Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधी यांना भाषण बदलायला सांगितले..

काही दिवसापूर्वी आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनच्या वेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी काही खास किस्से सांगितले होते. त्यातील काही किस्से…

0

१९८० मध्ये देशात पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आली. इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. पंतप्रधान पदाची सूत्रे हातात येताच इंदिरा गांधींनी देशातील जनतेला संबोधित करण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधी यांचे भाषण तयार होते, पण तरीही त्यांनी ते एकदा तपासण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांना दाखविले आणि त्यावर डॉ. सिंग म्हणाले.

मॅडम, या भाषणात एक गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. ती तुम्ही तुमच्या भाषणातून काढा. अन्यथा नंतर त्यावर आरोप होतील.

मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार इंदिरा गांधी यांनी आपल्या भाषणातून तो भाग काढून नंतर देशाला संबोधित केले.

एकप्रकारे मनमोहन सिंग यांच्या सूचनेनुसार “आयरन लेडी” इंदिरा गांधी यांनी आपल्या भाषणातून काय काढले? यावर बरीच चर्चा झाली. पण स्वत: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हे रहस्य उघडले आहे.

काही दिवसापूर्वी आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनच्या वेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी काही खास किस्से सांगितले होते. त्यातील काही किस्से…

१९८० साली देशात जनता पार्टीचे सरकार जावून कॉंग्रेसचे सरकार आले होते. सत्ता बदलानंतर इंदिरा गांधी पहिल्यांदाच देशातील जनतेशी संवाद साधणार होत्या.

मनमोहन सिंग यांच्या मते, इंदिरा गांधींच्या भाषणात जनता पार्टी सरकारच्या सर्व चुका आणि त्यातील देशातील संकटाचा संदर्भ होता. परंतु एक गोष्ट म्हणजे त्या काळात आर्थिक सल्लागार असलेले मनमोहन सिंग यांना एक गोष्ट खटकली ती म्हणजे, जनता पार्टी सरकारने देशातील परकीय चलन साठा रिकामा केला.

मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधी यांना सांगितले, “मॅडम, परकीय चलन साठा खूप चांगल्या अवस्थेत आहे, म्हणून जर ही गोष्ट भाषणात आली तर ती फारच कटकट होईल. जनता पार्टी सरकारबद्दलच्या तुमच्या तक्रारी आहेत, परंतु त्यांनी बरचसा परकीय चलन साठा ठेवला आहे, हे सत्य आहे.”

डॉ. मनमोहन सिंग यांच्या या सुचनेचा इंदिरा गांधींनी लगेच स्वीकार केला आणि त्यांच्या भाषणात तसा बदलही केला

पेन्शन मिळणार नाही, म्हणून ट्रान्सफर करू नका

डॉ. मनमोहन सिंग यांनी असाच आणखी एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला. मनमोहन सिंग प्रशासकीय सेवेत काम करत असतानाच इंदिरा गांधी यांनी त्यांना नियोजन आयोगामध्ये जाण्यास सांगितले.

तेव्हा त्यांनी नकार दिला. यावर इंदिरा गांधी यांनी मनमोहन सिंग यांना याचे कारण विचारले,

तेव्हा मनमोहन यांनी त्यांना सांगितले,

“मॅडम, मी ब्युरोक्रेट आहे. पण मी नियोजन आयोगामध्ये गेलो तर मला प्रशासकीय सेवा सोडावी लागेल आणि निवृत्ती वेतन मिळणार नाही.”

यावर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तत्कालीन कॅबिनेट सचिवांना मार्ग शोधण्याचे आदेश दिले.

नरसिंहराव यांची शर्त आणि मनमोहन सिंग

१९९१ साली देशात पुन्हा कॉंग्रेसचे सरकार आले. पी. व्ही. नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी देशाची ढासळलेली स्थिती सुधारण्यासाठी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री करण्यात आले.

मनमोहन सिंग यांच्या मते त्यांनी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यासमोर एक अट ठेवली की देश खोल आर्थिक संकटात आहे, म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतील.

मनमोहन सिंग यांच्या या निर्णयावर पंतप्रधान राव म्हणाले,

”मंजूर आहे. मी तुम्हाला फ्री हॅड देतो. पण हे लक्षात ठेवा की जर सर्व काही ठीक राहिले तर आम्ही श्रेय घेऊ. पण अपयशी ठरल्यास जबाबदार तुम्हाला धरले जाईल.”

मनमोहन सिंग यांनी हा निर्णय मान्य केला आणि देशात आर्थिक क्रांती घडली. यावर मनमोहन सिंग म्हणाले होते, आर्थिक सुधारणांमध्ये विविध आव्हाने होती, परंतु एकदा सुधारणा झाल्यावर 25 वर्षे थांबली नाहीत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.