जेव्हा काकासाहेब गाडगीळ लग्नासाठी राष्ट्रपतीच्या बँडचे आश्वासन देतात
महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना राज्यातून दिल्लीत निवडून गेलेल्या अश्याच काही खासदारांचे किस्से
लग्नासाठी राष्ट्रपतीच्या बँडचे आश्वासन देणारे काकासाहेब गाडगीळ
आपल्या देशात राजकारणी आश्वासन देण्यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण कधीकधी नकळत काही गोष्टींना होकार देताच त्यातून विनोद निर्माण होत असतात. असाच एक किस्सा काकासाहेब गाडगीळ यांच्या बाबतीत देखील घडला होता.
काकासाहेब गाडगीळ केंद्रात मंत्री होते. ते मंत्री असताना घरच्या लोनवर बसत आणि आलेल्या लोकांचे प्रश्न मिटवत असत. आलेल्या प्रत्येक व्यक्तींचे प्रश्न सोडवत. सोबतच काही लोकांना आश्वासन देखील देत. असेच एकदा डॉ. पंडित नावाचे एक गृहस्त काकासाहेबांकडे आले. बोलता बोलता काकासाहेबांनी त्यांना त्यांच्या लग्नासाठी राष्ट्रपतीचा बँड मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
स्वागत समारंभाच्या दिवशी त्या गृहस्तांचा काकासाहेबांना फोन आला. ”अद्याप राष्ट्रपतीचा बँड आला नाही.तो जरा तातडीने असे पहा.” मग त्यानंतर काकासाहेबांनी आपल्या पीएला बोलावून बँडबद्दलविचारले. बोरकर नावाचे काकासाहेबांचे पीए होते. काकासाहेबांनी बँडबद्दल विचारताच बोरकर लगेच म्हणाले, “राष्ट्रपतीचा बँड हा खास सरकारी स्वागतसमारंभाच्या वेळीसच वापरला जातो. खासगी समारंभाला तो मिळू शकत नाही.”
मग मात्र काकासाहेबांन प्रश्न पडला आता काय करायचे ? त्यांनी बोरकरांना विचारले “डॉ. पंडितांना मी कबुल केलं आहे, आता काय करू शकतो ?” तसं आपल्याकडच्या सगळ्या राजकारणी नेत्याचे पीए मात्र खूप हजरजबाबी आणि हुशार असतात. बोरकर पण त्यातलेच. बोरकर लगेच बोलले “आपण पोलीस बँड पाठवून देवू” आणि काकासाहेब निवांत झाले. त्यांनी लगेच पोलीस बँडची व्यवस्था करायला सांगितली असे होते काकासाहेब.
काकासाहेब पुण्यातून खासदार म्हणून निवडून आले होते. १९४७च्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील राहिले. त्याकाळी दिल्लीच्या वर्तुळात मराठी माणसांचे काकासाहेब महत्वाचे आधार होते.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम