Take a fresh look at your lifestyle.

पेप्सी और प्रमोद महाजन , कभी अपना फॉर्म्युला नहीं बताते.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीची प्रचाराची जबाबदारी पुन्हा महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. परंतु "फील गुड" और "इंडिया शाइनिंग" अशा घोषणा दिल्यानंतरही भाजपचा पराभव झाला. महाजन यांनी स्वतः या पराभवाची जबाबदारी स्वीकारली.

0

‘पेप्सी और प्रमोद महाजन , कभी अपना फॉर्म्युला नहीं बताते.’ ये वाक्य आहे प्रमोद महाजन यांच. २००३ साली विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळालं. त्याच संपूर्ण श्रेय भाजपचे निवडणूक रणनीतीकार प्रमोद महाजन यांना मिळालं.

त्यावेळी त्यांना निवडणूक जिंकण्याच्या फॉर्म्युलाबद्दल विचारलं असता महाजन यांनी उत्तर दिल होत

‘पेप्सी और प्रमोद महाजन, कभी अपना फॉर्म्युला नहीं बताते.’

आज ३ मे. आजच्याच दिवशी २००६ साली प्रमोद महाजन यांचे निधन झाले होते. प्रमोद यांचे बंधू प्रवीण महाजन यांनीच त्यांच्यावर गोळी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

त्याच्या जीवनातील प्रमुख घटना पाहूयात.

प्रमोद महाजन यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४९ रोजी तेलंगाना मधील महबूब नगर येथे झाला.

प्रमोद महाजन लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सक्रिय होते. तरुणपणी त्यांनी काही काळ संघाच्या तरुण भारत या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम केले.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ महाविद्यालयात शिकले. तिथेच त्यांची घट्ट दोस्ती झाली. नंतर ती नात्यात देखील बदलली. प्रमोद यांची बहिण प्रज्ञा यांच्यासोबत गोपीनाथ मुंडे यांचा विवाह झाला. महाजन यांच्या प्रेरणेतून गोपीनाथ मुंडे राजकारणात आले.

पुढे महाजन यांनी काही काळ अंबेजोगाई येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पण थोड्याच काळात त्यांनी ती नोकरी सोडून संघ प्रचारक बनण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. त्यावेळी प्रमोद यांनाही अटक झाली. त्यांना नाशिक तुरुंगात डांबण्यात आले. आणीबाणी नंतर १९७७ साली त्यांची तुरुंगातून सुटका झाली.

१९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी भाजपात काम सुरु केले. त्यांना सुरुवातीला राज्य पातळीवर आणि नंतर देश पातळीवर पक्षाची पदे मिळाली. १९८४ साली महाजन पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढले पण इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानभूती लाटेत त्याचा पराभव झाला.

१९८६ साली प्रमोद महाजन पहिल्यांदा संसदेमध्ये पोहचले, राज्यसभा सदस्य म्हणून. त्यानंतर ते कायम राज्यसभा सदस्य राहिले. अपवाद फक्त १९९६ लोकसभा निवडणुकीचा. १९९६ साली ते मुंबई मधून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या १३ दिवसाच्या सरकार मध्ये महाजन यांना रक्षा मंत्री म्हणून शपथ देण्यात आली होती.

वाजपेयी यांच्या दुसऱ्या सरकार मध्ये पहिल्यांदा माहिती प्रसारण खात्याचे मंत्री करण्यात आले, नंतर त्यांच्याकडे संसदीय कामकाज खात्याचे कामही त्यांच्याकडे सोपवण्यात आले.

२००१ साली त्यांना दळणवळण खात्याचे मंत्री बनवण्यात आले. त्यांनी मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयामुळे देशात मोबाईल क्रांती झाली.

परंतु त्यामध्ये त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि पक्ष संघटनेत काम करण्यास सांगण्यात आले. त्यावर बोलताना महाजन म्हणाले होते “कुछ नहीं बदला है. पहले रथ पर सवार था. अब रथ चलाने जा रहा हूं.”

याच काळात महाजन यांच्या राजनीतिक कौशल्या पक्षाला फायदा झाला. डिसेंबर २००३ साली दिल्ली, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश और राजस्थान या राज्यात झालेल्या भाजपला जोरदार यश मिळालं.

विधानसभा निवडणुकीच्या विजयामुळे देशातील जनता भाजपामागे आहे. याचा फायदा घेण्यासाठी लोकसभा निवडणुका लवकर घेण्यात याव्या, अशी सूचना महाजन यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना दिल्या. त्यामुळे २००४ च्या लोकसभा निवडणुका वेळेआधी घेण्यात आल्या.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीची प्रचाराची जबाबदारी पुन्हा महाजन यांच्याकडे देण्यात आली. परंतु “फील गुड” और “इंडिया शाइनिंग” अशा घोषणा दिल्यानंतरही भाजपचा पराभव झाला. महाजन यांनी स्वतः या पराभवाची जबाबदारी स्वीकारली.

२२ एप्रिल २००६ रोजी मुंबई इथल्या अपार्टमेंट मध्ये असताना प्रमोद यांचे लहान बंधू प्रवीण यांनी बंदुकीतून गोळ्या मारल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. १३ दिवस मृत्यूशी झुंज देत असताना ३ मे रोजी महाजन यांचा मृत्यू झाला.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.