२० पेक्षा अधिक प्रकाशकांनी नाकारलं ; आज पुस्तक विक्रीतून १०० कोटींचे मालक
लेखक होणं सोपं नाही, पण त्यापेक्षा तुम्ही लिहलेलं पुस्तक न प्रकाशित होणे. हे त्यापेक्षा जास्त अवघड असते. त्यामुळे आपण लिहलेले पुस्तक प्रकाशित होईल कि नाही, किंवा विकले जाईल कि नाही अशी भीती असतानाच पुस्तक लिहिण्याचा प्रवास सुरू केलेल्या अमिषने कधीही विचार केला नव्हता की तो देशातील सर्वोत्तम पुस्तक विकल्या जाणाऱ्या लेखकांपैकी एक असेल.
२०१० पासून अमिश त्रिपाठी यांच्या चार पुस्तकांची कमाई १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
बँकर ते लेखक
अमिष त्रिपाठीचा बँकर ते लेखक असा प्रवास सोपा नव्हता. ओरिसा आणि तामिळनाडूमध्ये वाढलेले अमिषचे घरचे वातावरण थोडे वेगळे होते. त्यांचे आजोबा बनारसमध्ये पंडित होते. त्यांना त्यांच्या पुराणकथांमध्ये रस होता. त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या घरातील वातावरण हे त्यांच्यासाठी लिहिण्याची प्रेरणा होती.
अमिष हायस्कूलचे शिक्षण घेतल्यानंतर मुंबईला गेले. त्यानंतर आयआयएम कोलकातामधून एमबीए केलं. बँकर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अनेक खासगी बँकांमध्ये काम केले.
फोर्ब्सच्या यादीत नाव
२००४ पासून जवळजवळ पाच वर्षे अमीश पुराणावर लिहीत होतते. २०१० मध्ये, त्याचे पहिले पुस्तक “द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा” तयार झाले . अमिश म्हणाला होता की, ते पुस्तक २० पेक्षा जास्त प्रकाशकांनी त्याचे पुस्तक छापण्यास नकार दिला होता . आज त्यांनी आतापर्यंत ३५ लाख पुस्तके विकली आहेत. आज घडीला अमिश त्रिपाठी यांचे पुस्तक ही देशात आणि जगात सर्वात वेगाने विक्री होणारे पुस्तक आहे.
अमीशच्या ७ पुस्तकांच्या २०१० पासून भारतीय उपखंडात ५० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. फोर्ब्स इंडियाने 2012, 2013, 2014, 2015, 2017 आणि 2018 मध्ये भारतातील टॉप 100 सेलिब्रिटींमध्ये अमिशचा क्रमांक पटकावला आहे.
अमिषाच्या ‘द इमार्टल्स ऑफ मेलहुआ’ ‘, ‘द सिक्रेट ऑफ नागाज’ आणि ‘द ओथ ऑफ एअरसन’ ही तीन मालिका सर्वाधिक वेगाने विकली जातात. आता अमिष लवकरच प्रभू रामावर आपली मालिका लाँच करणार आहे, ज्याची पहिली आवृत्ती बाजारात आली आहे.
ज्या पुस्तकाचा विषय देखील माहिती नाही किंवा पुस्तक लिहायला देखील घेतलं नाही तरी अमिश त्रिपाठी यांनी ज्या पुस्तकाचा विचारही केला नाही त्या पुस्तकासाठी प्रकाशकाकडून ऍडव्हान्स ५ कोटी एवढी रक्कम घेतली होती.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम