Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरेंचे मेहुणे कोण आहेत? ते काय करतात?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर  यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने अप्रत्यक्ष मातोश्री वरच कारवाई केले सारखे बोलले जात आहे.

0

महाविकास आघाडी राज्य स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी विरोधात कारवाई करतांना दिसून आले आहे. मात्र आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर  यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने अप्रत्यक्ष मातोश्री वरच कारवाई केले सारखे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केलीये.

त्यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पातील 11 फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. पुष्पक बुलियन नावाच्या एका कंपनीवर ईडीने मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

कोण आहेत श्रीधर पाटणकर?

श्रीधर माधव पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत. श्रीधर पाटणकर हे उद्योजक असून ते डोंबिवलीत राहतात. श्रीधर पाटणकर यांचे वडिल माधव पाटणकर हे देखिल मोठे उद्योजक होते.

श्रीधर पाटणकरांच्या ठाणे इथल्या निलांबरी प्रकल्पातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. पुष्कप बुलियन कंपनीच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यात पाटणकर यांचं नाव समोर आलं होतं.

काय आहे प्रकरण?

श्रीधर पाटणकर व्यवसायाने बिल्डर आहेत. मुंबई आणि ठाण्यात त्यांचं प्रामुख्याने काम असल्याची माहिती आहे. श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ते साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक असून या कंपनीच्या मालकीच्या 11 सदनिका जप्त करण्यात आल्यात.

हमसफर डिलरनं पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटी कर्ज दिले होते. मात्र हमसफर ही कंपनी बनावट असल्याचं ईडीचा आरोप आहे.

नंदकिशोर चर्तुवेदी यांची हमसफर कंपनी आहे. त्यांच्याकडून पाटणकरांच्या कंपनीनं विनातारण कर्ज घेतले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी पाटणकरांच्या कंपनीत पैसे दिले. या पैशातूनच ठाण्यात निलांबरी प्रोजेक्टचं बांधकाम करण्यात आले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. 2017 त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

श्रीधर पाटणकर काय करतात?

सामवेद रिअल इस्टेट एलपीपी या कंपनीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांचं नाव संचालक म्हणून आहे. आशर प्रोजेक्ट डीएम एलपीपी या कंपनीमध्येही श्रीधर पाटणकर यांचं नाव संचालक म्हणून रजिस्टर आहेत. तर ठाकोर लॅंड डिव्हेलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत श्रीधर पाटणकर 2015 पासून संचालक म्हणून कार्यरत आहेत .

सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्याशी संबंधीत तब्बल 11 फ्लॅट ईडीनं जप्त केले आहेत. आता विरोधकांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आम्ही योग्य पद्धतीने उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना दिली आहे.

 

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.