Take a fresh look at your lifestyle.

कन्याकुमारी ते काश्मीर : काँग्रेसची पदयात्रा कशी असेल ? राहुल गांधींना याचा फायदा होईल का ?

आपल्या देशाच्या राजकारणात आजवर अनेक दिग्गज नेत्यांनी अशा मोठ्या पदयात्रा काढल्या आहेत. त्याचा त्यांना मोठा राजकीय फायदा देखील झाल्याचे पाहायला मिळते.

0

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला कन्याकुमारीमधून आज सुरुवात होत आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे.

काँग्रेसची देशभरातील परिस्थिती, राहुल गांधी यांच्या विरोधातील पक्षातील वातावरण आणि आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने ही यात्रा काढली असली तरी याचा काँग्रेस आणि राहुल गांधी यांना किती फायदा होईल असा प्रश्न आहे.

पदयात्राचा इतिहास

आपल्या देशाच्या राजकारणात आजवर अनेक दिग्गज नेत्यांनी अशा मोठ्या पदयात्रा काढल्या आहेत. त्याचा त्यांना मोठा राजकीय फायदा देखील झाल्याचे पाहायला मिळते.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी व एन. टी. रामाराव, विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेत्यांच्या यात्रांमुळे पक्षाला किंवा नेत्याला फायदा झाला होता.

राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला याचा किती फायदा होतो, याचे उत्तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मिळेल.

पदयात्रेमागचा काँग्रेसचा उद्देश

महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकारणाच्या केंद्रीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र झालेल्या प्रश्नांकडे केंद्रातील सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

केंद्र सरकारविरोधात देशातील जनतेने संघटित होणे हे या पदयात्रेचे उद्दिष्ट आहे.

वाढती बेरोजगारी, वाढत्या किमती आणि वाढती असमानता या समस्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहेच, पण केंद्र सरकारमुळे निर्माण झालेले भय, धर्माधता आणि पूर्वग्रहदूषित राजकारणाविरोधात देश आणि सर्वसामान्य नागरिकांना एकत्र येण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

या पदयात्रेला प्रांरभ करण्यापूर्वी राहुल गांधी त्यांचे पिता आणि माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या श्रीपेरूंबदुर येथील स्मृतीस्थळी जाऊन प्रार्थनासभेत भाग घेतील. त्यानंतर कन्याकुमारी येथील कार्यक्रमात राहुल सहभागी होतील.

 

तिथे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित असतील.

या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या हाती खादीचा राष्ट्रध्वज देण्यात येईल आणि त्यानंतर पदयात्रेला प्रारंभ करण्यात येईल. ३,५७० किलोमीटरची ही पदयात्रा कन्याकुमारीपासून काश्मीपर्यंत असेल.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.