जेव्हा राजीव गांधींनी अटलबिहारी वाजपेयी यांचे प्राण वाचवले
आज सध्याच्या परिस्थिती मध्ये जेव्हा राजकारणामध्ये आणि राजकारणी लोकांमध्ये कटुता वाढत आहे. पण भारताच्या राजकीय इतिहासामध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या राजकारणातल्या चांगल्या बाजूचे प्रतिनिधित्व करतात.
असाच एक किस्सा आहे तो माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी यांच्यातला. पत्रकार करण थापर यांनी आपल्या पुस्तकात हा किस्सा लिहिला आहे.
जेव्हा राजीव गांधींच्या हत्येनंतर करण थापर यांनी वाजपेयीजींना फोन करून राजीव गांधी यांच्या विषयी बोलायला आवडेल का ? असे विचारले असता वाजपेयीजींनी करण यांना घरी बोलावले व करणला सांगितले की दुसरे कोणी सांगण्याआधी त्यांना काहीतरी सांगायचं आहे.
वाजपेयी यांनी त्यावेळी करण थापर यांना सांगितले की, “जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा त्यांना कळले की मला किडनीचा आजार आहे. ज्याचा परदेशात उपचार केला जाईल, तेव्हा राजीव यांनी मला कार्यालयात बोलावले आणि सांगितले की ते यूएन मध्ये जाणाऱ्या भारतीय प्रतिनिधीमंडळात तुम्हाला जायचं आहे आणि आशा व्यक्त करतो की या संधीचा वापर करून मी आवश्यक ते उपचार करेन. मी न्यूयॉर्कला गेलो आणि माझा उपचार केला आणि आज मी तुमच्यासमोर बसलो आहे, आज मी जिवंत आहे.
वाजपेयी पुढे म्हणाले होते, “तर माझी समस्या काय आहे हे आपल्याला समजले असेल. करण, मी आज विरोधात आहे आणि लोकांना मी विरोधकांप्रमाणेच राजीव गांधींबद्दल बोलावे असे वाटते. पण मी ते करू शकत नाही. राजीवने माझ्यासाठी काय केले याविषयी मला फक्त बोलायचे आहे. जर ते तुमच्यासाठी योग्य असेल तर मी बोलण्यास तयार आहे. जर ते तेथे नसेल तर मला काही सांगायचे नाही. “
अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील सर्वोत्तम नेते मानले गेले. त्याला अशी खूप सारी कारणे आहेत.
आज मात्र आपण सत्ताधारी आणि विरोधी दोन्हीकडून या वर्तनाची अपेक्षा करणे शक्य नाही. मागच्या काही वर्षात राजकारणातली कटुता वाढत चालली आहे.
एक काळ असा होता की पंतप्रधान नेहरू यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीच्या शिखरावर बसून अटल जी सारख्या नव्या मुलाला संसदेत प्रत्युत्तर देत असत आणि नंतर पाठ थोपटून प्रोत्साहित करीत असत. त्यावेळी वाजपेयी पाठीमागे बसायचे पण वाजपेयींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे नेहरू अतिशय काळजीपूर्वक ऐकत असत. आताच्याप्रमाणे विरोधकांची खिल्ली उडवणे ही कदाचित प्रथा नव्हती.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम