Take a fresh look at your lifestyle.

लव्हलिनाची मॅच पाहण्यासाठी आसाम विधानसभेचं कामकाज २० मिनिटे तहकूब करण्यात आलं होतं

0

लहान असताना लव्हलिनच्या वडिलांनी बाजारातून मिठाई आणली होती. ती मिठाई ज्या पेपरमध्ये आणण्यात आली होती त्यात कतारचे बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांच्याबद्दल लिहले होते. तेव्हा लव्हलिनने वडिलांकडून मोहम्मद अलीबद्दल जाणून घेतले आणि तेथूनच बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली.

आसामच्या गोलाघाट जिल्ह्याची रहिवाशी लव्हलिन ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली महिला खेळाडू आहे. बॉक्सिंगमध्ये येण्याआधी ती किक बॉक्सिंग करायची, इतकच नव्हे तर किक बॉक्सिंग प्रकारात तिने राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकले आहे.

लव्हलिनाच्या दोन बहिणीही बॉक्सिंगमध्ये

तिच्या दोन मोठ्या बहिणी लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लव्हलिनाही किकबॉक्सिंगमध्ये आली. लव्हलिना बॉरगोहेनचा जन्म 2 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बॉरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी तर आई गृहिणी. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलीनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लवलीनाला तीन बहिणी आहेत.

ऑलिम्पिकच्या आधीच आईची झाली सर्जरी

ऑलिम्पिकच्या आधीचे काही दिवस लव्हलिनासाठी खूप कठिण होते. ऑलिम्पिकआधी सर्व खेळाडू ट्रेनिंगमध्ये असताना लव्हलिना मात्र बॉक्सिंगपासून दूर होती. लव्हलिनाच्या आईची कीडनी ट्रान्सप्लांट सर्जरी या काळात झाली. ही सर्जरी झाल्यानंतर लव्हलिना ट्रेनिंगसाठी परतली.

पहिली ऑलिंपिक्स

पहिल्यांदा ऑलिम्पिक सहभागी होणाऱ्या लव्हलिना बोर्गोहेन (69 किलो) यापूर्वी मंगळवारी जर्मनीच्या अनुभवी नेडिन अपेट्झला एका कठीण लढतीत पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

मंगळवारी, रिंगमध्ये प्रवेश करणारी एकमेव भारतीय बॉक्सर लव्हलिनाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये 12 वर्षीय मोठ्या अपेट्झचा 3-2 असा पराभव केला. दोन्ही खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करत होते आणि शेवटच्या आठमध्ये स्थान मिळवणाऱ्या भारताच्या नऊ जणांच्या संघातून लव्हलिना पहिली खेळाडू बनली .

काही वर्ष संघर्ष करावा लागला

२०१२ मध्ये ती बॉक्सिंगकडे वळली. सुरुवातीची काही वर्षे साहजिकच धडपडण्यात गेली.पण २०१७ पासून यश मिळायला सुरुवात झाली. २०१७ च्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले आणि २०१८ च्या इंडिया ओपनची ती सुवर्णपदक विजेती होती. २०१८ व २०१९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही तिने कांस्यपदक जिंकले आणि आता ऑलिम्पिकचे कांस्यपदक निश्चित केले आहे.

बहुतेकदा कांस्यपदकावरच

ऑक्टोबर २०२० मध्ये ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती आणि त्यामुळे गेल्या नोव्हेंबरमध्ये ती इटलीत भारतीय संघासोबत सरावाला जाऊ शकली नव्हती. त्यानंतर यंदा बाॕक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही रशियन खेळाडूकडून ती उपांत्यपूर्व फेरीत ०-५ अशी पराभूत झाली होती.

यानंतर दुबईत झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते. थोडक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर लव्हलिना बहुतेकदा कांस्यपदकावरच अडकली आहे.

सर्व आमदारांनी पाहिला सामना

लव्हलिनाचा सामना पाहण्यासाठी आसामच्या विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. सामना सुरु होण्याआधीच यासंदर्भातील माहिती आसाम सरकारमधील मंत्री पिजुष हजारिका यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली होती.

काही खास विक्रम

लव्हलिनाने कांस्यपदकावर आपलं नाव कोरताना काही खास विक्रम केलेत. बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. तर ईशान्य भारतामधील राज्यांमधून आलेली आणि ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती तिसरी महिला आहे. तसेच बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरलीय.

देशाला बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी ती तिसरी खेळाडू ठरली आहे. याआधी विजेंद्र सिंग आणि मेरी कोम यांनी अनुक्रमे २००८ आणि २०१२ मध्ये कास्य पदक जिंकून दिले होते. आता लव्हलिनाला कांस्य पदक मिळालं आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.