Take a fresh look at your lifestyle.

भारतात दुधाची क्रांती करणारे वर्गीज कुरीअन स्वतः मात्र दुध पीत नसत

0

अमूल माहित नाही, असा माणूस देशात सापडणार नाही. कारण जगात दुध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादने निर्माण करणारा अमूल हा सर्वात मोठा ब्रांड आहे. ‘अमूल’च्या या यशामागे एका व्यक्तीचे नाव आवर्जून घ्यावे लागेल, ते म्हणजे वर्गीज कुरीअन.

डॉ. वर्गीस कुरियन यांना भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणलं जात. कारण एकेकाळी दुधाच्या टंचाईला सामोरे जाणाऱ्या देशाला त्यांनी जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक देशाच्या यादीत बसवले.

कुरियन यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळच्या कोझिकोड येथे झाला होता. भारतात त्यांचा वाढदिवस “राष्ट्रीय दूध दिन” म्हणून साजरा केला जातो.

दुधाची क्रांती करणारे स्वतः दुध पिले नाहीत !

एकेकाळी दुधाच्या टंचाईला सामोरे जाणारा भारत दुधात स्वयंपूर्ण बनला. कुरीअन यांच्या नेतृत्वात देशात धवल क्रांती घडली. पण विशेष म्हणजे ‘मिल्कमन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणारे कुरीअन मात्र स्वतः कधीच दूध प्यायचे नाहीत.

ते म्हणायचे, ‘मी दूध पित नाही कारण मला ते आवडत नाही.’

कशी झाली अमूलची सुरुवात

कुरीअन यांचे एक स्वप्न होते. “देशाला दूध उत्पादनामध्ये स्वावलंबी बनविणे, त्याचबरोबर देशातील शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारणे.” त्यासाठी त्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांना समर्पित असचं काम केले.

१९४९ साली त्यांनी गुजरातमधील कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघटना (केडीसीएमपीयूएल) चे अध्यक्ष त्रिभुवन दास पटेल यांच्या विनंतीवरून दुग्धशाळेचे काम हाती घेतले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने ही दुग्धशाळेची स्थापना झाली होती.

कुरियन यांच्या प्रयत्नातून केडीसीएमपीयूएलच्या सहकारी संस्था खेड्यापाड्यात सुरू झाल्या. त्यामुळे संस्थेकडे मोठ्या प्रमाणात दुध जमा होवू लागले. त्याचे प्रमाण इतके जास्त होते कि त्यांचा पुरवठा करणे कठीण होऊ लागले.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी दूध प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून दुधाचे जतन होईल. परिणामी आनंद जवळच्या जिल्ह्यात या सहकारी संस्थेचा प्रसार होऊ लागला.

अमूल नावामागची कहाणी

डॉ. कुरियन यांना केडीसीएमपीएलयूएलला एक सोपी आणि सहज-सुलभ नाव द्यायचे होते. त्यासाठी त्यांनी अमूलमधीलच कर्मचार्‍यांची मदत घेतली. सुरुवातील त्यासाठी अमूल्य हे नाव सुचवले गेले. ज्याचा अर्थ अमूल्य आहे. पण शेवटी अमूल हे नाव निवडले गेले.

प्रथमच म्हशीच्या दुधापासून पावडर

शिल्लक राहिलेल्या दुधाचा उपयोग दुध पावडर बनवण्याची पद्धत सुरु झाली. पण पूर्वी फक्त गायीच्या दुधातून पावडर तयार केली जात असे. त्यावेळी म्हशीच्या दुधाची पावडर बनवण्याचे तंत्र नव्हते. पण कुरियन हा म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करणारा जगातील पहिला माणूस होता.

अमूल च्या शेतकऱ्यांची संख्या वाढत जात असताना मोठ्या प्रमाणात दुध शिल्लक राहु लागले. त्यामुळे म्हशीच्या दुधा पासून पावडर तयार करण्यासाठी कुरीअन यांनी काम सुरू केले. १९५५ मध्ये, म्हशीच्या दुधाची पावडर बनवण्याचे तंत्र जगात प्रथमच विकसित झाले. ऑक्टोबर १९५५ मध्ये कैरा डेअरी येथे हा प्लांट लावला होता. त्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान नेहरू आले होते. हे अमूलचे खूप मोठे यश होते.

धवल क्रांतीची सुरुवात

कुरीअन यांच्या नेतृत्वात अमूल ने केलेली प्रगती पाहून पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अमूल मॉडेल देशातील इतर ठिकाणी पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) ची स्थापना केली. डॉ. कुरियन यांना मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.

डॉ. कुरिअन तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या सोबत

एनडीडीबीचे अध्यक्ष म्हणून कुरीअन यांनी ‘ऑपरेशन फ्लड’चे नेतृत्व केले आणि भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून बनविला आणि घरोघरी अमूल लोकप्रिय झाला. ते 1973 ते 2006 या कालावधीत गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ लिमिटेडचे ​​प्रमुख आणि 1979 ते 2006 पर्यंत ग्रामीण व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष होते.

भारत सरकारने त्यांना पद्मविभूषणने सन्मानित केले. तसेच त्यांना कम्युनिटी लीडरशिपसाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, कार्नेगी वॅट्लर जागतिक शांतता पुरस्कार आणि अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पर्सन ऑफ द इयर सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

आज देशातील 16 दशलक्षाहून अधिक शेतकरी दूध उत्पादक अमूलशी संबंधित आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.