निवडणूक हरल्यानंतरही पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री का बनले ?
सत्ता राखण्याच्या या ऐतिहासिक राजकीय लढाईत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी पक्षाची गत झाली आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी पराभूत झाल्याने पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागला होता.
उत्तराखंडमध्येही पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकला आहे. भाजपने 70 पैकी 47 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर 19 जागांसह काँग्रेस आहे. उत्तराखंडमध्ये लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल. उत्तराखंडमध्ये लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल.
पण मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा गेली काही दिवस सुरु होती. मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. पण मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता होती.
पण ही माळ आता पुष्कर सिंह धामी यांच्या गळ्यात पडणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत हे राज्य आपल्याकडे राखून इतिहास घडवला. राज्याच्या २१ वर्षांच्या इतिहासात एका पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता राखता आली नव्हती.
सत्ता राखण्याच्या या ऐतिहासिक राजकीय लढाईत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी पक्षाची गत झाली आहे.
मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी पराभूत झाल्याने पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागला होता.
या निवडणुकीत पुष्कर सिंग धामी आणि हरीश रावत यांनी आपापल्या पक्षांचे नेतृत्व केले. मात्र, भाजप बहुमताच्या दिशेने घोडदौड करीत असताना धामी यांचा खातिमा मतदारसंघात पराभव झाला. धामी यांचा पराभव काँग्रेसचे उमेदवार भुवनचंद्र कापरी यांनी सहा हजार ५७९ मतांनी केला होता.
दोन वेळा ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते
पुष्कर सिंह धामी यांचा जन्म हा पिथोरागढच्या टुंडी गावात १६ सप्टेंबर १९७५ ला झाला. लखनऊ विद्यापीठात त्यांनी व्यावसायिक शिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. ९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये अनेक पदांवर त्यांनी काम केलं आहे.
दोन वेळा ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. २०१२ मध्ये खटीमा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले. यांनी मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधात मास्टर्स केले आहेत. 1990 ते 1999 पर्यंत त्यांनी ABVP मध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे.
धामी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांचेही निकटवर्तीय आहे.
लखनऊमध्ये ९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी ही त्यांनी संभाळली होती. राजनाथ सिंह त्यांच्या कामाने त्यावेळी प्रभावित झाले होते. तेव्हापासून धामी हे सतत राजनाथ सिंहांच्या संपर्कात राहिले. धामी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांचेही निकटवर्तीय आहेत. कोश्यारी यांचे बोट धरून धामी यांनी राजकारणात प्रवेश केला, असं बोललं जात.
पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंड राज्याचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होते. दोन वेळा आमदार राहिलेले धामी हे कधीही उत्तराखंड सरकारमध्ये मंत्री नव्हते. परंतु, ते थेट मुख्यमंत्रीपदी झाले होते.
मुख्यमंत्री पुष्कर धामी कार्यकर्त्यांसह जनसंपर्कासाठी नेपाळ सीमेवरील धरणाच्या वरच्या भागात पोहोचले होते. परंतु तिथे आपचे उमेदवार एसएस कलेर हे देखील आपल्या उमेवारांसोबत जनसंपर्क करत होते. क्लेर यांनी भाजपवर सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. या प्रकरणावरून मुख्यमंत्री धामी आणि कलेर यांच्यात जोरदार संघर्ष निवडणुकीच्या काळात पेटला होता .
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम