अडचणीत आलेल्या मनमोहन सिंग सरकारला विलासरावांनी वाचवले होते
२०११ साल होत.
देशात तेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते. अण्णांनी जनलोकपालच्या मागणीसाठी जंतर मंतर मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केलं. बघता बघता अण्णा हजारे यांच्या उपोषणाला लोकांचा पाठींबा वाढू लागला. सरकार अडचणीत येतेय कि काय ? असं वाटत असतानाच विलासराव देशमुख धावून आले.
विलासरावांनी 2011 सालच्या आंदोलनात काय केलं ?
लोकपालच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरु केले होते. अण्णाच्या उपोषणानंतर ते सोडविण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु केले. असं म्हटलं जात कि तेव्हा अण्णांच्या टीममध्ये असलेले अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी प्रत्येक बैठकीत वाद घालत होते, ज्यामुळे बोलणी फिसकटत होती.
एका बैठकीत तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जीं यांनी किरण बेदींना झापलं होतं. त्यामुळे रामलीला मध्ये सुरु असलेलं हे आंदोलन हाताबाहेर जात होतं.
प्रकरणात विलारावांची एन्ट्री
अण्णा हजारे यांनी जेव्हा आंदोलन सुरु केले. तेव्हा विलासराव देशमुख श्रीलंकेत होते. अण्णांची आंदोलनं हाताळण्याचा अनुभव विलासरावांना आहे, असा सल्ला तत्कालिन कृषीमंत्री शरद पवारांनी अर्थमंत्री असलेल्या प्रणव मुखर्जी यांना सल्ला दिला.
टीम अण्णा सोबत मध्यस्थी होत नाही याची जाणीव होताच मनमोहन सिंहांनी विलासरावांना मध्ये घातलं. विलासरावांनी पुन्हा चर्चा सुरु केली पण टीम अण्णा सोबत नाही तर थेट अण्णा सोबत. विलासराव मिडिया, किरण बेदी आणि केजरीवाल अश्या सगळ्यांनाच चुकवून अण्णांना भेटले.
विलासराव अण्णा सोबत चर्चेचं गुऱ्हाळ घालत बसले नाहीत. ते थेट उपोषणस्थळी आले. थेट अण्णानाच तुम्हाला काय हवंय? असं विचारून घेतलं. त्यानंतर ते थेट तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना भेटले.
मनमोहन सिंह यांच्याकडे या मागण्यांबाबत चर्चा केल्यावर ते तत्कालिन विरोधी पक्षनेत्या आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना आणि इतर विरोधी नेत्यांनाही लुपमध्ये ठेवून आंदोलनातल्या मागण्यांवर सर्व सहमतीने काय करता येईल हे ठरवलं.
त्यानंतर मात्र विलासरावांनी दुसरी भेट थेट केंद्र सरकारची पत्रे घेऊनच घेतली. अण्णांनी या मागण्यांवर सहमत असल्याचं सांगितलं आणि उपोषण अकरा दिवसांनी मागे घेतलं.
अण्णाचे हे उपोषण तब्बल अकरा दिवस चाललं होतं. पण या संपूर्ण अकरा दिवसात विलासराव फक्त दोन वेळा अण्णांना भेटले. पण विलासरावांनी अडचणीत आलेल्या सरकारला अडचणीतून बाहेर काढले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम