Take a fresh look at your lifestyle.

काटेवाडीच्या वहिनी : सुनेञा ताई

0
  • किरण इंगळे (बार्शीकर)

असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्ञी असतेच हे अगदी खरय आणि अजितदादांच्या यशस्वी जिवनाची खंबीर साथ म्हणजेच वहिनी आपला नवरा राजकारणात असताना घर सांभाळण्याची जबाबदारी तर प्रत्येकच बायको घेते पण नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याने जमा केलेला गोतवळा पोटाशी कवटाळत हा डोलारा सांभाळने प्रत्येकीलाच जमत नाही हे ही तितकंच खरय पण या सर्व गोष्टीला अपवाद ठरल्यात त्या या आपल्या सुनेञा वहिनी.

महाराष्ट्रातील माजी मंत्री पदमसिंह पाटील यांच्या बहिण सुनेत्रा (निंबाळकर पाटील) ज्या आता सुनेत्रा अजितदादा पवार झाल्या आहेत. १९८५ साली अजित पवार आणि सुनेत्रा पवार विवाहबद्ध झाले होते.

सुनेत्रा वाहिनी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असून देखील त्या प्रसिद्धीपासून कायम दूर असता आणि आपल सामाजिक कामात त्या नेहमी अग्रेसर असतात.

आज तस्स पाहिलं तर पोकळ प्रसिद्धीसाठी आणि भावनिकते साठी आज स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे अनेक जण आहेत पण शेतीची आवड असणारी लोकहिताच्या सामाजिक कामामध्ये अतिशय अग्रेसर असणारी आणि राजकारणाच्या बाहेर राहुन आपल्या कामाच्या जोरावर लोकांची मनं जिंकता येतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनेञावहिनी अजितदादा पवार.

आजवर अनेक लोकहिताची कामे आरोग्य शिबिरे पाहिली नेते येतात उदघाटन करतात आणि निघुन जातात परंतु गेल्या कित्येक वर्षापासून कोणताच बडेजाव न करता गोर गरिब दिन-दुबळ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर असो की एनव्हायरमेंट फोरमच्या माध्यमातून येणार्या पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्याला पर्यावरण संवर्धनावर विशेष लक्ष द्यावे लागणार याची जनजागृती करत सहकार्यांच्या साथीने उभी केलेली वृक्ष चळवळ असो की स्वच्छतेची मोहीम हे सर्व आजवर सुनेत्रावहीनी करत आल्या आहेत.

काटेवाडीच्या वहिनी…

काटेवाडी म्हंटले की, डोळ्यासमोर छबी येते. ती म्हणजे आदरणीय पवार साहेबांची, येथेच त्यांनी बालपणीचे धडे गिरवले. दादांचे म्हणजेच अजित पवार यांचेही बालपण काटेवाडी गेले. जेथे ते शिस्तप्रिय बनले व राज्याला कणखर नेतृत्त्वाचा आदर्श घालून दिला. पण, खरी ओळख काटेवाडीची देशाला झाली ती म्हणजे स्वच्छतेच्या प्रणेत्या सुनेत्रा वहिनी यांच्यामुळेच.

वहिनींनी स्वतः हातात खराटा घेऊन गावाला आवाहन केले आणि त्यानंतर त्यांनी उभारलेली चळवळ गावाचा कायापालट करून गेली. हागणदारीमुक्‍त, छप्परमुक्‍त, सिमेंट रस्ते, सौर ऊर्जा दीपपथ, वनराईने नटलेले काटेवाडी हे देशातील पहिले इकोग्राम बनले, ते वहिनींमुळेच.हवतर एखादं काम आपल्या सहकार्यातुन होत असल्यास “हाती घेईल ते तडीस नेईल” ही वहिनींची खासियतच आजच्या या जमान्यात शहराचं महत्व वाढलय पण काटेवाडी सारख्या खेड्याचा कायापालट करून शहराचं रुप दिलय. आज या खेड्यासारखी सर्व खेडी सुधारली तर महात्मा गांधींजींचा नारा “खेड्याकडे चला” हा पुर्णत्वास आणायला वेळ लागणार नाही

देशात पहिल्या पंचवीस क्रमांकात

बारामती परिसरातील कर्तव्यदक्ष,बेडर,होतकरु महिलांना स्वावलंबी बनवत बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळवुन देऊन त्यांना संसाराचा गाढा चालवायला उभारी दिली अशा सर्व महिलांच्या आशेचा किरण म्हणजेच सुनेञावहिनी पवार.

हेच काय त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेलं बारामती मधील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाला शरद पवार साहेब,अजितदादा,सुप्रियाताई यांच वेळोवेळी लाभलेलं मार्गदर्शन आणि संस्थेतील प्राचार्य,प्राध्यापक,शिक्षक कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे देशात पहिल्या पंचवीस क्रमांकात आली आहे.

पुणे विद्यापीठाच्या सिनेट मेंबर

सुनेत्रा पवार आज विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवलाय त्या पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य देखील आहेत. त्या सिनेट सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.

अजितदादा समोर परिस्थिती कुठलीही असो कायम पाठिशी उभी असणारी अर्धांगीनी तर पार्थदादांच्या नेतृत्वाला राजकारणाची पाऊल वाट दाखवणारी आई ही त्यांच्यातुन सातत्याने दिसते माञ पार्थदादांचीच नव्हे तर आमच्यासारख्या हजारो युवकांच्या अडचणीत धावुन येणार्या आमच्या ही त्या माऊली बनल्या आहेत हे नक्कीच अशा या माउलीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.