती. त्याने मुलीकडून मदत मागितली. तेव्हा तिच्याकडे १०० रुपये ज्यादा होते. तिने सैदूल यांचा नंबर घेतला. सैदूल म्हणाला की, गेल्या वर्षी जून महिन्यात ती मुलगी हॉस्पिटलमध्ये आली आणि तिने त्याला २५,००० रुपये दिले.
स्वप्नपुर्तीची 12 वर्षे
१२ वर्षांच्या संघर्षानंतर सैदुलचे स्वप्न पूर्ण झाले. तेथे त्यांनी कोलकात्याच्या बाहेर असलेल्या पुनरी गावात त्याने हॉस्पिटल बांधले. हॉस्पिटलचे नाव “मारुफा स्मृती वेल्फेअर फौंउडेशन” आहे.
सैदुलच्या बहिणीचं नाव मारुफा होतं. तिच्या नावाने तिने हॉस्पिटल बांधलं.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या हॉस्पिटलचा सुमारे १०० गावांना फायदा होणार आहे. हॉस्पिटलची ओपीडी आहे. पण बाकी सुविधा पूर्ण करायला आणखी काही काळ लागणार आहेत. सध्या ३० खाटांचे हॉस्पिटलमध्ये आहे.
स्वयंसेवी संस्थांची मदत
सध्या हॉस्पिटल सुरु झाले असले तरी बाकी अत्याधुनिक व्यवस्था करायची बाकी आहे. त्यासाठी काही कोटी रुपये लागतील. सध्या हॉस्पिटलचा पहिला मजला बाहेरच्या रुग्णांसाठी असेल आणि दुसऱ्या मजल्यावर पॅथॉलॉजी लॅब असेल. सैदूल हॉस्पिटल बांधण्याच्या प्रवासात तो एकटाच होता, पण आता त्याला अनेक संघटनांनी मदत केली आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम